Meghalaya | नववर्षात मेघालय-कामाख्या देवी दर्शनाची संधी, IRCTC चे स्वस्तात टूर पॅकेज
तुम्हीही नवीन वर्षात मनाला प्रफुल्लित करणा-या आणि स्वस्तात उपलब्ध होणा-या डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉरपरेशन लिमिटेडने ( IRCTC) खास स्वस्त टूर पॅकेजची घोषणा केली आहे.
मुंबई : तुम्हीही नव वर्षात नव्या डेस्टिन्शेनला जाण्याचा प्लॅन करत असाल तर इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉरपोरेशन लिमिटेडने (IRCTC) तुमच्यासाठी काही खास टुर पँकेजची घोषणा केली आहे. यामध्ये तुम्हाला मेघालय आणि कामाख्या देवीच्या दर्शनाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याशिवाय इतर ही अनेक रोमहर्षक आणि किफायतशीर टूर पॅकेज आयआरसीटीसी घेऊन आले आहे. आसाम आणि मेघालय मधील नैसर्गिक सौंदर्य बघण्याची नामी संधी या पॅकेजमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. www.irctctourism.com या IRCTC च्या संकेतस्थळावर (website) जाऊन तुम्ही टूर पॅकेजसाठी बुकिंग करु शकता.
मेघालय आणि कामाख्या देवीचे दर्शन
पॅकेजचे नाव – Mesmerizing Meghalaya with Kamakhya Darshan
डेस्टिनेशन – मव्ल्यनोंग, चेरापुंजी, शिलांग, गुवाहाटी
ट्रॅव्हलिंग मोड – फ्लाईट
फ्लाईट डिटेल्स – इंडिगो
फ्लाईट क्रमांक ः (6E-669/6344) 11.02.2022 रोजी इंडिगो एअरलाईंन्स सकाळी 9.05 वाजता उड्डाण करुन 4.40 वाजता पोहचेल.
परतीचा प्रवास ः फ्लाईट क्रमांक (6E-394/7264) 15.02.2022 रोजी इंडिगो एअरलाईन्स दुपारी 12.15 वाजता निघेल, रात्री 19.30 वाजता पोहचेल.
Explore #NorthEast #India‘s myriad treasures with this exciting 5D/4N ‘Mesmerising Meghalaya with Kamakhya Darshan’ air tour package starting at Rs.29,650/-pp*. #Booking & #details on https://t.co/aoqmQdE6LR *T&C Apply
— IRCTC (@IRCTCofficial) December 15, 2021
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (IRCTC) त्यांच्या ट्विटर हँडलवरुन यासंबंधी ट्वीट करत टूर पॅकेजची माहिती दिली. त्यानुसार, मव्ल्यनोंग, चेरापुंजी, शिलांग, गुवाहाटी या टूर पॅकेजची माहिती त्यांनी दिली आहे. या संपूर्ण टूरची माहिती, त्याचा खर्च याचीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आपण ही पूर्वांचल राज्यांना भेटण्यासाठी आणि तेथिल प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी इच्छुक असाल तर IRCTC च्या ट्विटर हँडलवर जाऊन आपण थेट माहिती घेऊ शकता. या ट्विटमध्ये एक लिंक शेअर करण्यात आली आहे. https://bit.ly/3GhesvZ या लिंकवर जाऊनही तुम्ही बुकिंग करु शकता. या टूरची, पॅकेजची आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांनी दिलेल्या 8287932242, 8287932329 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
केव्हा होणार टूर सुरु
मव्ल्यनोंग, चेरापुंजी, शिलांग, गुवाहाटी हा टूर 11 फेब्रुवारी 2022 रोजीपासून सुरु होईल. 15 फेब्रुवारी 2022 रोजी तो संपेल. या दरम्यान तुम्हाला कामाख्या देवीचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
असे असेल पॅकेज
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (IRCTC) घोषीत केलेले हे टूर पॅकेज 4 रात्र आणि 5 दिवसांचे असेल. यामध्ये तुम्हाला मेघालय आणि कामाख्या देवीचे दर्शन घडेलच. सोबतच नोहकलिकाई फॉल्स, मौसमी केव्स, डौकी लेक, डॉन बॉस्को म्यूझियम, ब्रम्हपूत्र नदीसह अनेक ठिकाणे दाखविण्यात येणार आहे.
अशी आहे किंमत
या टूर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती ठरविण्यात आली आहे. एका व्यक्तीसाठी 39300 रुपये, दोघांसाठी 30200 रुपये, तिघांसाठी 29,650 रुपये. तर चाईल्ड विथ बेड (5 ते 11 वर्षांमधील) 28150 रुपये, चाईल्ड विदआउट बेड(5 ते 11 वर्षांमधील) खर्च हा 23550 रुपये इतका आहे. 18 वर्षांवरील यात्रेकरुंनी कोविड-19 (Covid-19) ची लस घेणे अनिवार्य आहे.
संबंधित बातम्या :
ख्रिसमस जवळ आलाय, मग लहान मुलांना खूष करण्याच्या भन्नाट आयडिया हव्यात, वाचा एका क्लिकवर
स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस की तुमची एनिवर्सरी, आम्ही करणार तुमची डेट खास