चेहऱ्यावरील टॅनिंग काढण्यासाठी ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा !
उन्हाळ्यात आपली त्वचा टॅन होते, ज्यामुळे त्वचेचा रंग जास्त गडद होतो. चेहऱ्यावर काळ्या डाग्याचे प्रमाण देखील वाढते.
मुंबई : उन्हाळ्यात आपली त्वचा टॅन होते, ज्यामुळे त्वचेचा रंग जास्त गडद होतो. ही समस्या दूर करण्यासाठी अनेकजण विविध उपचार घेतात. मात्र, उपचार घेऊन देखील चेहऱ्यावरील काळे डाग आणि टॅन जात नाही. चेहऱ्यावरील काळे डाग आणि टॅन जाण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. विशेष म्हणजे या घरगुती उपायांमुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास मदत होते. (Try this face pack to remove the tanning on the face)
जर आपला चेहरा उन्हामुळे टॅन झाला आहे असे वाटत असेल, तर आपण सतत थंड पाण्याने तोंड धुतले पाहिजे. ते आपल्या त्वचेसाठी ढाल अर्थात शील्ड म्हणून काम करेल. थंड पाणी आपल्या चेहऱ्याला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून देखील वाचवते. वास्तविक, थंड पाणी हळूहळू आपल्या उन्हाने बाधित त्वचेला मृत पेशींमध्ये रुपांतरित करते. जी स्क्रब करताना आपल्या चेहऱ्यापासून विभक्त होते आणि आपली त्वचा पुन्हा चमकू लागते.
आरोग्यासह त्वचेसाठीही हळद खूप फायदेशीर आहे. हळदीमध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. हळद आणि मध यांचा फेस मास्क चेहर्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी वापरता येतो. हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात 2 चमचे हळद, 1 चमचा मध आणि लिंबाचा रस घ्या. हे मिश्रण व्यवस्थित मिसळून त्याची पेस्ट तयार करा.
5 ते 20 मिनिटांसाठी हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. जर आपली त्वचा संवेदनशील असेल तर, लिंबाचा रस मिसळू नका. लिंबाचा रस आणि मध फेसपॅक – 1 चमचे मध आणि 1 चमचे लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ते चेहऱ्यावर लावा आणि 1 तास ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा. यानंतर ते थंड पाण्याने धुवा. हा लिंबाचा रस नैसर्गिक ब्लीचप्रमाणे कार्य करतो आणि मध त्वचेमध्ये ओलावा राखतो. केशर आणि दुधाचा फेसपॅक- 5 चमचे दुधात 3 ते 4 केशर पाने घाला. 30 मिनिटांसाठी तसेच ठेवा.
यानंतर, आपल्या चेहर्यावर आणि गळ्यावर 2-3 तास ही पेस्ट तशीच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे आपली त्वचा चमकदार होते. फेस पॅक बनविण्यासाठी कॉफी पावडर एक चमचा मधात व्यवस्थित मिसळा आणि हातांनी हलक्या हाताने मसाज करा. यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी पॅक चेहऱ्यावर ठेवा. मग आपले तोंड धुवा. खरं तर, कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, तसेच यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म देखील असतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Skin Care | कोरड्या त्वचेने हैराण? क्रीमही काम करत नसतील, तर वापरा घरगुती ‘उटणं’!#SkinCare | #skincareroutine | #homeremedies | #BeautySecrets https://t.co/2j7jbRm7bJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 5, 2021
(Try this face pack to remove the tanning on the face)