New Year Celebration | कॅम्पिंग-हिल स्टेशन-समुद्र किनारा, मुंबईजवळची ‘ही’ ठिकाणे बनवतील सरत्या वर्षाची संध्यकाळ स्पेशल!

आपल्यापैकी बरेच लोक सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवसाला स्पेशल बनवण्यासाठी काहीना काही खास योजना आखत आहेत.

New Year Celebration | कॅम्पिंग-हिल स्टेशन-समुद्र किनारा, मुंबईजवळची ‘ही’ ठिकाणे बनवतील सरत्या वर्षाची संध्यकाळ स्पेशल!
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 12:25 PM

मुंबई : नवीन वर्षाच्या आगमनासाठी आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा वेळी आपल्यापैकी बरेच लोक सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवसाला स्पेशल बनवण्यासाठी काहीना काही खास योजना आखत आहेत. अशावेळी हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी आणि सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी लोक नवनव्या ठिकाणांची माहिती घेत आहेत. कॅम्पिंग, हिल स्टेशन, समुद्र किनारा अशा ठिकाणांना लोकांची पसंती मिळत आहे. यातही काही जवळच्या ठिकाणांची शोध मोहीम सध्या सगळेच राबवत आहेत (New Year Celebration destinations Near Mumbai).

मात्र, कोरोनाची धास्ती अद्यापही लोकांच्या मनात आहे. कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रकोप पाहता, शक्य तितक्या सगळ्या प्रकारची काळजी घेत प्रवासाच्या योजना आखल्या जात आहेत. यासाठीच मुंबईच्या जवळील ठिकाणांना अधिक पसंती दिली जात आहे.

मुंबईजवळ समुद्रकिनारा…

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बरेच लोक समुद्र किनाऱ्यांना पसंती देतात. निळाशार समुद्र किनारा, छानसा टेंट आणि छानसं संगीत नव्या वर्षाची किंवा सरत्या वर्षाची संध्याकाळ स्पेशल बनवतात. तुम्हीही असाच किनारा शोधात असाल, मुंबईजवळ असे अनेक लोकप्रिय किनारे आहेत.

मुंबईजवळचे समुद्र किनारे : रेवदांडा, गुहागर, गणपतीपुळे, बोर्डी

साधारण खर्च :  2000 ते 10000 रुपये (प्रत्येकी)

टेंट कॅम्पिंग

शहराच्या धकाधकीच्या जीवनातून काहीकाळ रिलॅक्स व्हायचे असेल तर टेंट कॅम्पिंग हा उत्तम पर्याय आहे. तलावाच्या किनारी तंबू टाकून, कॅम्पफायर आणि सहभोजन करत संगीत ऐकण्याचा आनंद तुम्ही या ठिकाणांवर लुटू शकता. यासाठी मुंबई जवळील लोकप्रिय ठिकाण म्हणजे पवना आणि भंडारदरा. या ठिकाणी टेंट कॅम्पिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय तुम्ही स्वतःचा टेंट देखील नेऊ शकता.

मुंबई जवळची ठिकाणी : पवना, भांडारदरा

साधारण खर्च :  2000 ते 7000 रुपये (प्रत्येकी)

(New Year Celebration destinations Near Mumbai)

डोंगराच्या माथ्यावर सुर्यास्ताचा आनंद

एखादा छानसा ट्रेक करून नवीन वर्षाचे स्वागत करू इच्छित असाल तर, मुंबईच्या जवळची निसर्गाच्या कुशीतल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या. मात्र, दिवसाच्या सुरुवातीलाच तुम्ही चढाईला सुरुवात करणे गरजेचे आहे. अन्यथा काळोख पडल्यानंतर अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात.

मुंबई जवळची ठिकाणी : कळसूबाई, राजमाची, प्रबळमाची, लोहगड

साधारण खर्च :  1000 ते 2000 रुपये (प्रत्येकी)

वाईन यार्ड्स

मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर नाशिक आहे, जिथे द्राक्षांच्या बागा आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शनिवार व रविवार, सोमा व्हिलेज किंवा सुला वाईन यार्ड्सला भेट देऊ शकता. कुटुंबासह किंवा मित्रपरिवारासह आपण या ठिकाणी सुट्टीचा आनंद घेऊ शकता.

मुंबई जवळची ठिकाणी : सोमा व्हिलेज, सुला वाईन यार्ड्स

साधारण खर्च : 10000 ते 20000 रुपये (प्रत्येकी)

हिल स्टेशन्स

मुंबई जवळच्या अनेक हिल स्टेशन्सला भेट देऊन तुम्ही नव वर्षाचे सेलिब्रेशन करू शकता. मुंबई जवळील लोकप्रिय हिल स्टेशन म्हणजे सापुतारा, माथेरान, पाचगणी. गर्दीची सवय असेल, तर लोणावळा आणि खंडाळा येथेही नवीन रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आहेत. या ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष आयोजन करण्यात येते.

मुंबई जवळची ठिकाणी : सापुतारा, माथेरान, पाचगणी

साधारण खर्च : 3000 ते 5000 रुपये (प्रत्येकी)

(New Year Celebration destinations Near Mumbai)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.