Onion Oil | कांद्याच्या तेलात लपलेत अनेक औषधी गुण, केस गळतीच्या समस्येवरही रामबाण उपाय!

आपले केस खराब होण्यास जितके गरम पाणी जबाबदार आहे तितकेच बाजारात उपलब्ध असलेली कॉस्मेटिक उत्पादने जबाबदार आहेत.

Onion Oil | कांद्याच्या तेलात लपलेत अनेक औषधी गुण, केस गळतीच्या समस्येवरही रामबाण उपाय!
कांदा आपल्या केसांची मुळे मजबूत करण्यासाठी मदत करतो.
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 10:33 AM

मुंबई : हिवाळ्यात आपली त्वचा निर्जीव होते, आपले केसही कमकुवत होऊ लागतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण या हंगामात गरम पाण्याचा जास्त वापर करतो. हिवाळ्यात गरम पाण्याचा वापर केल्याने तुमचे केस कोरडे व निर्जीव होतात, ज्यामुळे तुमचे केस कमकुवत होऊ शकतात आणि तुटू लागतात. यामुळे टक्कल पडण्याची भीती देखील आहे. तसेच केस गळतीची समस्या सुरु होते (Onion Oil recipe and  hair care benefits).

परंतु आपले केस खराब होण्यास जितके गरम पाणी जबाबदार आहे तितकेच बाजारात उपलब्ध असलेली कॉस्मेटिक उत्पादने जबाबदार आहेत. आपल्या केसांवर शॅम्पू व्यतिरिक्त, आपण बरेच प्रयोग करत राहता, यामुळे आपले केस मजबूत होत नसून, उलट आणखी कमकुवत होण्याची शक्यता असते. आपल्या स्काल्पमधील केस आकुंचित होऊ लागतात.

जर आपल्याला केस गळण्याची समस्या असेल, तर कांद्याच्या तेलाने मसाज करणे आपल्यासाठी एक प्रभावी उपाय ठरू शकते. कांदा आपल्या केसांची मुळे मजबूत करण्यासाठी मदत करतो. कांद्याचे तेल आपल्या केसांची वाढ तर सुधारतेच, पण त्यांना अकाली गळतीपासून प्रतिबंधित देखील करते. केसांच्या वाढीसाठी कांदा तेल फायदेशीर आहे आणि आपण ते घरच्या घरी कसे तयार करायचे जाणून घेऊया…(Onion Oil recipe and  hair care benefits)

कांदा तेल रेसिपी

कांद्याचे तेल तयार करण्यासाठी प्रथम कांद्याचा रस घ्या. कांद्याचा रस काढण्यासाठी आपण ग्राइंडर वापरू शकता. सर्व प्रथम, पॅनमध्ये नारळ तेल घाला आणि या तेलात कांद्याचा रस घाला. चांगले मिसळल्यानंतर थंड होऊ द्या. थंड झाल्यावर गाळणीने गाळून घ्या व वेगळ्या भांड्यात काढा. आपण हे तेल 6 महिन्यांसाठी वापरू शकता.

हे तेल कसे वापरावे?

कांद्याचे तेल लावण्यासाठी प्रथम आपल्या केसांचे दोन भाग करा. यानंतर तेल घ्या आणि हलके हातांनी केसांच्या मुळांवर लावा. थोड्या वेळाने, आपण केसांना शॅम्पू लावून धुवा, जेणेकरून आपल्या केसांपासून तेल निघू शकेल.

कांदा तेलाचे फायदे

कांद्याचे तेल आपल्या केसांना खोलवर पोषण देते आणि केसांना कोरडे होण्यापासून वाचवते. या तेलाने केसांची मुळे मजबूत होतात. तसेच, कोंड्याची समस्या देखील दूर होते. हे तेल केस गळण्यास प्रतिबंध करते. तसेच, केसांच्या इतरही समस्या नाहीशा होतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Onion Oil recipe and  hair care benefits)

हेही वाचा :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.