Coffee Side Effect | सकाळी-सकाळी ‘कॉफी’ पिण्याची सवय? मग ‘हे’ वाचाच…

सकाळी झोपेतून उठल्यानंतर आळस जरी कमी होत असला, तरीही याचे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

Coffee Side Effect | सकाळी-सकाळी ‘कॉफी’ पिण्याची सवय? मग ‘हे’ वाचाच...
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 10:33 AM

मुंबई : आपल्यापैकी अनेकजण झोप घालवण्यासाठी सातत्याने कॉफी पितात. काहींना तर उपाशी पोटी झोपेतून उठल्यानंतर गरम गरम कॉफी प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आळस जरी कमी होत असला, तरीही याचे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात (Side effects of drinking coffee).

एका रिसर्चनुसार, रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने तुमच्या शरीरात कोर्टिसोल हार्मोनची वाढ होते. कोर्टिसोल हार्मोन आपल्या शरीरात मेटाबॉलिज्म, इम्यून सिस्टम आणि स्ट्रेसचे व्यवस्थापन करण्यास मदत करते. त्यामुळे जर, या हार्मोनची वाढ झाली तर त्याचे शरीरात वाईट परिणाम होऊ शकतात.

सकाळी उठल्यानंतर कॉफी पिणाऱ्या अनेकांमध्ये मूड स्विंग किंवा तणावाचे प्रमाण जास्त असते. मात्र जे लोक रिकाम्या पोटी कॉफी पित नाहीत, त्यांच्यात तणावाचे प्रमाण फार कमी असते. विशेष म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणाऱ्या लोक सर्वाधिक तणावग्रस्त असतात.

कॉफी पिताना ‘या’ चुका करु नका!

कॉफीमध्ये भरपूर कॅफिन असते, जे आपल्या आरोग्यास अतिशय हानिकारक आहे. जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन आपल्या झोपेवर परिणाम करते. कॉफी पिण्यामुळे इनोसॅमिनियाचा धोका वाढू शकतो. हे बर्‍याच संशोधनात सिद्ध झाले आहे. याशिवाय झोपेच्या आधी कॉफी पिणे कटाक्षाने टाळले पाहिजे.

मूत्रपिंडासाठी हानिकारक

कॉफी पिण्यामुळे वारंवार लघवी होण्याची समस्या निर्माण होते. कॉफीमध्ये असलेले कॅफिन आपल्या मूत्रपिंडासाठी हानिकारक आहे. कॉफीमध्ये आढळणारे ऑक्सॅलेट्स रक्तातील कॅल्शियमबरोबर मिसळून कॅल्शियम ऑक्सलेट तयार करतात, जे मूत्रपिंडातील खड्यांचे अर्थात ‘किडनी स्टोन’च्या समस्येचे मुख्य कारण असू शकते (Side effects of drinking coffee).

पाचन तंत्रावर परिणाम

जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन आपल्या पाचन तंत्रावर गंभीर परिणाम करते. कॅफिनमुळे बर्‍याच लोकांना बद्धकोष्ठता आणि पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून कॉफीऐवजी हर्बल चहा किंवा ग्रीन टी पिऊ शकता.

रक्तदाबाचा धोका

संशोधनानुसार जास्त प्रमाणात कॅफिनचा वापर रक्तदाब वाढवण्याचे काम करतो. तथापि, ही समस्या तात्पुरत्या स्वरुपाची असते. मात्र, याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

थकवा / अशक्तपणा

कॉफी पिण्याने आपल्याला काही काळ ऊर्जा मिळेल. परंतु, झोपेच्या कमतरतेमुळे दिवसभराचा थकवा जाणवू शकतो. चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे ‘कॅफिन’ या उत्तेजक द्रव्यामुळे झोप कमी होते. यामुळे अशक्तपणाची समस्या निर्माण होते.

(Side effects of drinking coffee)

हेही वाचा :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.