फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? कोकणातल्या ‘या’ पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या!

बरेच लोक फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतील. अशावेळी सगळ्यांच्या यादीत पहिल्याक्रमांकावर असते नाव म्हणजे ‘कोकण’.

फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? कोकणातल्या ‘या’ पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या!
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 10:44 AM

मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपल्यापैकी अनेकांनी सुट्ट्या घेतल्या असतील. बरेच लोक तर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतील. अशावेळी सगळ्यांच्या यादीत पहिल्याक्रमांकावर असते नाव म्हणजे ‘कोकण’. काही लोकांचं आजोळ, तर काहींच्या मामाचं गावं… कोकणात फिरण्यासाठी मुळात कुठल्याही कारणाची गरज भासत नाही. पण, बऱ्याचदा कोकणातील पर्यटन स्थळे नक्की कोणती, तिथे कसं जायचं, कुठे फिरायचं, असे अनेक प्रश्नही पडतात (Vacation trip destination near kokan).

कोकणाला खरं तर महाराष्ट्रातील ‘कॅलिफोर्निया’ असे म्हटले गेले आहे. इथले समुद्रकिनारे, शुद्ध हवा, परिसर, हिरवळ या सगळ्याने मन प्रसन्न होऊन जाते. इतकंच नाही कोकणातल्या शुद्ध हवामानामुळे तब्येतही चांगली होते. इथली हवाच निराळी आहे. त्यामुळे रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून सुटका हवी असेल, तर कोकण सहल ही वर्षातून किमान एकदा तरी करायलाच हवी…

तारकर्ली :

कोकणात आल्यानंतर सर्वात जास्त ओढ लागते ती समुद्रकिनाऱ्यांची! त्यातही कोकणामध्ये आता तारकर्लीचा समुद्रकिनारा हा खूपच प्रसिद्ध झाला आहे. याचे कारण म्हणजे, या समुद्रकिनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग आणि अन्य वॉटर स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीही सुरू करण्यात आल्या आहेत. कोकणातील सर्वच समुद्रकिनारे हे अतिशय स्वच्छ आहेत आणि त्यामध्ये तारकर्लीचा समुद्रकिनारा हा अग्रक्रमावर आहे असं म्हटलं जातं. या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनचे दर्शनही होते. खास डॉल्फिन बघण्यासाठीही अनेक जण कोकण सहल काढताना तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्याला मुद्दाम भेट देतात.

कसे पोहोचाल? : मडगाव स्टेशनला उतरून रिक्षा अथवा एसटीने तारकर्लीला पोहचू शकता.

रत्नदुर्ग किल्ला :

रत्नागिरीपासून साधारण दोन ते तीन किलोमीटरवर असणारा ‘रत्नदुर्ग’ किल्ला पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. इथे असलेलं भगवती देवी मंदिर प्रसिद्ध आहे. इथे एक भुयारी मार्गदेखील आहे. इथे येणारे पर्यटक इथल्या विहंगम दृष्यामुळे मोहून जातात. हा किल्ला समुद्राच्या काठावरील असणाऱ्या डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याच्या पाथथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला होता.

कसे पोहोचाल? : रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून रिक्षा (Vacation trip destination near kokan)

आरे वारे समुद्रकिनारा :

रत्नागिरीच्या अनेक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असणारा ‘आरे वारे बीच’ हा अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा म्हणून प्रसिद्ध आहे. इथे मनाला मिळणारी शांतता आणि स्वच्छपणा हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. दोन्ही बाजूला डोंगर आणि मधोमध समुद्र, असा मनमोहक निसर्गाचा नजारा इथे पाहायला मिळतो. आरे वारेच्या समुद्रकिनाऱ्याला आता बरेच पर्यटक भेट देऊ लागले आहेत.

 कसे पोहोचाल? : रत्नागिरीवरून रिक्षा अथवा एसटी

थिबा राजवाडा :

कोकणात समुद्रकिनाऱ्यांपासून ते राजवाड्यापर्यंत सर्वकाही पाहण्यासारखे आहे. मुळातच कोकणाला एक इतिहास लाभला आहे. त्यापैकीच एक ऐतिहासिक स्थळ म्हणजे ‘थिबा राजवाडा’. रत्नागिरीमध्ये हा थिबा राजवाडा असून यामध्ये एक वस्तुसंग्रहालय देखील आहे. आताचे म्यानमार अर्थात पूर्वीच्या ब्रम्हदेशाच्या ‘थिबा मिन’ राजाला येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. थिबाने वापरलेल्या अनेक गोष्टी येथे जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. हा राजवाडा ब्रिटिशांनी बांधलेला असून, आता पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

कसे पोहोचाल? : रत्नागिरी स्टेशनवरून रिक्षा

(Vacation trip destination near kokan)

हेही वाचा :

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.