AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसा झोप येते? हे 3 सोपे उपाय करून बघा

सर्वसाधारणपणे आरोग्य तज्ञ निरोगी प्रौढ व्यक्तीला ८ तासांची निवांत झोप घेण्याचा सल्ला देतात, पण प्रत्येकजण या टिप्स फॉलो करू शकत नाही आणि मग जेव्हा सकाळी उठण्याची वेळ येते तेव्हा झोप डोळ्यांतून जायचं नाव घेत नाही. जर तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास त्रास होत असेल तर आज आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे झोपेपासून सुटका मिळवणे सोपे होईल.

दिवसा झोप येते? हे 3 सोपे उपाय करून बघा
Sleepy in office do these things
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 5:09 PM

मुंबई: सध्याची जीवनशैली खूप बिझी झाली आहे, अशा परिस्थितीत आपल्याला पूर्ण झोप येत नाही आणि मग सकाळी उठणे डोंगर वाहून नेण्यासारखे अवघड होऊन बसते. सर्वसाधारणपणे आरोग्य तज्ञ निरोगी प्रौढ व्यक्तीला ८ तासांची निवांत झोप घेण्याचा सल्ला देतात, पण प्रत्येकजण या टिप्स फॉलो करू शकत नाही आणि मग जेव्हा सकाळी उठण्याची वेळ येते तेव्हा झोप डोळ्यांतून जायचं नाव घेत नाही. जर तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास त्रास होत असेल तर आज आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे झोपेपासून सुटका मिळवणे सोपे होईल.

अलार्म दूर ठेवणे

मोबाईल फोन यायच्या आधी आपण घड्याळांचा जास्त वापर करायचो, पण तंत्रज्ञानाच्या विकासानंतर मोबाइलमध्येच अलार्मची सुविधा आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की फोनमध्ये आपण स्नूज बटन जास्त वापरतो, ज्यामुळे बेड सोडण्यास उशीर होतो. त्यामुळे मोबाइल फोनमधील अलार्म दूर ठेवणे हा उत्तम मार्ग आहे. आपल्याला आवाज ऐकू येईल पण हात तिथे पोहोचू शकत नाही. असे केल्याने अलार्म बंद करण्यासाठी बेडवरून उठावे लागेल आणि मग झोप तुटेल.

कोमट पाण्याचे सेवन

भारतात अनेकांना सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असते, ज्याला बेड टी देखील म्हणतात, परंतु असे केल्याने अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे चहा पिण्याऐवजी कोमट पाण्याचे सेवन करावे, यामुळे आपले शरीर लगेच सक्रिय होते आणि ज्यांना बद्धकोष्ठतेची तक्रार आहे त्यांना आराम मिळतो. हवं तर हलक्या गरम पाण्यात मध आणि लिंबू मिसळू शकता. असे केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

मॉर्निंग वॉक

वरील उपाय करूनही डोळ्यांतून झोप गायब होत नसेल आणि सुस्ती जाणवत असेल तर मॉर्निंग वॉकला जाणं गरजेचं आहे. 3 ते 20 मिनिटे चालण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपले शरीर सक्रिय होईल आणि नंतर आपल्याला परत झोपण्याची आवश्यकता भासणार नाही.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा देत नाही.)