Hair Fall Oils : तुमच्या केसांसाठी उत्तम ठरेल हे तेल, केसगळती होईल दूर

| Updated on: Apr 14, 2023 | 1:26 PM

केसांना तेल लावण्याची योग्य माहिती नसल्यामुळेही आपले नुकसान होऊ शकते. केस गळती रोखणाऱ्या सर्वोत्तम तेलांबद्दल जाणून घेऊया.

Hair Fall Oils : तुमच्या केसांसाठी उत्तम ठरेल हे तेल, केसगळती होईल दूर
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : केसांची काळजी घेण्यासाठी तेल (oil) एक शक्तिशाली एजंट म्हणून काम करते. यामुळे केसांचे पोषण होते आणि टाळूचे आरोग्य (hair health) चांगले राहते. खरंतर, केसांच्या चांगल्या वाढीसाठी टाळू निरोगी असणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, आपण केसांना जास्तीत जास्त 3 वेळा आणि आठवड्यातून किमान 2 वेळा तेल लावण्याचे रुटीन फॉलो केले पाहिजे. मात्र केसांसाठी नक्की कोणते तेल (hair oil) वापरावे, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो.

यासोबतच केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत माहीत नसणे हेही आपले नुकसान करू शकते. केस गळती रोखणाऱ्या सर्वोत्तम तेलांबद्दल जाणून घेऊया.

भृंगराज तेल

केसांना निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी हे आयुर्वेदिक तेल वर्षानुवर्षे वापरले जात आहे. हे केस गळणे कमी करते आणि त्यांची वाढ सुधारते. भृंगराजच्या झाडापासून बनवलेल्या या तेलात फॅटी ॲसिड, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. जे केसांची मुळे मजबूत करण्याचे काम करतात आणि केसगळती कमी होते.

भोपळ्याच्या बियांचे तेल

भोपळ्याच्या बियांपासून बनवलेल्या तेलामध्ये अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात, ज्यांचे काम केस गळणे थांबवणे आणि त्यांची लांबी निरोगी करणे देखील आहे. भोपळ्याच्या बियांच्या तेलात अमीनो ॲसिड असते ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या दाट होतात.

रोजमेरी ऑईल

हे तेल केसांच्या वाढीच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाते. यात वेगळ्या प्रकारचे अमीनो ॲसिड असते जे केस पातळ होण्यापासून रोखते. यामुळे टाळूमध्ये रक्त परिसंचरण अथवा रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची वाढ देखील चांगली होते.

आर्गन ऑईल

आर्गनच्या झाडापासून बनवलेल्या या तेलात फॅटी ॲसिड, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई असते. हे तेल पौष्टिक असते आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्मांसाठी ओळखले जाते. अकाली केस पांढरे होण्याची समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर या तेलामुळे तुम्हाला या त्रासापासूनही आराम मिळू शकतो.