AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चमकदार त्वचेसाठी वरदान ठरेल हे निळं फळ, चेहऱ्यावरील सुरकुत्यांना मिळेल कायमची सुट्टी

बदलत्या वातावरणामुळे अनेक प्रकारचे त्वचेच्या समस्या निर्माण होताात. यासाठी तुम्ही नियमित या निळया फळाचे सेवन करा, कारण यात असलेले अँटीऑक्सिडंट्स जे नैसर्गिक संयुगे आहेत. हे अँटीऑक्सिडंट्स पेशींना नुकसान करणाऱ्या हानिकारक फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात.

चमकदार त्वचेसाठी वरदान ठरेल हे निळं फळ, चेहऱ्यावरील सुरकुत्यांना मिळेल कायमची सुट्टी
blueberry
| Edited By: | Updated on: Mar 29, 2025 | 7:55 PM
Share

आजकाल प्रत्येकाला त्वचेच्या समस्या या सतावत असतात. कारण वातावरणात होणारे बदल, वेळेवर आहार न घेणे तसेच पुरेशी झोप न घेणे अशा अनेक कारणांमुळे याचा परिणाम चेहऱ्यावरील त्वचेवर होत असतो. त्यामुळे अनेकजण त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब करतात. अशावेळी तुम्ही जर तुमच्या त्वचेवरील वृद्धत्वची समस्या अधिक असल्यास यापासून सुटका मिळवण्यासाठी तुमच्या आहारात ब्लूबेरी या फळाचा समावेश करा.

कारण ब्लूबेरी हे एक असे फळ आहे जे त्याच्या असंख्य पोषक तत्वांसाठी ओळखले जाते. या फळाच्या गुणधर्मांमुळे, याला सुपरफूडच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे म्हणजेच हे फळ कमी प्रमाणात खाल्ले तरी तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. ब्लूबेरीचे फक्त एक-दोन नाही तर अनेक फायदे आहेत. येथे आम्ही तुम्हाला त्याचे काही फायदे देखील सांगणार आहोत.

ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते. जे नैसर्गिक संयुगे आहेत ते शरीराला अकाली वृद्धत्वापासून वाचवतात. हे अँटीऑक्सिडंट्स हानिकारक मुक्त रॅडिकल्सशी लढतात. जे वृद्धत्वाच्या लक्षणांना गती देतात. हृदयरोग, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढवतात. जसजसे तुमचे वय वाढते, तसतसे तुमच्या शरीराची मुक्त रॅडिकल्सशी लढण्याची क्षमता कमी होते. यामुळे मुक्त रॅडिकल्सची पातळी वाढते, विशेषतः जी तुमच्या त्वचेच्या पेशींवर हानिकारक परिणाम करतात. त्यात ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्स नावाचे वनस्पती-आधारित संयुगे असतात. जे ब्लूबेरीला त्यांचा नैसर्गिक जांभळा-निळा रंगास कारणीभूत आहेत. त्यामुळे ते तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतात.

हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त

ब्लूबेरीमध्ये असलेले पोषक तत्व हृदयाचे आरोग्य देखील सुधारतात. एका अभ्यासानुसार, ब्लूबेरीमध्ये असलेले पोषक तत्व आणि समृद्ध आहारामुळे हृदयाचे आरोग्य आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. जेव्हा तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण चांगले असल्यास तुमचे हृदय कोणत्याही समस्येशिवाय पेशींना ऑक्सिजन आणि इतर पोषक तत्वे पोहोचवते.तसेच या परिस्थितीत, तुमच्या शरीरातून हानिकारक घटक देखील बाहेर पडतात.  यामुळे शरीराचे कार्य अधिक प्रभावी होण्यास मदत होते, आणि हृदयाची कार्यक्षमता उत्तम राहते.

कोलेजन वाढवण्यासाठी फायदेशीर

ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्स भरपूर प्रमाणात असतात, जे कोलेजन संश्लेषणात मदत करतात. एका अभ्यासानुसार, ब्लूबेरीच्या सेवनाने कोलेजनचे विघटन कमी होते आणि त्याचे उत्पादन वाढते, ज्यामुळे शरीर तरुण राहते. दुसऱ्या अभ्यासात, ब्लूबेरीयुक्त आहार घेतलेल्या उंदरांमध्ये हाडांमधील कोलेजन उत्पादन वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे, ब्लूबेरीचे सेवन तुमच्यासाठी त्वचा आणि हाडांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.