Fitness | नवरात्रीच्या उपवासादरम्यान ‘या’ गोष्टींकडे द्या आणि स्वतःला फिट ठेवा!
काही लोक नवरात्रीचे उपवास ठेवतात. या नऊ दिवसात सात्विक भोजन करून, शरीराला डिटॉक्स करण्याचा प्रयत्न करतात.
मुंबई : नवरात्र (Navratri) उत्सव संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवींची पूजा केली जाते. काही लोक नवरात्रीचे नऊ दिवस उपवास (Navratri Fast) ठेवतात. या नऊ दिवसात सात्विक भोजन करून, शरीराला डिटॉक्स करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, बर्याच वेळा लोक उपवासाला फराळावर ताव मारतात आणि त्यांचे वजन कमी (Weight Loss) होण्याऐवजी वाढते. (Tips For Weight Loss During Navratri Fast)
तुम्हालाही या नवरात्रीतील उपवासाचा लाभ घ्यायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी अशा काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्हीदेखील तुमचे वजन कमी करू शकता. उपवास करणे हा वजन कमी करण्याचा एक चांगला मार्ग आहे. यासह, आपण आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिल्यास तंदुरुस्त आणि टोन्ड बॉडी मिळवू शकता.
डाएट प्लॅन आधीच ठरवा.
आधीच नियोजन न केल्याने आपण आत्यावेली वेफर्स, खिचडी, चिप्स असे काहीहीपदार्थ फराळ म्हणून खातो. याचसाठी आपण उपवास करणार असाल तर, आधीच डाएट प्लॅन ठरवून घ्या. एकदिवस अगोदर डाएट प्लॅन निश्चित केल्यास आयत्यावेळी काहीही खाण्याची वेळ येणार नाही. डाएट प्लॅन बनवताना कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, फॅट आणि फायबर हे घटक योग्य प्रमाणात आहेत का, हे तपासा.( Tips For Weight Loss During Navratri Fast)
थोड्या-थोड्यावेळाने खात राहा.
एकाच वेळी खूप खाण्यापेक्षा, थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने खात राहा. यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी प्रमाणात राहील आणि संपूर्ण दिवस तुम्हाला उत्साही वाटेल.
हायड्रेटेड राहा.
योग्य आहार जितका गरजेचा आहे, तितकेच शरीर हायड्रेटेड राहणे देखील गरजेचे आहे. शरीर हायड्रेटेड राहावे म्हणून, नारळ पाणी, ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी पीत राहावे. याने शरीरातील पाण्याची पातळी समतोल राखली जाईल. (Tips For Weight Loss During Navratri Fast)
हलका फराळ निवडा.
उपवासाच्या वेळी अनेक लोक वेफर्स, चिप्स, पुरी, बाजारात मिळणारा तयार रस, तळलेले पदार्थ खातात. परंतु, हे पदार्थ आपल्या शरीरासाठी घातक ठरतात. या ऐवजी फराळ म्हणून साबुदाणा खिचडी, भेळ, मखाणा किंवा चणे हे पदार्थ खाऊ शकता.
चहा-कॉफीचे प्रमाण कमी करा.
चहा आणि कॉफीमध्ये ‘कॅफेन’चे प्रमाण अधिक असते. कॅफेनमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. म्हणून उपवासादरम्यान शक्यतो चहा-कॉफीचे सेवन कमी करावे, अथवा टाळावे.
(Tips For Weight Loss During Navratri Fast)
संबंधित बातम्या :
दिवाळीत गोड पदार्थ खाऊनही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टिप्स