Lifestyle : लहान मुलांसोबत जास्त शिस्तीचं वागणं ठरू शकतं वाईट, पालकांनो कायम लक्षात ठेवा या गोष्टी!
मुलांशी नेहमी प्रेमाने वागलं पाहिजे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. तर आता आपण लहान मुलांना जास्त कठोर नियम लावल्यामुळे ते त्यांच्यासाठी कसं हानिकारक ठरू शकते याबाबत जाणून घेणार आहोत.
मुंबई : प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलांना हुशार, जबाबदार, संस्कारी बनवायचं असतं. त्यामुळे पालक त्यांच्या मुलांना नेहमीच नवनवीन काही गोष्टी शिकवत असतात. तसेच शिस्त देखील लावत असतात. पण काही वेळा बहुतेक पालक त्यांच्या मुलांना कठोर शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. कठोर नियम केल्यामुळे आपली मुले नीट वागायला लागतील असं बहुतेक पालकांना वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमचे हेच कठोर नियम तुमच्या मुलांसाठी हानिकारक ठरू शकतात.
मुलांसोबत कठोर वागल्यामुळे काय परिणाम होतात?
मुलांसोबत जास्त कठोर वागल्यामुळे त्यांच्यामध्ये बंडखोरीची वृत्ती निर्माण होण्याची शक्यता असते.
तुमच्या मुलांवरती तुम्ही कठोर नियम लावल्यामुळे तुमच्या मुलांमध्ये भीती निर्माण होईल, तसेच मुलं नेहमी चिंतेत देखील राहू शकतात.
मुलांमधील आत्मविश्वास देखील कमी होतो, त्यामुळे त्यांना जास्त कठोर नियम लावू नका.
मुलांवरती जास्त कठोर नियम लावल्यामुळे त्यांच्यावर ताण-तणाव येण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांना मानसिक समस्या देखील निर्माण होऊ शकतात.
मुलांसोबत कठोर वागणे टाळण्यासाठी, पालकांनी काय करावे?
प्रत्येकाने आपल्या मुलांसोबत नेहमी प्रेमाने, आदराने वागवलं पाहिजे. मुलांना काय चुकीचं काय बरोबर या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. तसेच त्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
पालकांनी मुलांना त्यांचे विचार, भावना व्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे.
प्रत्येकाने आपल्या मुलांसोबत नेहमी संवाद साधला पाहिजे, त्यांना वेळ दिला पाहिजे.
पालकांनी आपल्या मुलांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या पाहिजेत. त्यांना कोणत्या गोष्टींमध्ये रस आहे या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत.