Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिनी महाबळेश्वर दापोली किल्ले, गुहा, मंदिर, निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध, वीकेंड ट्रीपसाठी एक नंबर डेस्टिनेशन

दापोलीला महाराष्ट्राचं मिनी महाबळेश्वर असं देखील म्हटलं जाते. वीकेंड ट्रीपसाठी हे एक नंबर डेस्टिनेशन आहे.(Dapoli)

मिनी महाबळेश्वर दापोली किल्ले, गुहा, मंदिर, निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध, वीकेंड ट्रीपसाठी एक नंबर डेस्टिनेशन
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 7:49 PM

रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली हे छोटं थंड हवेचे ठिकाण आहे. इथं वर्षभर थंड वातावरण असतं. येथील किल्ले, मंदिर आणि गुहा, निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. दापोलीला महाराष्ट्राचं मिनी महाबळेश्वर असं देखील म्हटलं जाते. दापोलीमध्ये केशवराज मंदिर, गरम पाण्याचे झरे, हर्णे बंदर आणि समुद्र किनारा, गणेश मंदिर पाहता येतं. वीकेंड ट्रीपसाठी दापोली एक नंबर डेस्टिनेशन आहे. (Dapoli is nice destination for weekend trip)

केशवराज मंदिर

दापोलीतील केशवराज मंदिर हे पेशवेकालीन वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. येथील वातावरण शांत असते. केशवराज मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी एका छोट्या मार्गानं जावं लागते. येथे नारळ, सुपारी, आंबा आणि काजूच्या झाडांच्या बागा देखील आहेत.

गरम पाण्याचे झरे दापोलीमध्ये गरम पाण्याचे झरे आहेत. येथील पाण्याला गंधकाचा वास येतो. या पाण्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. या पाण्याचा वापर केल्यास त्वचासंबंधी आजार बरे होत असल्याचे सांगितले जाते. या जवळच मोठं जंगल आहे आणि शंकराचे मंदिर आहे.

हर्णे बंदर

फतेहगड, कनकदूर्ग आणि सुवर्णदूर्ग किल्ला पाहिल्यानंतर पर्यटकांना कोकणातील जुनं लाईटहाऊस हरनाई पाहायला मिळते. हरनाई लाईट हाऊसजवळ पोहोचल्यानंतर विस्तीर्ण समुद्र पाहता येतो.

गणेश मंदिर दापोली तालुक्यातील अंजारळे गावात एक गणेश मंदिर आहे. येथील गणपतीला कादीवार्चा गणपती म्हटलं जातं. त्यांमंदिराचे बांधकाम 12 व्या शतकात झाल्याचे म्हटले जाते. उंच ठिकाणी असलेल्या मंदिराजवळ गेल्यानंतर अरबी समुद्र, सुवर्णदूर्ग आणि हर्णे बंदर पाहायला मिळते. महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातील महत्वाचे व्यक्ती लोकमान्य टिळक, साने गुरुजी, महर्षी कर्वे यांच काही काळ वास्तव्य दापोली परिसरात होते. (Dapoli is nice destination for weekend trip)

कसे पोहोचणार?

दापोलीला जाण्यासाठी आपणाला विमान सेवा, रेल्वे, रस्ते या तीन मार्गांनी जाता येते. रत्नागिरीपर्यंत विमानसेवा उपलब्ध आहे. रत्नागिरीपासून दापोली 127 किलोमीटरवर आहे. दापोलीपासून जवळचे रेल्वे स्टेशन खेड असून ते 29 किलोमीटर अंतरावर आहे. दापोली मुंबईपासून 220 आणि पुण्यापासून 185 किलोमीटरवर आहे. सर्वात योग्य पर्याय म्हणून आपण रस्ते मार्गाचा वापर करु शकतो. रस्ते मार्गानं दापोलीला जाण योग्य पर्याय आहे.

संबंधित बातम्या: 

Photos | संगमनेरमधील हरिश्चंद्र बालाघाट रांगेतील रुबाबदार आणि आखीवरेखीव ‘ढुम्या डोंगर’

पालघरमध्ये सतत भूकंप का येतो? ‘हे’ यंत्र शोध लावणार!

दापोलीच्या समुद्रात तीन गाड्या बुडाल्या, स्थनिकांच्या मदतीने गाड्या बाहेर काढण्यात यश

(Dapoli is nice destination for weekend trip)

वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.