Skin Care | आयब्रो ट्रीम करताना त्वचेच्या समस्या उद्भवतायत? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!

बर्‍याच स्त्रियांची त्वचा इतकी संवेदनशील असते की, थ्रेडिंग दरम्यान त्यांना खूप वेदना होतात आणि त्यांच्या डोळ्यांतून पाणी निघते. थ्रेडिंग दरम्यान चेहर्‍यावर पुरळ उठते.

Skin Care | आयब्रो ट्रीम करताना त्वचेच्या समस्या उद्भवतायत? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!
भुवयांचा अचूक आकार आपल्याला एक वेगळाच लूक देतो.
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 11:38 AM

मुंबई : स्त्रिया त्यांच्या चेहऱ्यावर विविध उपचार घेत असतात. आपली त्वचा आणि चेहरा सुंदर दिसावा, यासाठी महिला विशेष काळजी घेत असतात. अशा परिस्थितीत महिला त्यांच्या भुवयांकडे अर्थात आयब्रोंकडे विशेष लक्ष देतात. भुवयांचा अचूक आकार आपल्याला एक वेगळाच लूक देतो. भुव्यांचा परिपूर्ण आकार मिळवण्यासाठी अर्थात आयब्रो थ्रेडिंग करण्यासाठी त्या पार्लरमध्ये जातात. हे केवळ आपल्या चेहर्‍याला चांगला आकार देत नाही, तर चेहर्‍यावरील अनावश्यक केसांपासून देखील सुटका होते (Skin care tips after eyebrow threading).

बर्‍याच स्त्रियांची त्वचा इतकी संवेदनशील असते की, थ्रेडिंग दरम्यान त्यांना खूप वेदना होतात आणि त्यांच्या डोळ्यांतून पाणी निघते. थ्रेडिंग दरम्यान चेहर्‍यावर पुरळ उठते. लहान कट मार्क्स देखील येतात आणि त्वचा लालसर होण्याची समस्या होते. सहसा या समस्या अशा लोकांमध्ये घडतात, ज्यांची त्वचा संवेदनशील असते. जर आपलीही त्वचा संवेदनशील असेल, तर आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत ज्याचा वापर करून आपण आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकता.

मॉइश्चरायझर लावा

पार्लरमध्ये आयब्रो ट्रीम करत असताना पावडर लावणे सामान्य आहे. यामुळे केस सहजपणे काढून टाकले जातात. पण, थ्रेडिंग नंतर मॉइश्चरायझर नक्की लावा. पार्लरमध्ये थ्रेडिंग केल्यानंतर भुवयांवर मॉइश्चरायझर आणि क्रीम लावून थोडा वेळ मसाज केल्यास वेदनेपासून आराम मिळतो.

उन्हात बाहेर जाऊ नका

थ्रेडिंग पूर्ण झाल्यानंतर थेट सूर्यप्रकाशात बाहे पडू नका. सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर खाज सुटणे आणि जळजळ होणे वाढते. लालसरपणा देखील सामान्य समस्या आहे. जर तुम्हाला काही कामासाठी उन्हात बाहेर पडायचे असेल, तर मग सूती कापडाने चेहरा झाकून घ्या (Skin care tips after eyebrow threading).

आईस क्यूब आणि कोरफड जेल लावा

थ्रेडिंगनंतर चेहऱ्यावर आईस क्यूब, कोरफड जेल आणि गुलाबपाण्याचा वापर करा. यामुळे खाज कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.

मेकअप लावू नका.

थ्रेडिंगनंतर आपल्या त्वचेची रोम छिद्र उघडली जातात. त्यामुळे कमीतकमी 24 तास मेकअप किंवा क्रीम लावू नका. मेकअप केल्यास त्वचेच्या समस्या वाढतील. जर तुम्हाला पार्टी किंवा फंक्शनमध्ये जायचे असेल तर एक ते दोन दिवस आधी थ्रेडिंग करा.

ब्लिचचा वापर करू नका

थ्रेडिंग केल्यानंतर अजिबात ब्लीचचा वापर करू नका. असे केल्याने आपणास जळजळ आणि खाज सुटण्याची समस्या वाढू शकते. जर आपण ब्लीच केले, आणि त्या जागी खाज आल्यामुळे वारंवार हाताने खाजवले, तर मुरूमं येतात आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

(Skin care tips after eyebrow threading)

हेही वाचा :

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.