Parenting Tips : तुमचं मुल दिवसेंदिवस हट्टी बनत चाललंय?, ‘या’ गोष्टी करा, नक्की बदल जाणवेल…
Parenting Tips : आजकालच्या मुलांना गॅजेट्स, व्हीडिओ गेम्स आणि इतर गोष्टींचं एक प्रकारे व्यसनच लागलेलं आहे. बऱ्याचदा मुलं इतकी हट्टी बनतात की त्यांना सांभाळणं पालकांसाठी अवघड होऊन बसतं. या मुलांना कसं सांभाळायचं त्यांचे मूडस्विंग्ज कसे मॅनेज करायचे याविषयी जाणून घेऊयात...
मुंबई : लहान मुलांचं (Child) पालक होणं, त्यांचा साभाळ करणं खायची गोष्ट नाही. या मुलांचे मूड स्विंग्ज् सांभाळणं महाकठीण गोष्ट… जेव्हा मूल लहान असतं तेव्हा ते वारंवार रडतं तेव्हा त्याला शांत करणं पालकांसाठी (Parents) मोठा टास्क असतो. हळूहळू हे बाळ मोठं होऊ लागतं तेव्हा लहान लहान गोष्टीसाठी ते हट्ट करू लागतं. त्याचे हट्ट पुरवणं आणि त्याला आनंदी ठेवणं पालकांसाठी (Parenting Tips) चॅलेंज असतं. आजकालच्या मुलांना गॅजेट्स, व्हीडिओ गेम्स आणि इतर गोष्टींचं एक प्रकारे व्यसनच लागलेलं आहे. बऱ्याचदा मुलं इतकी हट्टी बनतात की त्यांना सांभाळणं पालकांसाठी अवघड होऊन बसतं. या मुलांना कसं सांभाळायचं त्यांचे मूडस्विंग्ज कसे मॅनेज करायचे याविषयी जाणून घेऊयात…
मुलांना स्वप्न दाखवा…
आपण आपल्या पाल्याचे सर्वोत्तम गुरू असतो. त्यामुळे आपल्या पाल्याला स्वप्न दाखवा. मुल एखाद्या गोष्टीची मागणी करतं तेव्हा त्याला ती गोष्ट मिळवण्यासाठी ध्येय ठेवा. अमुक एक गोष्ट केल्यानंतर तुला आम्ही ती वस्तू घेऊन देऊ असं सांगा. असं केल्यानं तुमचं मुल स्वतः वर नियंत्रण ठेवायला शिकेन.
नियम तयार करा
मुलांना चांगलं वागणं शिकवण्यासाठी काही नियम ठरवणं गरजेचं असतं. नियमाची यादी बनवा आणि ते भिंतीवर लावा. जेणेकरून तुमचं मुल त्याकडे दुर्लक्ष करणार नाही. वारंवार त्याला त्याची जाणिव करून द्या. असं केल्यानं मुलामध्ये चांगला परिणाम दिसून येईल. आणि तो चांगली वागणूक अंगीकारेल.
कौटुंबिक वेळ
मुलाला कसे वागावे हे शिकवण्यासाठी, त्याच्याबरोबर वेळ घालवणे खूप महत्वाचे आहे. मुलासोबतचे नाते घट्ट करण्यासाठी त्याच्या आवडीचे जेवण घरीच बनवा. विकेंडला काय करता येईल तेही ठरवा. असं केल्यानं मुल आनंदी होईल आणि प्रत्येक परिस्थितीत हाताळण्याचं कौशल्य त्याच्यात येईल.
संबंधित बातम्या