AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Garlic Benefits | केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर, त्वचेच्या सौंदर्यासाठीदेखील ‘लसूण’ ठरते गुणकारी!

लसूणच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच सर्दी, सौम्य खोकला, गॅस, आम्लपित्त, सांधेदुखीसारख्या सर्व त्रासांतून आराम मिळतो.

Garlic Benefits | केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर, त्वचेच्या सौंदर्यासाठीदेखील ‘लसूण’ ठरते गुणकारी!
| Updated on: Jan 08, 2021 | 2:35 PM
Share

मुंबई : आरोग्याच्या बाबतीत लसूणचे बरेच फायदे आहेत. लसूणच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच सर्दी, सौम्य खोकला, गॅस, आम्लपित्त, सांधेदुखीसारख्या सर्व त्रासांतून आराम मिळतो. जेवण बनवताना त्यात लसूण घातल्यास पदार्थाची चव अनेक पटींनी वाढते. आरोग्य सुदृढ ठेवण्याबरोबरच लसूण आपल्या त्वचेच्या बर्‍याच समस्यांपासून आराम देऊ शकते. लसूण त्वचेच्या कोणकोणत्या समस्यांसाठी फायदेशीर आहे, याबद्दल जाणून घेऊया…(Skin care tips using Garlic)

चेहऱ्यावरील सुरकुत्यांवर प्रभावी

वयाच्या 40व्या वर्षानंतर चेहऱ्याचे सौंदर्य कमी होण्यास सुरुवात होते. बर्‍याच लोकांची त्वचा या वयात सैल होऊ लागते. या सुरकुत्या लपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. परंतु, बऱ्याचदा त्याचा काही फायदा होत नाही. अशा लोकांसाठी लसूण खूप उपयुक्त आहे. यासाठी लसणाच्या रसात मध आणि लिंबू मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट 10 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्याने आपल्याला काही दिवसात फरक दिसून येईल.

स्ट्रेच मार्क्स दूर करण्यात उपयुक्त

त्वचेवर स्ट्रेच मार्क्सची समस्या बहुतेक स्त्रियांमध्ये दिसून येते. लसूण ही समस्या दूर करण्यात देखील खूप उपयुक्त आहे. स्ट्रेच मार्कची समस्या दूर करण्यासाठी, ऑलिव्ह तेल गरम करा आणि त्यात 3 लसणाच्या पाकळ्या घालून त्या हलके तपकिरी होईपर्यंत व्यवस्थित तळा. हे तेल थंड झाल्यावर स्ट्रेच मार्क्स असलेल्या भागावर लावा आणि मसाज करा. काही दिवस नियमित हा उपाय केल्याने आराम मिळू शकेल (Skin care tips using Garlic).

मुरुमांपासून मुक्तता

मुरुमांमुळे आपल्या चेहर्‍याचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट होते. या समस्येतून मुक्त होण्यासाठी देखील लसूण वापरू शकता. यासाठी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक करून त्यात एक चमचा दही आणि एक चमचा मध मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट मुरुमांवर लावा. सुमारे अर्धा तास नंतर आपला चेहरा पाण्याने धुवा. काही दिवस प्रक्रिया नियमितपणे करा. याशिवाय सकाळी रिकाम्या पोटी लसूण पाकळीचे सेवन करा. हे आपल्यासाठी रक्त शुद्धीकरणाचे काम करेल आणि लवकरच या समस्येतून आपल्याला आराम मिळेल.

ब्लॅकहेड्सपासून मुक्तता

दररोज घराबाहेर फिरून काम करणाऱ्या लोकांना ब्लॅकहेड्सचा त्रास होतो. ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी 2 लसूण पाकळ्या आणि अर्धा टोमॅटो बारीक पेस्ट बनवा आणि 10 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे ब्लॅकहेड्सच्या समस्येतून आराम मिळेल.

या गोष्टींकडे लक्ष द्या!

बर्‍याच वेळा, थेट त्वचेवर लसूण वापरताना एखाद्या व्यक्तीला जळजळ किंवा खाज सुटण्याची समस्या जाणवू लागते. म्हणून चेहऱ्यावर प्रयोग करण्यापूर्वी या पेस्ट हातावर लावून पाहा. जर, तुम्हालाही अशी काही समस्या जाणवू लागली, तर लसूण चेहऱ्यावर वापरू नका.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

(Skin care tips using Garlic)

हेही वाचा :

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.