ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत काय?, वजन होईल कमी पण कसं? जाणून घ्या योग्य पद्धत

आजकाल ग्रीन टी पिण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे, वजन कमी करण्यासाठी बहुतेक लोक ग्रीन टी पितात. पण चुकीच्या वेळी आणि पध्दतीने प्यायल्यास फायदा होण्याऐवजी नुकसानच होऊ शकते. जाणून घेऊया तज्ज्ञांकडून ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत.

ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत काय?, वजन होईल कमी पण कसं? जाणून घ्या योग्य पद्धत
ग्रीन ट्री
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 4:35 PM

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेकजण त्यांच्या आहारात बद्दल करतात. तसेच अनेक डाएट पद्धती सुरु करतात. एवढेच नाहीतर आजकाल लोकांना ग्रीन टी प्यायला आवडते. त्यापैकी बहुतेक लोक बारीक होण्यासाठी ग्रीन टी पितात. कारण ग्रीन टी वजन कमी करण्यास मदत करते असं म्हटलं जातं. याशिवाय ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे संपूर्ण आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर असतात. याशिवाय यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आणि अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात.

तुम्ही जर ग्रीन टी पित असाल तर तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. मात्र ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत आणि वेळ फार कमी लोकांना माहित असते. खरं तर ग्रीन टी किंवा कोणत्याही गोष्टीचं सेवन चुकीच्या पद्धतीने किंवा योग्य वेळी न केल्याने त्याचा फायदा होण्याऐवजी आरोग्याच नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पित असाल तर ते पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता म्हणतात की, काही खाल्ल्यानंतर चहाऐवजी ग्रीन टीमध्ये लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. परंतु तुमच्या शरीराचे स्वरूप आणि आरोग्याच्या स्थितीनुसार तुम्ही दररोज ग्रीन टी प्यावे. त्यासोबतच तुम्हला जर ॲसिडिटीची समस्या असेल तर रिकाम्या पोटी ग्रीन टी पिऊ नका कारण यामुळे समस्या वाढू शकते. त्यातच काही लोकांना आरोग्याशी निगडित कोणतीच समस्या नसेल म्हणजेच ॲसिडिटीची समस्या आणि पचनक्रिया चांगली असेल, तर त्या लोकांनी ग्रीन टीमध्ये आवळा किंवा लिंबू मिसळून रिकाम्या पोटी घेऊ शकतात.

जर एखाद्या व्यक्तीला ॲसिडिटीची समस्या असेल तर त्यांनी आधी फळे किंवा नाश्ता करावा. त्यानंतर 30 मिनिटांनी ग्रीन टी पिऊ शकता. पण तुम्हाला आरोग्याच्या स्थितीनुसार आणि शरीराच्या प्रकृतीनुसार ग्रीन टी प्यावे. तसेच तज्ज्ञांच्या मते ग्रीन टीमध्ये कॅफिन असते, त्यामुळे रात्री ते पिणे टाळा. तसेच दिवसा जास्त प्रमाणात याचे सेवन करू नये.

वजन कमी करणे

बरेच लोक वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पितात, परंतु ग्रीन टी पिणे पुरेसे नाही. त्याचबरोबर निरोगी जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही दररोज २५ ते ३० मिनिटे योगा, स्ट्रेचिंग, एक्सरसाइज किंवा झुंबा डान्स सारख्या क्रिया करू शकता. याशिवाय तुमच्या शरीराच्या गरजेनुसार पुरेसे पाणी पिणेही खूप गरजेचे आहे. तसेच बाहेरचे अस्वास्थ्यकर, तळलेले आणि मसालेदार पदार्थ सेवन करणे टाळावेत. संतुलित आहार घ्या. त्याच वेळी, ग्रीन टी कधी आणि कसा प्यावा आणि वजन कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा याबद्दल आपल्या तज्ञांशी बोला. ते तुम्हाला तुमच्या शरीराच्या गरजेनुसार योग्य सल्ला देतील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.