कितीही पैसा कमवा, ‘या’ पाच चुका तुम्हाला करतील उद्ध्वस्त; हातात कधीच टिकणार नाही पैसा,पाहा वास्तू शास्त्र काय सांगतं?

आपल्या कुटुंबाला एक सुखी समाधानी आयुष्य मिळावं, रिटायरमेंटनंतर गाठीशी चार पैसे असावेत. रिटायरमेंटनंतर आयुष्य आनंदात जावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते.

कितीही पैसा कमवा, 'या' पाच चुका तुम्हाला करतील उद्ध्वस्त; हातात कधीच टिकणार नाही पैसा,पाहा वास्तू शास्त्र काय सांगतं?
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 5:39 PM

आपल्या कुटुंबाला एक सुखी समाधानी आयुष्य मिळावं, रिटायरमेंटनंतर गाठीशी चार पैसे असावेत. रिटायरमेंटनंतर आयुष्य आनंदात जावं. आर्थिक अडचणी निर्माण होऊ नयेत. यासाठी सामान्य माणूस त्याच्या उमेदीच्या काळात भरपूर कष्ट करतो, पैसा मिळवतो. मात्र अनेकवेळा असं होतं की एखादा व्यक्ती पैसे तर कमावतो. मात्र जो जेवढा पैसा कमावतो तेवढाच पैसा खर्च होतो. त्यांच्या हाती शिल्लक पैसा राहत नाही. याला अनेक कारणं असतात. मात्र तुमच्याकडे आलेला पैसा तुमच्या हातात कसा टिकेलं, खर्च कमी कसा होईल? यासाठी वास्तू शास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. त्याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

घराच्या या दिशेला चुकूनही ठेवू नका कचराकुंडी

वास्तू शास्त्रानुसार घरातील साफ-साफाईचा परिणाम हा थेट तुमच्या आर्थिक परिस्थितीवर पडतो. त्यामुळे घराच्या उत्तप पूर्व अर्थात ईशान्य दिशेला कचराकुंडी किंवा कचार टाकू नये, असं मानलं जातं. जर घराच्या या दिशेला कचरा टाकला जात असेल तर धनाची प्राप्ती होत नाही.

नळामधून टपकणारं पाणी 

वास्तू शास्त्रानुसार तुमच्या घरात जर नळाच्या तोटीमधून सातत्यानं पाणी गळत असेल तर ते अशुभ मानलं जातं. नळामधून सतत गळणारं पाणी हे पैशांच्या खर्चात वाढ होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे नळातून पाणी गळत असेल तर योग्य ते उपाय योजना कराव्यात.

स्वयंपाक घर चुकीच्या दिशेला नसावं

वास्तू शास्त्रानुसार तुमचं स्वयंपाक घर हे अग्नेय दिशेला म्हणजे पूर्ण आणि दक्षिण दिशेच्या मध्ये असावं. पश्चिम दिशेला कधीही स्वयंपाक घर किंवा किचन नसावं, यामुळे खर्चात वाढ होते.

तिजोरीची दिशा

घरात तुम्ही तुमची तिजोरी कोणत्या दिशेला ठेवली याचा थेट परिणाम हा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर आणि खर्चावर पडतो, असं वास्तू शास्त्र सांगतं. तुम्ही घरात तिजोरी ठेवताना ती नेहमी अशी ठेवा की तिचं तोडं हे उत्तर दिशेकडे असावं. असं मानलं जता की जर तिजोरीचं तोंड उत्तर दिशेकडे असेल तर त्या कुटुंबावर लक्ष्मी माता प्रसन्न राहाते.

घरात चुकूनही तुटलेला पलंग ठेवू नका

वास्तू शास्त्रानुसार घरात कोणतीही तुटलेली वस्तू असू नये, जर तुमच्या घरात तुटलेला पलंग असेल तर त्याचा परिणाम धनावर होतो. खर्चात मोठी वाढ होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.