मूळव्याधचा त्रास होतोय तर ही भाजी आहे रामबाण औषध, 5 सोपे उपाय
मुळव्याध झाला की अनेकांना त्याचा खूप जास्त त्रास होतो. यामुळे खाण्यापिण्यावर बऱ्याच मर्यादा येतात. मुळव्याध होण्याची काही कारणे आहेत. चुकीच्या जीवनशैलीमुळे देखील मुळव्याध होण्याचं प्रमाण वाढत आहे. यामुळे घरगुती काही उपाय केले पाहिजे. आहारात काही बदल केला पाहिजे, सोबत व्यायाम देखील महत्त्वाचा आहे.

Piles Problem : मूळव्याध हा एक वेदना देणारा रोग आहे. ज्यामुळे गुदाशयात रक्तस्त्राव होतो. हा आजार बद्धकोष्ठतेमुळे होतो. मूळव्याध हा बर्याच लोकांमध्ये जुनाट आजार असू शकतो, तर अनेकांना बैठी जीवनशैलीमुळे हा आजार होतो. वयानुसार मूळव्याध होण्याचा धोका वाढतो कारण गुदाशय आणि गुदद्वाराला आधार देणारे ऊतक कमकुवत होतात.
मूळव्याधचे दोन प्रकार आहेत, एक ज्यामध्ये गुदद्वाराच्या बाहेर मस्से असतात ज्यात रक्तस्राव होतो आणि दुसरा ज्यामध्ये रक्तस्त्राव होत नाही. मूळव्याधांवर त्वरित उपचार करणे महत्त्वाचे आहे. आयुर्वेदिक डॉक्टर मिहिर खत्री तुम्हाला पाच आयुर्वेदिक पद्धती सांगत आहेत ज्याद्वारे तुम्ही मूळव्याधच्या गंभीर लक्षणांपासून आराम मिळवू शकता, ज्यामध्ये सुरण भाजीचाही समावेश आहे.
सुरणाची भाजी
जर तुम्हाला मूळव्याधचा त्रास होत असेल आणि तुम्हाला त्यापासून लवकर सुटका करुन घ्यायची असेल तर तुम्ही आहारात सुरणाची भाजी खावी. डॉक्टरांनी सांगितले की, तुपात शिजवलेली ही भाजी आठवड्यातून तीन वेळा खाल्ल्यास आराम मिळतो.
View this post on Instagram
मूळव्याधांवरही ताक हा उत्तम उपचार
ताक सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि शरीरातील पाण्याची कमतरताही पूर्ण होते. यामुळे बद्धकोष्ठता आणि मूळव्याधपासून आराम मिळू शकतो.
तूप मिसळून दूध प्या
मुळव्याधच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक कप कोमट दुधात १ चमचा देशी गाईचे तूप मिसळून प्यावे. हे तुम्हाला आतड्याच्या हालचालींना चालना देण्यास मदत करू शकते.
खूप पाणी प्या
पाणी न पिणे हे बद्धकोष्ठतेचे सर्वात मोठे कारण आहे. पाणी प्यायल्याने अन्न पचण्यास मदत होते. दिवसभर भरपूर पाणी प्यावे.
रात्री हलके जेवण
जर तुम्ही रात्री मांस किंवा इतर जड अन्न खात असाल तर तसे करणे तुम्ही टाळावे. या सवयीमुळे बद्धकोष्ठता निर्माण होते. रात्रीचे जेवण लवकर खावे आणि जेवण खूप हलके असावे. याशिवाय मूळव्याधच्या वेदना आणि सूज यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दररोज 10 मिनिटे कोमट पाण्यात बसावे, याला सिट्झ बाथ असेही म्हणतात.
अस्वीकरण: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. कोणतीही समस्या असली की अधिक माहितीसाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.