जेवण बनवण्याच्या ‘या’ पद्धती ठरू शकतात आरोग्यासाठी नुकसानदायी, वेळीच याचा वापर टाळा!

अन्न पदार्थ बनवण्यासाठी किंवा साठवून ठेवण्यासाठी, बर्‍याच वेळा लोक अशा गोष्टी वापरतात, ज्यामुळे आपल्या शरीरावर मोठे नुकसान होते आणि याबद्दल आपण अज्ञात असतो.

जेवण बनवण्याच्या ‘या’ पद्धती ठरू शकतात आरोग्यासाठी नुकसानदायी, वेळीच याचा वापर टाळा!
जेवण बनवण्याच्या पद्धती
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 3:18 PM

मुंबई : या धकाधकीच्या आयुष्यात आणि बदलत्या जीवन शैली आपण सगळेच निरोगी राहण्यासाठी चांगल्या आणि पौष्टिक गोष्टी खाण्यावर भर देतो. परंतु, हे पदार्थ बनवण्यासाठी किंवा साठवून ठेवण्यासाठी, बर्‍याच वेळा लोक अशा गोष्टी वापरतात, ज्यामुळे आपल्या शरीरावर मोठे नुकसान होते आणि याबद्दल आपण अज्ञात असतो. या हानिकारक गोष्टींमध्ये फूड पॅकिंग, फॉइल पेपर आणि नॉनस्टिक स्टिक तवा यांचा देखील समावेश होतो. चला तर, जाणून घेऊया अशा काही गोष्टींबद्दल, ज्या आपल्या आरोग्यास हानिकारक ठरतात (These cooking vessel and equipments harmful for health).

अ‍ॅल्युमिनियमची भांडी

गरम झाल्यावर अ‍ॅल्युमिनियमचे ऑक्सिडायझिंग सुरू होते, ज्यामुळे त्यातील हानिकारक घटक आपल्या अन्नात विरघळतात. अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये बनवलेले अन्न सतत खाल्ल्यास मेंदूच्या पेशींवर विपरीत परिणाम होतो. तसेच अल्झायमर, ऑस्टिओपोरोसिस आणि हाडांच्या आजाराचा धोका वाढतो.

अ‍ॅल्युमिनियम फॉईल

आपल्याला बाहेर जावे लागेल किंवा ऑफिसला जावे लागेल, म्हणून बहुतेक लोक अन्न पॅक करून सोबत घेतात. त्यासाठी ते अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा वापर करतात. अ‍ॅल्युमिनियम फॉईल अन्न निश्चितच ताजे ठेवते, परंतु आरोग्यास अनेक प्रकारे नुकसान देखील करते. अ‍ॅल्युमिनियम फॉईल हानिकारक सूक्ष्मजंतूंना वाढण्यास मदत करते. यामुळे पुरुषांना वंध्यत्व, स्मृतिभ्रंश, हाडांची समस्या आणि श्वसनविषयक सर्व समस्यांचा धोका असतो.

नॉन स्टिक भांडी

नॉन स्टिक भांडी खूप सुंदर दिसतात आणि वापरण्यास देखील सोपी असतात. परंतु, ही भांडी आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. नॉन-स्टिक भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्याने, सेवन करण्याऱ्या व्यक्तीच्या शरीरात असे घटक येतात, ज्यामुळे त्यांची हाडे कमकुवत होतात, शरीरात उच्च ट्रायग्लिसरायड्स वाढवतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते आणि स्त्रियांमध्ये वंध्यत्व येऊ शकते. जर यात बराच काळ अन्न शिजवले गेले, तर ते असे घटक उत्सर्जित करते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो (These cooking vessel and equipments harmful for health).

मायक्रोवेव्ह

मायक्रोवेव्हमध्ये स्वयंपाक करताना होणारी रासायनिक प्रक्रिया देखील खाण्यावर वाईट परिणाम करते. यातून उत्सर्जित झालेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणोत्सर्गाचा परिणाम खाण्यावर होतो, यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. गर्भवती महिलांच्या अर्भकाच्या विकासावर परिणाम होतो आणि त्यांच्या मेंदूवर देखील परिणाम होतो. तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते.

प्लास्टिक कंटेनर

प्लास्टिक कंटेनर तयार करण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. जेव्हा आपण त्यात गरम अन्न घालता, तेव्हा त्यातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि ते अन्नासमवेत आपल्या शरीरावर पोहोचतात. यामुळे शरीराचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते.

(These cooking vessel and equipments harmful for health)

हेही वाचा :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.