Video: गुमराह तो वो है जो घर से निकले नही, चुकीचे निर्णयही का अनमोल असतात ऐका IPS तेजस्वी सातपुतेंकडून !

तेजस्वी सातपुतेंना तुम्ही ऐकायला सुरुवात केली की, तुमच्या लक्षात येतं, की निर्माण झालेल्या वाटेवरून जाण्यात त्यांना रस नाही. वाटा चोखंदळायच्या आणि स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण करायची हे त्यांचा व्हिडिओ ऐकताना लक्षात येतं.

Video: गुमराह तो वो है जो घर से निकले नही, चुकीचे निर्णयही का अनमोल असतात ऐका IPS तेजस्वी सातपुतेंकडून !
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 6:27 PM

मुंबईः पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते नावातच तेजस्वीपणा असणाऱ्या या पोलीस अधिकारी. सध्या शाळा, कॉलेज ऑनलाईन पद्धतीने सुरु असल्यातरी स्पर्धा परीक्षेचा (Competitive exams) अभ्यास करणाऱ्यांमध्ये तेजस्वी सातपुतेंचा (IPS Tejswi Satpute) एक व्हिडिओ खूप व्हायरल (Viral) झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये एक शेर आहे, मंझिले तो मिल ही जाएंगे, भटकते तो सही घुमराए तो वो हे जो घर से निकले ही नही असं त्यांच्याच आवाजात ऐकताना ध्येयनिष्ठपणा त्यांच्या स्वरातही जाणवतो. तेजस्वी सातपुते या व्हिडिओमध्ये आपला प्रवास सांगताना शिक्षिका असणाऱ्या आपल्या आईपासून सुरु करतात आणि त्यांच्या आयुष्यातील टप्पे आणि कप्पे सांगतात. शालेय जीवनातील काही आठवणी सांगताना त्या व्यवसायमालेचा प्रसंग सांगतात.

शाळेत पुस्तकांविषयी गोडी वाटत असली तरी ते दिवस खेळण्याचे आणि बागडण्याचे असतात. अभ्यासासाठी आई व्यवसायमाला आणून देतात पण दोघी बहीण मात्र त्याच्याकडे डोळेझाक करतात. मग दिवाळीच्या सुट्टीत आई घर साफसफाई करते तेव्हा तिला नव्याकोऱ्या व्यवसायमाला सापडतात. आई म्हणते अभ्यासासाठी याचा काही उपयोग होत नसेल तर थंडीही खूप आहे याची शेकोटी करु तेव्हा, तेजस्वी आणि त्यांच्या बहिणीच्या मनात पुस्तकांविषयी असणारी निरागसता दिसते. पुस्तकं जाळू नये म्हणून आईला त्या विणवणी करतात, तेव्हा शाळेत असणारी त्यांची निष्पाप मनं दिसतात आणि आठवडाभरात व्यवसायमाला त्यांच्या सोडवूनही होतात

निर्मलजित सिंग यांचा आदर्श

तेजस्वी सातपुते व्यवसायमाला सोडवतात आणि त्याच वर्षी त्यांचा केंद्र परीक्षेत नंबर येतो. वीरमरण प्राप्त झालेले वैमानिक निर्मलजित सिंग यांचा आदर्श त्या डोळ्यासमोर ठेवतात, आणि सुरू होतो त्यांचा पायलट होण्याचा प्रवास काही दिवस जातात आणि अकरावीत असताना त्यांना चष्मा लागतो, मग ज्यांना त्यांचं पायलट होण्याच स्वप्न माहित होतं ते म्हणतात, चष्मा लागला मग कसं होता येईल पायलट आणि इथेच त्यांच्या पहिल्या स्वप्नाला तिलांजली मिळते. अकरा बारावीची महत्वाच्या वर्षातच मग दिशाहीन प्रवासाला सुरुवात होते.

तेजस्वी सातपुतेंना तुम्ही ऐकायला सुरुवात केली की, तुमच्या लक्षात येतं, की निर्माण झालेल्या वाटेवरून जाण्यात त्यांना रस नाही. वाटा चोखंदळायच्या आणि स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण करायची हे त्यांचा व्हिडिओ ऐकताना लक्षात येतं. बारावी नंतर त्या जेव्हा बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये गेल्या तेव्हा बी. एस्सी करतानाच त्यांची बेंगळूरमधील एका कोर्ससाठी महाराष्ट्रातून एकटीची तर भारतातून फक्त दहा विद्यार्थ्यांची निवड झाली त्यामध्ये दहामध्ये ती ताठ मानाने उभी होती.

