यंदाची संक्रांत गोड होणार, तिळ-गुळाचे दर घसरले

तिळ-गुळाचे दर मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पांढरे तीळ किरकोळ बाजारात 120 ते 130 रुपये किलो आहेत. तर लाल तीळ 150 ते 160 रुपये किलो आहेत.

यंदाची संक्रांत गोड होणार, तिळ-गुळाचे दर घसरले
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 9:43 AM

नागपूर: कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी महागल्या आहेत. असं असलं तरी सर्वसामान्यांची यंदाची संक्रांत मात्र गोड होणार आहे. कारण तिळ-गुळाचे दर कमी झाले आहेत. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातून तिळाची आवक वाढली आहे. त्यामुळे तिळ-गुळाचे दर मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पांढरे तीळ किरकोळ बाजारात 120 ते 130 रुपये किलो आहेत. तर लाल तीळ 150 ते 160 रुपये किलो आहेत. त्यामुळे यंदाची मकरसंक्रांत गोड होणार आहे. (Sesame and jaggery prices fell on the backdrop of Makar Sankranti)

मकर संक्रांतीला तीळगुळाचं महत्व

मकर संक्रांतीला तिळ-गुळाचं अनन्य साधारण महत्वं आहे. नात्यांमध्ये गोडी राहावी या उद्देशानं एकमेकांना तीळगुळ देत गोड-गोड बोलण्याची विनंती केली जाते. तसंच जानेवारी महिन्यात थंडी मोठ्या प्रमाणात असते. थंड वातावरणात शरीराचं रक्षण करण्यासाठी तिळ-गुळ खाल्ले जातात. तीळ आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे. तीळ उष्ण असल्यानं थंडीमध्ये शरीरात उष्णता निर्माण करतात.

खाद्यतेलांच्या दरांमध्ये मोठी वाढ

खाद्यतेलामध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोयाबीन तेलाच्या (Soybean Oil Price Hike) दरामध्ये वाढ झालीय. खाद्यतेलांच्या किमंतीमध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहकांना याचा चांगलाच फटका बसत आहे. काही दिवसांपूर्वी 100 रुपये किलो प्रमाणं मिळणार सोयाबीन तेल 135 रुपयांवर पोहोचलं आहे.

सोयाबीनसह सर्वच खाद्यतेलाच्या किंतीत वाढ झाल्याने, सर्वसामान्यांचं बजेट बिघडलंय. दोन महिन्यात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या खाद्यतेलाचे दर 35 रु. प्रति किलो वाढलेय. त्यामुळे किरकोळ बाजारात सोयाबीन तेलाचा दर आता 135 रुपये किलोंवर पोहोचले आहेत. पाम तेलाच्या दरातंही वाढ झाली असून, किरकोळ बाजारात पाम तेलाचे दर १४५ रुपये किलोंवर पोहोचलेय. यंदा देशात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणात घाटलंय, त्यामुळेच देशात सोयाबीन आणि पामच्या कच्च्या तेलाची 60 टक्के आयात झालीय. आयातखर्च वाढल्यानेदेशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. याचा मोठा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसतोय.

किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे दर

तेल प्रति किलो दर

सोयाबीन 135 रु.

सूर्यफूल 145 रु.

शेंगदाणा 160 रु.

पाम 130 रु.

जवस 130 रु.

राईस 135 रु.

संबंधित बातम्या :

खाद्यतेलांच्या दरांमध्ये मोठी वाढ, सोयाबीन तेलही महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार

Winter Care | हिवाळ्याच्या दिवसांत वाढते संसर्गाची शक्यता, आहारतील ‘हे’ घटक करतील शरीराचे संरक्षण!

Sesame and jaggery prices fell on the backdrop of Makar Sankranti

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.