Apple Side Effects | सफरचंद खाण्याने हृदयविकाराचा धोका होण्याची शक्यता, वाचा याचे दुष्परिणाम

सफरचंद खाण्याच्या फायद्यांबद्दल बहुतेक लोकांना माहिती आहे, परंतु त्यामुळे होणाऱ्या हानीबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल.

Apple Side Effects | सफरचंद खाण्याने हृदयविकाराचा धोका होण्याची शक्यता, वाचा याचे दुष्परिणाम
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 4:09 PM

मुंबई : आपल्या सर्वांना माहित आहे की सफरचंद खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जे लोक दिवसातून एकदा सफरचंद खातात, त्यांना कधीही डॉक्टरकडे जाण्याची गरज नसते, असा सल्ला खुद्द डॉक्टरही देतात. सफरचंदांमध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात, जे आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात. सफरचंदामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह हे घटक मुबलक प्रमाणत आढळतात (Side effects of apple can harm your body).

सफरचंद खाण्याच्या फायद्यांबद्दल बहुतेक लोकांना माहिती आहे, परंतु त्यामुळे होणाऱ्या हानीबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. होय, सफरचंद खाणे आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते. ज्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. चला तर, सफरचंद खाल्ल्याने काय नुकसान होऊ शकते ते जाणून घेऊया…

रिकाम्या पोटी सफरचंद खाऊ नये.

बर्‍याच लोकांना असे वाटते की, रिक्त पोटी सफरचंद खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु तसे नाही, जर आपणही या सवयीचे अनुसरण करत असाल, तर आजच त्यात बदल करा. रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. सफरचंदांमध्ये ग्लूकोज आणि फ्रुक्टोज हे घटक भरपूर प्रमाणात असतात.

ग्लूकोज शरीरातील रक्तात विरघळून जातो. परंतु, फ्रुक्टोज शरीरात जमा होते आणि आपल्या यकृतावर गंभीर परिणाम करतो. फ्रुक्टोजच्या जास्त साठून राहिल्यामुळे, ट्रायग्लिसेराइड्सची चरबी जमा होते. जी हृदयरोगाचा धोका वाढवण्यासाठी जबाबदार आहे (Side effects of apple can harm your body).

साखरेची पातळी वाढते.

सफरचंदमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबर सारखे अनेक पोषक घटक असतात. हे कार्बोहायड्रेट्स शरीराला ऊर्जा प्रदान करतात आणि साखर वाढवण्याचे काम देखील करतात. एका संशोधनात असा दावा केला गेला आहे की, एका सफरचंदात 25 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 5 ग्रॅम फायबर असते. त्यामुळे जास्त सफरचंद खाल्ल्याने चरबी वाढते.

अॅलर्जी

जर आपल्याला मनुका, पीच, जर्दाळू, बदाम आणि स्ट्रॉबेरी यासारख्या गोष्टींपासून अॅलर्जी असेल, तर तुम्हाला सफरचंद खाण्यानेही अॅलर्जी होऊ शकते. सफरचंदाच्या बियांमध्ये सायनाइट नावाची एक गोष्ट आहे जी आपल्या पचन संस्थेसाठी हानिकारक ठरू शकते.

वजन वाढते.

सफरचंदामध्ये कॅलरी आणि साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन वाढते.

अतिसार

सफरचंदांमध्ये पेक्टिन फायबरचे प्रमाण जास्त असते. सफरचंदाच्या सालीतही फायबरची मात्रा चांगली असते. मात्र, यामुळे आपल्याला अतिसारची समस्या उद्भवू शकते. जेव्हा आपले शरीर जास्त प्रमाणात फायबर पचवू शकत नाही, तेव्हा ही समस्या निर्माण होते.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Side effects of apple can harm your body)

हेही वाचा :

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.