Special Story | महाराष्ट्रातलं ‘कैलास’, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं ‘भीमाशंकर’

महाराष्‍ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात 'भीमाशंकर' हे तीर्थक्षेत्र आहे.

Special Story | महाराष्ट्रातलं 'कैलास', सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं 'भीमाशंकर'
महाराष्‍ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात 'भीमाशंकर' हे तीर्थक्षेत्र आहे.
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 8:26 AM

मुंबई : संपूर्ण महाराष्‍ट्रला मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यातल्या त्यात पर्यटनाच्या दृष्टीने विचार केल्यास महाराष्‍ट्र खूप समृद्ध आहे. महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैका पाच आपल्या महाराष्‍ट्रात आहे. ‘सह्याद्री’च्या कुशीत वसलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग त्यापैकीच एक आहे. या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूरला ‘चंद्रभागा’ म्हणून ओळली जाणारी भीमा नदी चक्क शिवलिंगातून प्रकट झाली आहे. त्यामुळे अतिशय घनदाट जंगलात असलेले भीमाशंकर तीर्थक्षेत्र आता महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे(Travel Special story on Bhimashankar trek).

महाराष्‍ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात ‘भीमाशंकर’ हे तीर्थक्षेत्र आहे. शिवशंकर अर्थात महादेवाच्या घामातून भीमा नदी प्रकट झाल्याचा उल्लेख शिवपुराणात आढळतो. भीमा नदी ही दक्षिण-पश्चिम वाहणारी असून, रायपूर जिल्ह्यात ती कृष्णा नदीला मिळते. विशेष म्हणजे पंढरपूरला ती ‘चंद्रभागा’ म्हणून ओळखली जाते.

घनदाट भीमाशंकर अभयारण्य!

भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले असल्याने हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 3250 फूट उंचीवर आहे. 1984 साली या घनदाट जंगलाची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.

भीमाशंकरची पदभ्रमंती

निसर्गसौंदर्याने नटलेले भीमाशंकर, सदाहरित जंगलामुळे या परिसरात पदभ्रमण करणे हा वेगळाच सुखद अनुभव आहे. पावसाळ्यात तर त्याचे सौंदर्य अधिकच खुलते. हिरव्याकंच पर्णभाराने लगडलेल्या वृक्षांवर गोड कूजन करणारे बुलबुल, फुलाफुलांवर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, आकर्षक रंगांनी मन आकर्षित करून घेणारे तऱ्हेतऱ्हेचे कीटक, या सर्वांचे निरीक्षण करणे हा एक विलक्षण अनुभव असतो. रोजच्या धकाधकीच्या शहरी जीवनाचा उबग आलेल्यांना तर हा परिसर म्हणजे नंदनवनच वाटावा, यात काहीच आश्‍चर्य नाही. हिवाळ्यात धुक्‍याच्या तरल पडद्याआडून हळूच डोकावणारी वृक्षवल्लरी क्षणार्धात शहरी शीण आणि ताणतणाव घालवून टाकते. या संपूर्ण परिसराला लाभलेल्या हिरव्या कोंदणामुळे या पवित्र भूमीला भाविकांबरोबरच निसर्गप्रेमींचाही स्वर्ग म्हणायला हरकत नाही.

‘भीमाशंकर’ नावाचा इतिहास

इतर स्थळांप्रमाणे या ठिकाणी पौराणिक गोष्टी व त्यावरून पडलेले या ठिकाणाचे नाव यामागची कथा ऐकायला मिळते. पुराणात त्रिपुरासुराचा वध करून भगवान शंकर विश्रांतीसाठी येथे आले असता तेथे अयोध्येचा ‘भीमक’ नावाचा राजा तप करीत होता. भगवान शंकराने प्रसन्न होऊन भीमकास वर मागण्यास सांगितले. त्यावेळी त्याने ‘शंकराला आलेल्या घामाच्या धारांची नदी होऊ दे’, असा वर मागितला व त्याप्रमाणे भीमेचा उगम झाला व भीमक राजाच्या नावावरून या नदीस भीमा हे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. दुसरी अजून एक अशीच कथा सांगितली जाते की, त्रिपुरासूर नावाच्या दैत्याने या भागात फारच धुमाकूळ घातला होता. त्याचा नाश करण्यासाठी भगवान शंकरांनी प्रचंड असे ‘भीमरूप’ धारण केले. अनेक रात्र चाललेल्या या युद्धात त्रिपुरासूराचा वध झाला. त्यावेळी भगवान शंकर घामाघूम होऊन येथील शिखरावर बसले. त्यांच्या अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारेतून ‘भीमा’ नदी उत्पन्न झाली (Travel Special story on Bhimashankar trek).

Bhimashankar

काय काय पाहाल?

गुप्त भीमाशंकर

भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किमी पूर्वेला पुन्हा प्रकट होते, असे मानले जाते. ही जागा ‘गुप्त भीमाशंकर’ म्हणून ओळखली जाते.

कोकण कडा

भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारण 1100 मीटर इतकी आहे. येथून निसर्गाचे विलक्षण रूप पाहायला मिळते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबीसमुद्रही दिसू शकतो.

सीतारामबाबा आश्रम

कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते

नागफणी

आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून 1230 मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.

कसे पोहोचाल?

भीमाशंकरला रस्त्याने जायला पुणे-नगर रस्त्यावरच्या मंचरला फाटा आहे. मुंबईहून हे अंतर अडीचशे-पावणेतीनशे किमी इतके आहे. पुण्याहून भीमाशंकर 168 किमी आहे. मुंबईहून जायला दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे कल्याणनगर रस्त्याने मुरबाड, माळशेज घाट पार करत आळेफाटा गाठायचे. पुढे पुण्याच्या दिशेला असलेल्या नारायणगावमार्गे मंचरला वळायचे. दुसरा मार्ग म्हणजे मुंबई-पुणे मार्गावरील लोणावळा ओलांडून तळेगावहून आतल्या रस्त्याने राजगुरूनगर मार्गे मंचर गाठायचं. मंचर-भीमाशंकर हे अंतर साधारण 70 किमी असून मार्ग दाट जंगलाचा व निर्जन आहे.

कोकणातून भीमाशंकरला पायी जाण्याचा मुख्‍य मार्ग खांडसहून आहे. कर्जत खांडस अंतर सुमारे 14 किमी आहे. कर्जत-मुरबाड रस्त्यावर कशेळे आहे. इथून खांडसला जायचे वळण आहे. खांडसहून भीमाशंकरचा ट्रेक साधारण अकरा किमीचा खड्या चढणीचा आहे. इथूनदेखील माथ्यावर जाणारे दोन मार्ग आहेत. दोन्ही वाटा डोंगराच्या पहिल्या पठारावर एकत्र येतात. यातील एक मार्ग ‘गणपतीघाट’ या नावाने ओळखला जातो. तर, दुसरा मार्ग शिडीचा रस्ता म्हणून डोंगर भटक्यांना परिचित आहे. या मार्गातली तीन-चार ठिकाणे अतिधोकादायक आहेत. इथे दोन ठिकाणी कपरीत शिड्या लावलेल्या आहेत. ट्रेकींगची सवय असणाऱ्यांना या साहसी मार्गानेच जायला आवडते.

(Travel Special story on Bhimashankar trek)

हेही वाचा :

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.