मागच्या बेंचवरच्या पोरांनी आयपीएस होण्याचं स्वप्नं दिलं

बेंगळूरला गेल्यावर तेजस्वी सातुपतेचं मन पुन्हा द्विधा अवस्थेत गेलं आणि ठरलं की आता एम. एस्सी ही नाही आणि पीएचडी ही नाही पुन्हा एलएलबीची वाट धरली आणि त्यातही अव्वल येत आयपीएसमध्ये ती विद्यापीठात पहिली आलेली. पण वर्गातल्या मागच्या बेंचवर पेपर वाचणाऱ्या पोरांना प्राध्यापक जेव्हा बोलू लागले, रागवू लागले तेव्हा पुढं होत तिने विचारले की, इतका वेळ काय आणि कसला पेपर वाचता. या प्रश्नाचं तिला मिळालेल्या उत्तरात तिचं स्वप्न दिसलं आणि पक्कं झालं की आपणही आता यूपीएसस्सीकडे वळायचं आणि मग तिचा सुरू झाला आयपीएस तेजस्वी सातपुते होण्याकडे प्रवास.

आणि मग यूपीएससीचा सुरु झाला प्रवास

अकरावी बारावीत असताना जसं पायलट बनण्याचं स्वप्न होतं आणि त्यावेळी जी मनात भावना येत होती तिच आणि तशीच भावना आणि मन झालेल तेजस्वी सातपुतेला वाटलं. निर्माण झालेल्या वाटेवरुन चालण्यापेक्षा नव्या वाटा धुंडाळणाऱ्या तेजस्वीला पुन्हा यूपीएससीचे वेड लागले. आई वडिलांचे पाठबळ मिळाले आणि मग यूपीएससीचा सुरु झाला प्रवास. आज वर्दीवर दिसणाऱ्या तेजस्वी सातपुते भारी वाटत असल्या तरी त्यासाठी लागणारे कष्ट आणि जिद्दीत त्या तसूभरही कमी पडल्या नाहीत. प्रयत्न करताना जिद्द सोडू नका असा सल्ला द्यायलाही त्या विसरत नाहीत. हे करत असताना त्यांनी जग काय म्हणेल याचा विचार त्या करत बसल्या नाहीत. गाढवाची गोष्ट आठवून त्यांनी जय्यत तयारी केली आणि पहिल्यांदी यूपीएससीची परीक्षा दिली. पहिला प्रयत्नात यश मिळाले नाही  मग आणि थोडे कष्ट घेऊ म्हणत त्यांनी मग मुंबईच्या यूपीएससीसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थे (State Institute For Administrative Careers) त अभ्यासाच्या जोरावर प्रवेश मिळवला, इथंही मोठी गर्दी असताना.

जीव तोडून अभ्यास

मुंबईत अभ्यास करताना घरची आठवण येई हेही त्या प्रांजळपणे सांगतात, मग कधी आई वडिलांना भेटावसं वाटलं की, सकाळची गाडी पकडायची आणि गावात रात्रीचं पोहचायचं मग रात्रभर आई वडिलांबरोबर बोलायचं आणि सकाळी पुन्हा मुंबईचा रस्ता धरायचा हा त्यांचा प्रवास अगदी हे पद मिळेपर्यंत सुरू होता. हा प्रवास सांगताना त्या म्हणतात 2011 मध्ये जीव तोडून अभ्यास केला, परीक्षेच्या काळात पाणी आणि पार्ले-जी बिस्किट खाऊन दिवस काढले आणि परीक्षा दिली, जूनमध्ये पूर्व परीक्षा तर ऑक्टोबर मुख्य परीक्षा दिली आणि नंतर मार्च महिन्यात मुलाखत झाली आणि मे २०१२ मध्ये निकाल लागला त्यात तेजस्वी सातपुते हे नाव तेजासारखं झळकलं होतं. म्हणून त्या व्हिडिओच्या सुरुवातीला आणि शेवटीही म्हणतात मंझिले तो मिल ही जाएंगे भटकते तो सही घुमराए तो वो है जो घर से निकले ही नही. असा हा त्यांचा भन्नाच असणारा प्रवास खरच प्रेरणादायी आहे.

संबंधित बातम्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.