AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कडुलिंब फायदेशीर, वाचा !

कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. हे केवळ आपल्या बर्‍याच रोगांवर उपचार करत नाही, तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील कडुलिंबाची पाने फायदेशीर आहेत.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कडुलिंब फायदेशीर, वाचा !
कडुलिंब
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 9:22 AM

मुंबई : कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. हे केवळ आपल्या बर्‍याच रोगांवर उपचार करत नाही, तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील कडुलिंबाची पाने फायदेशीर आहेत. असे काही लोक असतील ज्यांना कडुलिंबाचे नाव ऐकताच, तोंडात कडवट चव उतरते. कडुलिंबा भलेही कडू आहे, परंतु गोडपणा त्याच्या याच कडू चवीमध्ये लपलेला आहे. (Neem is beneficial for boosting the immune system)

कोरोना काळात तर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अत्यंत महत्वाचे आहे. कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून गोळ्याच्या स्वरूपात रिकाम्या पोटी खा. हे खाल्ल्यानंतर एक तासांसाठी काहीही खाऊ नका. यात अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत होते. रस बनवून तुम्ही कडुलिंबाची पाने सेवन करू शकता. कडुलिंबाचा रस केवळ आपले वजन नियंत्रितच ठेवत नाही तर आपले रक्तही साफ करतो.

कडुनिंबामध्ये भरपूर कॅल्शियम आणि लोह असते, जे शरीराची कमजोरी दूर करते आणि हाडे मजबूत बनवते. त्याबद्दल चांगली गोष्ट अशी आहे की, यामुळे आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारे दुष्परिणाम होत नाहीत. कडूलिंब आपल्या शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. याशिवाय हे आपल्या शरीरातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास देखील प्रभावी आहे. कडुलिंबाचा रस तयार करण्यासाठी प्रथम कडुलिंबाची पाने पाण्यात मिसळा.

रात्रभर त्यांना भिजत ठेवा. सकाळी, ही पाने बारीक करून व्यवस्थित वाटून घ्या. हे मिश्रण नंतर गळून घ्या. आता, आपण दररोज त्याचा वापर करू शकता. जर आपल्याला हवे असल्यास, आपण हा रस रोज ताजा बनवू शकता किंवा एकदाच बनवून आठवडाभर पिऊ शकता. आपल्या त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी कडुलिंबाची पाने उपयुक्त आहेत.आपण कडुलिंबाने केसांमधील कोंडा आणि स्काल्पच्या जळजळीवर उपचार करू शकता. त्याचा रस पिल्याने पोटातील कृमी कमी करण्यात खूप मदत होते.

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(Neem is beneficial for boosting the immune system)

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.