Home remedies for dandruff : कोंड्याच्या भीतीने तुम्हीही काळे कपडे घालणं टाळता ? शांपूने केस धुण्यापूर्वी करा केवळ ‘हे’ उपाय, कोंडा होईल छू-मंतर

केसांमधील कोंडा दूर करण्याचे उपाय : आजकाल केसांमधील कोंडा होण्याच्या समस्येने प्रत्येकजण हैराण आहे. अशा परिस्थितीत घरच्या घरी काही उपाय केल्यास ते कोंड्याच्या समस्येवर प्रभावीपणे काम करू शकतात.

Home remedies for dandruff : कोंड्याच्या भीतीने तुम्हीही काळे कपडे घालणं टाळता ? शांपूने केस धुण्यापूर्वी करा केवळ 'हे' उपाय, कोंडा होईल छू-मंतर
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 10:59 AM

नवी दिल्ली : बदलती जीवनशैली, अपुरी झोप, अबरचबर खाणं, पुरेसं पाणी न पिणं आणि केसांची नीट निगा न राखणं यामुळे आजकाल प्रत्येकाला केस गळती, केसात कोंडा होणं, केस पांढरे होणं (hair problems)अशा समस्यांचा साममा करावा लागतो. हिवाळ्यात तर केसांची समस्या वाढतच जाते. सर्वात त्रासदायक म्हणजे अधून-मधून होणारा कोंडा. ड्राय स्काल्प, ओलावा आणि केसांतील घाण यामुळे आणि तसेच खूप गरम पाण्याने केस स्वच्छ केल्याने कोंड्याची समस्या (dandruff problem) वेळोवेळी सतावू शकते. पण, अशा परिस्थितीत काही टिप्स उपयोगी येऊ शकतात. घरच्या घरी करता येणाऱ्या या टिप्सचा वापर करून (home remedies to get rid of dandruff) तुम्ही केसांमध्ये वारंवार होणारा कोंडा टाळू शकता. कसे ते जाणून घेऊया.

शांपूने केस धुण्यापूर्वी करा हे 3 उपाय –

1) केसांमध्ये लावा दही

हे सुद्धा वाचा

जर तुमच्या केसांमध्ये वारंवार कोंडा होत असेल तर तुम्ही केसांसाठी दही वापरू शकता. दह्यातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा आणि बुरशीविरोधी अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुणधर्म हे कोंडा कमी करू शकतात. याशिवाय, दह्यामुळे स्काल्पमध्ये ओलावा कायम राहतो, ज्यामुळे खाज येत नाही. यासोबतच सोरायसिस आणि एक्झिमाच्या समस्येवरही दह्यचा वापर फायदेशीर ठरतो.

2) तेल व लिंबाचा रस केसांसाठी वापरा

जर तुम्हाला वेळोवेळी कोंड्याची समस्या सतावत असेल तर तुम्ही तेलात लिंबाचा रस मिसळून लाऊ शकता. यासाठी तुम्ही केसांना कोणतेही तेल लावू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल देखील वापरू शकता. या दोन्हीपैकी कोणतेही एक तेल वाटीत घेऊन त्यात थोडा लिंबाचा रस मिसळा. ते नीट एकत्र करून तुमच्या स्काल्पला लावा व सुमारे 30 मिनिटे राहू द्या. नंतर शांपू व साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवा.

3) केसांना लावा ॲपल सायडर व्हिनेगर

ॲपल सायडर व्हिनेगर कोंड्याच्या समस्येमध्ये खूप प्रभावीपणे काम करते. जेव्हा तुमच्या केसांमध्ये कोरडेपणाची समस्या असेल तेव्हा थोडे पाणी घेऊन त्यात ॲपल सायडर व्हिनेगर घाला. आता ते मिश्रण तुमच्या स्काल्पवर लावा व थोडा वेळ तसेच राहू द्या. नंतर केस स्वच्छ धुवा. ॲपल सायडर व्हिनेगरच्या वापरामुळे केसांमधली खाज आणि कोंड्याची समस्या लवकर कमी होण्यास मदत होईल. वर नमूद केलेल्या सर्व गोष्टींचा वापर करून तुम्ही केसांमध्ये वारंवार होणार्‍या कोंड्यापासून सुटका मिळवू शकता.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?.
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?.
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य.
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?.
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'.