AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratan Tata Quotes : प्रेरणा देणारे, मनात ऊर्जा निर्माण करणारे रतन टाटा यांचे कोट्स एकदा वाचा

Ratan Tata Quotes : रतन टाटा आज आपल्यामध्ये नाहीयत. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. रतन टाटा ह्यात नसले, तरी त्यांचे विचार नेहमीच प्रेरणा देत राहतील. जगण्यासाठी प्रेरणा देणारे, मनात ऊर्जा निर्माण करणारे रतन टाटा यांचे असेच काही कोट्स एकदा वाचा.

Ratan Tata  Quotes : प्रेरणा देणारे, मनात ऊर्जा निर्माण करणारे रतन टाटा यांचे कोट्स एकदा वाचा
Ratan TataImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 10, 2024 | 12:50 PM
Share

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने फक्त उद्योग विश्वाचच नाही, तर सगळ्या देशाच नुकसान झालं आहे. रतन टाटा हे फक्त यशस्वी उद्योजकच नव्हते, तर त्या पलीकडच व्यक्तीमत्व होतं. रतन टाटा यांनी नेहमीच सामाजिक जाणीवा जपल्या. समाजाच आपण देणं लागतो, या विचारातून त्यांनी नेहमीच सामाजिक कार्यात भरभरुन योगदान दिलं. त्यामुळेच TATA हा ब्रांड सर्वसामान्यांना आपल्या जवळचा वाटतो. रतन टाटा यांच्या निधनाची बातमी ऐकून सगळेच हळहळले. आपल्या कोणीतरी जवळचा माणूस सोडून गेलाय अशी अनेकांची भावना आहे.

रतन टाटा आज हयात नसले तरी त्यांचे आदर्श उच्च विचार, परंपरा नेहमीच प्रेरणा देत राहतील. रतन टाटा हे सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत. ते एक यशस्वी गुंतवणूकदार होते. असंख्य स्टार्टअप्समध्ये त्यांनी गुंतवणूक केली होती.

रतन टाटा यांचे प्रेरणादायक कोट्स

लोखंडाला कोणी नष्ट करु शकत नाही. परंतु गंज लागल्यास लोखंड नष्ट होऊ शकतं. त्याचप्रमाणे कोणीही व्यक्तीला नष्ट करु शकत नाही. पण माणूस त्याच्या मानसिकतेमुळे नष्ट होऊ शकतो.

लोक तुमच्यावर जे दगड फेकतात, ते उचला. त्याचा उपयोग स्मारक बांधण्यासाठी करा.

माझा योग्य निर्णय घेण्यावर विश्वास नाहीय. मी निर्णय घेतो आणि त्यानंतर त्याला योग्य ठरवतो.

ज्या दिवशी मी उड्डाणासाठी सक्षम नसेन, तो माझ्यासाठी दु:खद दिवस असेल.

जीवनात चढ-उतार हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. कारण ईसीजीमध्ये सरळ रेषा येते, त्याचा अर्थ आपण जिवंत नाही असा होतो.

तुम्हाला वेगाच चालायच असेल, तर एकटे चाला. पण तुम्हाला दूरपर्यंत जायचं असेल, तर सोबत चाला.

पराभवाची भिती मनात नसणं हा जिंकण्याचा एकमेव मार्ग आहे.

प्रयत्न न करणं हे सर्वात मोठ अपयश आहे.

गोष्टी नशिबावर सोडायच्या यावर माझा विश्वास नाहीय. कठोर मेहनत आणि तयारीवर माझा विश्वास आहे.

आपलं मूळ कधी विसरु नका. जिथून तुम्ही आलात, नेहमी त्याचा अभिमान बाळगा

तुम्ही मुल्य आणि सिद्धांताशी कधी तडजोड करु नका. भले, तुम्हाला त्यासाठी कठीण रस्त्यावरुन चालाव लागेल.

तुम्हाला एक लढाई जिंकण्यासाठी एकापेक्षा जास्तवेळ लढावं लागू शकत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.