हिवाळ्यात ‘या’ चुका कराल तर त्वचा नेहमीच राहील कोरडी

जर तुम्हाला हिवाळ्यात त्वचेच्या कोरडेपणाची व खाज सुटण्याची समस्या सतावत असेल तर या चुका करणे टाळावे.

हिवाळ्यात 'या' चुका कराल तर त्वचा नेहमीच राहील कोरडी
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 10:29 AM

नवी दिल्ली – थंडीच्या दिवसात त्वचेच्या कोरडेपणाची (dry skin) समस्या आपल्या सर्वांनाच भेडसावते. थंड वारा त्वचेची आर्द्रता हिरावून घेतो. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक त्वचेवर वारंवार मॉश्चरायझर (moisturizer) लावतात,पम तरीही त्याचा काही फायदा होत नाही. हे होण्याचे कारण म्हणजे, आपण रोज त्वचेची काळजी घेताना अशा काही (mistakes) चुका करतो, ज्यामुळे त्वचा आणखी कोरडी आणि चकचकीत दिसू लागते.

बॉडी मॉयश्चरायझर किंवा बॉडी लोशनद्वारे तुम्ही त्वचेच्या कोरडेपणाच्या समस्या सोडवू शकाल, असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. त्यासाठी आधी काही चुका टाळणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्वचेची काळजी घेताना कोणत्या चुका करू नयेत हे जाणून घेऊया.

स्ट्रॉंग क्लिंजर वापरणे

हे सुद्धा वाचा

थंडीचा ऋतूमध्ये खूप विचारपूर्वक क्लिंजर निवडले पाहिजे. या ऋतूमध्ये अनेकवेळा आपण स्ट्रॉंग क्लिन्जर्स वापरतो, ज्यामुळे त्वचेवर जळजळ होण्याची समस्या अधिक वाढते. म्हणूनच त्वचेचा प्रकार कोणताही असला तरीही, तुम्ही सौम्य फेशिअल क्लिंजर वापरले पाहिजे. हे सौम्य क्लिंजर तुमच्या त्वचेच्या पीएच पातळीला त्रास देत नाहीत, ज्यामुळे त्वचेला जळजळ होणे आणि खाज सुटण्याची समस्या उद्भवत नाही.

अल्कोहोल बेस्ड उत्पादने वापरणे

आजकाल बाजारात अनेक प्रकारची अल्कोहोल बेस्ड उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु थंड हवामानात अशा उत्पादनांचा वापर करणे योग्य नाही. खरं तर, ही उत्पादने तुमची त्वचा आणखी कोरडी करतात. म्हणून, या ऋतूमध्ये स्व:साठी कोणतेही उत्पादन खरेदी करताना, त्याचे लेबल एकदा तपासून पहा. इथाइल अल्कोहोल, आयसोप्रोपाइल अल्कोहोल, बेंझिल अल्कोहोल, इथेनॉल आणि प्रोपेनॉल यांसारखे घटक टाळण्याचा प्रयत्न करा, कारण यामुळे तुमची त्वचा खूप कोरडी होईल.

दररोज स्क्रब करणे

ही एक सामान्य चूक आहे जी लोकं या हंगामात करतात. या ऋतूमध्ये त्वचा कोरडी आणि चकचकीत दिसत असल्याने, ती गुळगुळीत करण्यासाठी आपण दररोज स्क्रबचा वापर करतो. पण असे केल्याने त्वचा अधिक संवेदनशील आणि चिडचिडी होते. त्यामुळे आठवड्यातून एकदाच तुमची त्वचा एक्सफोलिएट करण्याचा प्रयत्न करा. तसेच, त्वचेला एक्सफोलिएट करताना, ओट्स आणि मधासारखी उत्पादने वापरा, कारण ते तुमच्या त्वचेसाठी खूप सौम्य असतात. डेड स्कीन काढून टाकण्यासोबतच ते त्वचा मॉयश्चराइजही करते.

फेशिअल ऑईल न वापरणे

आपल्यापैकी बहुतेकांना वाटते की हिवाळ्यातील कोरडेपणाचा सामना करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोशन किंवा मॉयश्चरायझर वापरणे. पण जेव्हा थंडी खूप वाढते, तेव्हा फक्त मॉइश्चरायझरने त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवता येत नाही. अशा परिस्थितीत, फेशिअल ऑइल वापरणे महत्वाचे ठरते. त्यामुळे त्वचेला पोषण मिळते. तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन फेशियल ऑइल निवडा.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.