Corona | घरी राहा किंवा बाहेर, सोशल डिस्टन्सिंग कोरोनापासून बचावाचा एकमेव उपाय, संशोधकांचा दावा!

घरी असो किंवा बाहेर, सोशल डिस्टन्सिंग हा कोरोनापासून वाचण्याचा एकमेव उपाय असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

Corona | घरी राहा किंवा बाहेर, सोशल डिस्टन्सिंग कोरोनापासून बचावाचा एकमेव उपाय, संशोधकांचा दावा!
यापैकी 16 टक्के रुग्णांना डोळ्याच्या दुखण्याची लक्षणं आढळली तर फक्त 5 टक्के लोकांनी आधीच डोळ्यांचा त्रास होता अशी माहिती दिली.
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 4:22 PM

मुंबई : चीनच्या वूहान प्रांतातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे (Corona Virus) लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. भारतातही कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. जगभरातील संशोधक या विषाणूवर संशोधन करून, यावरची लस शोधण्याचे काम करत आहेत. यातील एका संशोधनाच्या अहवालानुसार कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका हा जेव्हा आपण कोणत्याही संक्रमित व्यक्तीसह एकाच घरात राहतो, तेव्हा उद्भवू शकतो. कोरोना संबंधित कोणतीही लक्षणे जाणवत असल्यास, त्वरित चाचणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत (Social Distancing is more important to stop Corona Virus Spread).

तसेच, घरी असो किंवा बाहेर, सोशल डिस्टन्सिंग हा कोरोनापासून वाचण्याचा एकमेव उपाय असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

घरात कोरोनाचा धोका अधिक!

इम्पीरियल कॉलेज लंडनच्या संशोधकांना असेही आढळले आहे की, कोणत्याही संक्रमित व्यक्तीसोबत कार्यालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी राहण्याच्या तुलनेत घरी संक्रमित व्यक्तीसोबत राहिल्याने विषाणू पसरण्याची शक्यता वाढते. दुसरी बाब म्हणजे, जर घरात विलागीकरणात राहणारी व्यक्ती 5 दिवसांपेक्षा जास्त काळ पॉझिटिव्ह असेल, तर कुटुंबातील इतर सदस्य संक्रमित होण्याची शक्यता खूप जास्त असते.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हा विषाणू घरातच अधिक पसरतो. अशी अनेक प्रकरणेदेखील आढळली आहेत. विशेषत: जेव्हा कोरोना संक्रमित व्यक्ती स्वतःच्या घरातील एका खोलीत विलगीकरणात असते, अशा घरात हा धोका अधिक असतो.

लक्षणे नसलेले रुग्ण शोधणे अवघड

हा अभ्यास मेटा-विश्लेषणावर आधारित आहे. त्याचवेळी लक्षणे नसलेल्या कोविड रूग्णांमधील संसर्ग थांबविणे देखील एक मोठे आव्हान आहे. कारण बऱ्याच रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसल्यामुळे असे रुग्ण शोधणे आणि उपचार करणे अवघड आहे (Social Distancing is more important to stop Corona Virus Spread).

हेडली थॉम्पसनचे मुख्य लेखक हेली थॉम्पसन म्हणाले, ‘संक्रमित व्यक्तीच्या लक्षणांमध्ये आणि लक्षणे वाढण्याच्या कालावधीत विषाणूच्या प्रसारामध्ये आपण जितका फरक पाहिला आहे, तो आम्हाला विषाणू नियंत्रित करण्यास मदत करेल.’ या व्यतिरिक्त कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संक्रमित व्यक्तीच्या सानिध्यात आलेल्या लोकांची ट्रेसिंग, चाचणी आणि विलगीकरण सर्वात महत्त्वाचे आहे.

कोरोना संसर्गाचे प्रमाण

संशोधकांनी वेगवेगळ्या वातावरणात कोरोना संसर्ग होण्याची शक्यता देखील तपासली. यामध्ये तीन अभ्यासांवरून असे दिसून आले आहे की, कामाच्या ठिकाणी संक्रमणाचा धोका 1.9% होता. प्रवास, धार्मिक कार्यक्रम, फिटनेस वर्ग, खरेदी किंवा कुटुंब आणि मित्रांसह इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये सामील होण्यासह, इतर सार्वजनिक ठिकाणी कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका 1.2% होता. त्यामुळेच घरी असताना किंवा बाहेर जाताना, कोरोनाची लस उपलब्ध झाल्यावरही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Social Distancing is more important to stop Corona Virus Spread)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.