Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!
महिलांना त्यांच्या चेहऱ्यावर वस्तरा अर्थात रेझर वापरताना अनेक शंका-कुशंका मनात येतात.
मुंबई : आपल्या चेहऱ्यावरील लव अर्थात नको असलेले केस काढून टाकण्यासाठी महिला वेगवेगळ्या पद्धती वापरतात. आजकाल तर यावर उपाय म्हणून वॅक्सिंग, लेसर हेअर रिमुव्हल ट्रीटमेंट, हेअर रिमुव्हल क्रीम आणि रेझर या सगळ्या पद्धतींचा वापर करतात. जेव्हा शरीराच्या इतर भागावरील नको असलेले केस काढण्याची वेळ येते तेव्हा त्या रेझर वापरतात. परंतु, जेव्हा चेहऱ्यावरील लव काढण्याची वेळ येते तेव्हा, रेझरने शेविंग करण्याबाबत त्या बऱ्याच गोंधळात असतात (Tips for Easy Hair removal by razor).
महिलांना त्यांच्या चेहऱ्यावर वस्तरा अर्थात रेझर वापरताना अनेक शंका-कुशंका मनात येतात. त्यांना वाटते की, त्यांच्या चेहऱ्यावर रेझर वापरल्याने भविष्यात आणखी जाड केस देतील. यासह, त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतील. चला तर, या शंका दूर करूया आणि चेहऱ्यावर रेझर वापरण्याने नुकसान होते का? किंवा ते कसे वापरावे हे जाणून घेऊया…
चेहऱ्यावर दाट केस येणार नाहीत.
चेहऱ्यावर रेझर वापरल्याने तुमच्या त्वचेला कोणतीही हानी होत नाही. जर आपण ते योग्यरित्या वापरले तर आपल्या चेहऱ्यावर कोणताही जखम होणार नाही. यासाठी चेहऱ्यावर रेझर वापरताना, त्यावर जास्त दबाव आणू नका. ज्या दिशेने केसांची ग्रोथ होत असते, नेहमी त्याच दिशेने रेझर फिरवा. उलट दिशेने रेझर फिरवू नका. त्याने जखम होऊ शकते.
ब्लेडची निवड
जेव्हा आपण रेझर खरेदी करता, तेव्हा आपल्या चेहऱ्यावरील केस सहजपणे काढून टाकेल अशी ब्लेड निवडा. यावेळी आपण शेव्हिंग सोल्यूशन किंवा साबण देखील वापरू शकता (Tips for Easy Hair removal by razor).
कसे वापराल रेझर?
दाढी करण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर साबणाचा फेस किंवा शेव्हिंग फोम लावा आणि हलक्या हातांनी रेझर वापरा. ज्या दिशेने केसांची ग्रोथ होत असते, नेहमी त्याच दिशेने रेझर फिरवा. कोणत्याही प्रकारचे संक्रमण टाळण्यासाठी ब्लेड स्वच्छ ठेवा. तसेच, हे केस काढत असताना आपल्या हातांनी त्वचेवर जास्त दाब टाकू नका.
याचा फायदा…
वॅक्सिंग चेहर्यावरील नको असलेले केस काढते, मात्र या पद्धतीत प्रचंड वेदना होतात. चेहऱ्यावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. याशिवाय त्वचेवर खाज आणि पुरळ येण्याची समस्या देखील उद्भवते. तथापि, रेझर वापरल्याने तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही आणि केसही सहजपणे काढले जातील. त्यामुळे आता चेहऱ्यावरील केस काढून टाकण्यासाठी आपल्याला पार्लरमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही. आपण स्वत: चेहऱ्यावरचे नको असलेले केस घरीच काढू शकता. यामुळे आपला वेळ तसेच पैशाची देखील बचत होईल.
(टीप : सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा
(Tips for Easy Hair removal by razor)
हेही वाचा :
ऐन पंचविशीतच केस पांढरे होतायत? ‘या’ नैसर्गिक रंगांनी मिळेल केसांना पोषण!https://t.co/G05u3KmbQN#GreyHair #NaturalHairColour #haircare
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 23, 2020