चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी Green Tea चा करा वापर
ग्रीन टीचा वापर केवळ सेवनासाठी नव्हे तर त्वचेसाठीही करता येतो. त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या अशा समस्या दूर होण्यास मदत मिळते.
नवी दिल्ली – ग्रीन टीचे (green tea) सेवन केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर ठरते. त्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. तसेच त्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे (vitamins) यांसारखे पोषक घटक असतात. ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल असतात. ते त्वचा तरुण ठेवण्यास मदत करते. ग्रीन टी तुम्हाला सुरकुत्यांपासून (wrinkles on face) वाचवण्यासही मदत करते व तुमची त्वचा निरोगी ठेवण्याचे काम करते. सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही ग्रीन टीचा वापर करता येऊ शकतो, ते कसं हे जाणून घेऊया.
ग्रीन टी व नारळाचे तेल
ग्रीन टी बनवा आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवा. आता एका भांड्यात खोबरेल तेल घ्या. त्यात 2 चमचे ग्रीन टी घाला. या दोन्ही गोष्टी नीट मिसळा. हे मिश्रण 5 ते 6 मिनिटे चेहरा आणि मानेवर लावा. 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.
ग्रीन टी व ॲवोकॅडो
तुम्ही त्वचेसाठी ग्रीन टी व ॲवोकॅडोचा वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात ॲवोकॅडो कापून मॅश करावी. आता त्यात 2 ते 3 चमचे ग्रीन टी घालावा. हे दोन्ही पदार्थ नीट मिसळावेत. आता या मिश्रणाने चेहरा आणि मानेला काही वेळ मसाज करावा व ते मिश्रण 20 ते 30 मिनिटे तसेच त्वचेवर राहू द्यावे. यानंतर चेहरा व मान साध्या पाण्याने स्वच्छ धुवावा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.
ग्रीन टी व अंड एका बाऊलमध्ये अंडे फोडून घ्या. त्यामध्ये एक चमचा ग्रीन टी ची पाने घालावीत. हे दोन्ही पदार्थ नीट मिसळावेत. आता हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. 15 ते 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. त्यामुळे सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.
ग्रीन टी व केळं
तुम्ही त्वचेसाठी ग्रीन टी आणि केळं हेदेखील वापरू शकता. यासाठी एका भांड्यात केळं मॅश करावे. त्यात 1 ते 2 चमचे ग्रीन टी पावडर घाला. या दोन्ही गोष्टी मिक्स करून त्वचेवर लावावे आणि 15 ते 20 मिनिटे राहू द्यावे. थोड्या वेळाने साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवाव. हा घरगुती फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.