Christmas 2020 | ‘जिंगल बेल, जिंगल बेल’ म्हणत चिमुकल्यांना भेटवस्तू देणारे ‘सांताक्लॉज’ नेमके कोण?

दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने पांढरी दाढी आणि पांढरे केस असलेला सांता लाल रंगाचे कपडे आणि टोप्या घालून येतो.

Christmas 2020 | ‘जिंगल बेल, जिंगल बेल’ म्हणत चिमुकल्यांना भेटवस्तू देणारे ‘सांताक्लॉज’ नेमके कोण?
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 11:19 AM

मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकालाच बालपणी सांताक्लॉजची कहाणी सांगितली गेली असेल. दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने पांढरी दाढी आणि पांढरे केस असलेला सांता लाल रंगाचे कपडे आणि टोप्या घालून येतो. त्याच्या हातात एक भली मोठी बॅग असते, ज्यामध्ये त्याने बऱ्याच भेटवस्तू ठेवलेल्या असतात. जी तो सगळ्या लहान मुलांमध्ये वाटतो. पण तुम्हाला माहित आहे की, खरा सांता कोण होता? चला तर जाणून घेऊया… (True Story of Real Santa Claus)

संत निकोलस होते खरे सांता!

सेंट निकोलस यांचा जन्म तिसऱ्या शतकात उत्तर ध्रुवावर स्थित मायरा येथील एका श्रीमंत कुटुंबात झाला होता. या संत निकोलस यांनाच खरा सांता म्हणतात. ते लहान असताना अनाथ होते. त्यानंतर, येशूवर त्याचा विश्वास वाढत गेला आणि त्यांनी स्वतःचे पालक म्हणून येशूचा स्वीकार केला. पुढे संत निकोलस मोठा झाल्यावर ख्रिस्ती धर्माचा धर्मगुरू बनला.

निकोलस यांना लोकांची मदत करण्याचा छंद

संत निकोलस यांना सुरुवातीपासूनच लोकांना मदत करणे आवडत होते. ते लोक, विशेषतः लहान मुले, ज्यांना परिस्थितीमुळे स्वतःच्या इच्छा पूर्ण करता येत नव्हत्या.  निकोलस या मुलांना ख्रिसमसच्या दिवशी भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करायचा. परंतु, त्याला त्याची ओळख कोणालाही सांगायची इच्छा नव्हती, म्हणून तो कपडे बदलून मध्यरात्री घरातून बाहेर पडायचा. आपल्या भल्यामोठ्या झोळीतून ते सर्व मुलांना आणि गरजूंना भेट वस्तू वाटून देत (True Story of Real Santa Claus).

1930 साली समोर आला सांताचा नवा लूक

आधुनिक काळातील सांता 1930 साली अस्तित्वात आला. हेडन सँडब्लोम नावाच्या एक कलाकाराने कोका-कोलाच्या जाहिरातीमध्ये सांताक्लॉजची भूमिका साकारली होती. जवळपास 35 वर्ष तो सांता म्हणून टीव्हीवर झळकला. लाल कपड्यांमध्ये पांढरी दाढी असलेल्या सांताचे हे नवीन रूप मुलांना खूप आवडले. त्यानंतर सांताची क्रेझ वाढत गेली आणि तो लहान मुलांचा आवडता बनला.

सेंट निकोलस यांच्या उदारपणाची प्रसिद्ध कथा

सेंट निकोलस यांच्या उदारपणाची एक अतिशय प्रसिद्ध कहाणी म्हणजे त्यांनी एका गरीब माणसाला मदत केली होती, ज्याच्याकडे त्याच्या तीन मुलींचे लग्न करण्यास पैसे नव्हते. तो माणूस आपल्या मुलींना जबरदस्तीने मजुरी आणि देह विक्री व्यापारात ढकलत होता. त्यावेळी, संत निकोलसने छुप्या पद्धतीने त्या तीन मुलींच्या मोज्यांमध्ये सोन्याच्या नाण्यांची पिशवी ठेवली आणि त्यांना या समस्येतून सुखरूप सोडवले. तेव्हापासून, ख्रिसमसच्या रात्री भेटवस्तू मिळण्याच्या आशेने लहान मुले घराबाहेर किंवा खिडकीत मोजे टांगतात.

(True Story of Real Santa Claus)

हेही वाचा :

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.