नीता अंबानी पितात ‘एवढं’ महाग पाणी !? ‘त्या’ बाटलीचा फोटो व्हायरल, किंमत ऐकाल तर..
स्पष्टवक्तेपणा आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नीता अंबानी या नेहमीच चर्चेत असतात. भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांची पत्नी म्हणून त्या प्रसिद्ध असल्या तरी त्यांचीही एक वेगळी ओळख आहे.
स्पष्टवक्तेपणा आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नीता अंबानी या नेहमीच चर्चेत असतात. भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांची पत्नी म्हणून त्या प्रसिद्ध असल्या तरी त्यांचीही एक वेगळी ओळख आहे. त्यांचे सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यामुळे त्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात. त्यांच्या सौंदर्यासाठी त्या खास पाणी पितात. एका नोख्या बाटलीतून पाणी पिताना त्याच्या व्हायरल झालेल्या फोटोची खूप काळ चर्चा सुरू होती. नीता अंबानी जगातील सर्वात महागडे पाणी पितात असा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या जीवनशैलीबद्दल लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
बॉलीवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, नीता अंबानी या ‘Acqua di Cristallo Tributo e Modigliani’ जगातील सर्वात महागडे बाटलीबंद पाणी पितात असा दावा करण्यात आला आहे. त्याची किंमत 49 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या हातात सोन्याची पाण्याची बाटली असल्याचा एक मॉर्फ केलेला फोटो काही काळापूर्वी व्हायरल झाला होता, त्यानंतर या चर्चा सुरू झाला. सोशल मीडियावरही त्यावर बरेच चर्वितचर्वण झाले.
खरं तर, 2015 साली आयपीएल सामन्यादरम्यानचा हा एक मूळ फोटो असून तेथे त्यांच्या हातात रेग्युलर पाण्याची बाटली होती. मात्र नंतर तो फोटो एटिड करून नीता अंबानी यांच्या हातात सोन्याची बाटली दाखवण्यात आली. मात्र हा फोटो खरा आहे की नाही याचा कोणताही पुरावा नाही. टीव्ही9 या वृत्ताचे समर्थन करत नाही.
Acqua di Cristallo Tributo e Modigliani आहे तरी काय ?
‘Acqua di Cristallo Tributo e Modigliani’, हे लिलावात 60,000 डॉलर्स (अंदाजे 49 लाख रुपये) मध्ये विकले गेले आहे. यात 24 कॅरेट सोन्याचा मुलामा असलेली बाटली आहे आणि त्यात फिजी आणि फ्रान्सचे नैसर्गिक झरे, आयलँडचे पाणी आणि 23 कॅरेट सोनं आहे, असं म्हटलं जातं. नीता अंबानी हेच पाणी पितात असा दावा केला जातो, मात्र त्यात खरंच कितपत तथ्य आहे, याबाबत अद्याप कोणताही पुरावा समोर आलेला नाही.
इटीमध्ये राधिका-अनंतचे दुसरा प्री-वेडिंग फंक्शन
मुकेश आणि नीत अंबानी यांच्या सर्वात धाकट्या लेकाचे अनंत अंबानीचे लवकरच राधिका मर्चंटशी लग्न होणार असून त्यापूर्वी त्यांनी आणखी एका प्री-वेडिंग फंक्शनचे आयोजन केले आहे. पहिला सोहळा गुजरातमध्ये झाला होता. तर आता सर्वजण इटलीत क्रूझवर फिरायला जाणार आहेत. एका रिपोर्टनुसार, अंबानी यांनी 1,073 फूटााचे हे क्रूझ भाड्याने घेतले आहे. हे जगातील सर्वात मोठ्या क्रूझ लाइनपैकी एक आहे. त्याला सेलिब्रिटी असेंट म्हणून ओळखले जाते. हे प्री-वेडिंग फंक्शन 29 मे ते 1 जून दरम्यान इटली आणि फ्रान्समध्ये होणार आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)