फक्त चविष्ट जेवण बनविण्यासाठीच नाही तर हे मसाले तुमच्या चेहऱ्यालाही बनवतात चमकदार!
तुम्हाला माहित आहे का की या गोष्टी महागड्या तसेच त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. तर काही मसाले त्वचेसाठी फायदेशीर असतात. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते मसाले आहेत ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार होऊ शकते?

मुंबई: आजच्या काळात चमकदार त्वचा मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी लोक अनेक प्रकारच्या क्रीम आणि सीरमचा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का की या गोष्टी महागड्या तसेच त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. तर काही मसाले त्वचेसाठी फायदेशीर असतात. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते मसाले आहेत ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार होऊ शकते?
हे मसाले त्वचा चमकदार बनवतात
हळद
हळद शरीरासह त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हळद अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे आणि त्वचेत सुधारणा देखील करते. हळदीच्या वापराने पिंपल्स दूर होतात तसेच चेहऱ्यावरील डागही सहज दूर होतात. त्याचा वापर करण्यासाठी एक चमचा दही, अर्धा चमचा मध, पाव चमचा हळद मिसळून पेस्ट तयार करावी.
जायफळ
जायफळाच्या साहाय्याने त्वचाही सुधारता येते. जायफळ ही एक औषधी वनस्पती आहे जी त्वचेला अंतर्गत रित्या चांगलं करते. त्याचा वापर करण्यासाठी २ चमचे कच्च्या दुधात अर्धा चमचा जायफळ पावडर मिसळून पेस्ट तयार करावी. आता ही पेस्ट चेहऱ्यावर १० मिनिटे लावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.
आलं
आलं शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या वापराने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. चेहऱ्यावर वापरण्यासाठी अर्धा चमचा आल्याचा रस अर्धा चमचा लिंबाचा रस आणि गुलाबपाणी मिसळून मिश्रण तयार करावे.
दालचिनी
दालचिनी आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे. याच्या वापराने पिंपल्स, डाग दूर होतात आणि त्वचा चमकदारही होते. याचा वापर करण्यासाठी दालचिनी पावडर घेऊन गुलाबपाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावा.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)