Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Valentine Day 2023 : एक्स बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडशी पुन्हा पॅचअपसाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

Valentine Day 2023: आपल्या आसपास असेही काही जण असतात, ज्यांच ब्रेकअप झालेलं असतं. ब्रेकअपमागे प्रत्येकाच काही कारण असतं. व्हॅलेंटाइन्स डे च्या दिवशी त्यांना आपल्या जोडीदाराची आठवण येते.

Valentine Day 2023 : एक्स बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडशी पुन्हा पॅचअपसाठी 'या' टिप्स करा फॉलो
couple loveImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 8:25 AM

Valentine Day 2023 : दरवर्षी फेब्रुवारी महिना युवा पिढीसाठी विशेष असतो. कारण फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या व्हॅलेंटाइन्स डे ची युवा पिढीला प्रतिक्षा असते. खासकरुन कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुण-तरुणींसाठी हा दिवस खास असतो. व्हॅलेंटाइन्स डे 14 फेब्रुवारीला असतो. पण त्याची सुरुवात होते व्हॅलेंटाइन्स वीकपासून. हा व्हलेंटाइन्स वीक आजपासून म्हणजे 7 फेब्रुवारीपासून सुरु झालाय. व्हॅलेंटाइन्स डे हा प्रेम दिवस मानला जातो. तरुण-तरुणी या दिवशी आपल्या मनातील प्रेमभावना जोडीदाराजवळ व्यक्त करतात. व्हॅलेंटाइन्स डे च्या दिवशी अनेकांच्या जोड्या जुळतात. त्याचवेळी आपल्या आसपास असेही काही जण असतात, ज्यांच ब्रेकअप झालेलं असतं. ब्रेकअपमागे प्रत्येकाच काही कारण असतं. व्हॅलेंटाइन्स डे च्या दिवशी त्यांना आपल्या जोडीदाराची आठवण येते.

गमावलेलं प्रेम परत कसं मिळवणार?

ब्रेकअप नंतर अनेकांना पश्चाताप होतो. आपली चूक त्यांना उमगते. एक्स बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड पुन्हा आयुष्यात हवी असं वाटतं. व्हलेंटाइन्स वीकच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्ही तुमच गमावलेलं प्रेम परत मिळवण्याचा प्रयत्न करु शकता. ब्रेकअपनंतर पुन्हा पॅचअप करायच असल्यास आम्ही तुम्हाला आज काही टिप्स सांगणार आहोत.

पहिली ही गोष्ट करा

ब्रेकअप नंतर एक्स जोडीदार पुन्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवा असल्यास, त्याला एक प्रेमळ संदेश पाठवा. तुमच्या मेसेजमध्ये तक्रारीचा सूर नसावा. तुम्ही स्वत:ची चूक मान्य करु शकता. ब्रेकअपनंतर तुम्हाला त्यांच तुमच्या आयुष्यातील महत्त्व लक्षात आलय, हे पटवून द्या. आपुलकीचे शब्द लिहून मेसेज किंवा कार्ड पाठवू शकता.

दुसरं पाऊल काय असेल?

एक्सकडून तुम्ही पाठवलेल्या मेसेजला उत्तर आलं, तर तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करा. समोरा-समोर भेटल्याने काही गैरसमज झाले असल्यास दूर होतील. भेटण्यासाठी दबाव टाकू नका. भेटण्यामागची तुमची प्रामाणिक तळमळ त्यांना जाणवू द्या. एक्स भेटण्यास तयार झाल्यास, त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी गुलाबाच फूल किंवा पुष्पगुच्छा घेऊन जा. तिसर पाऊल काय असेल?

तुमच्या दोघांच ब्रेकअप ज्या कारणामुळे झाला होता, तो वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. पार्टनरवर दोषारोप करण्याऐवजी हे जाणवून द्या, की तुम्हाला त्याच्या किंवा तिच्या सोबत रहायच आहे. एक्सही अनुकूल असेल, तर मिळून मार्ग शोधा. पुन्हा त्याच चूका होणार नाहीत, हे पटवून द्या. असं केल्यास कदाचित पॅचअप होऊ शकतं.

दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.