Vinayaka Chaturthi 2020: विनायक चतुर्थीला अशी करा लाडक्या बाप्पाची पूजा, जाणून घ्या विधी आणि मुहूर्त

चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केल्यास जीवनातील सर्व समस्या आपोआप दूर होतात आणि घरात सुख-समृद्धीबरोबरच यश मिळतं असं मानलं जातं.

Vinayaka Chaturthi 2020: विनायक चतुर्थीला अशी करा लाडक्या बाप्पाची पूजा, जाणून घ्या विधी आणि मुहूर्त
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 8:36 AM

मुंबई : हिंदू धर्मात प्रथम वंदन हे गणेशालाच असतं. प्रत्येक महिन्यात चतुर्थीला गणपतीची पूजा होत असते. 2020 चा हा शेवटचा महिना असून शेवटच्या महिन्यात चतुर्थीला गणपतीची पूजा मोठ्या उत्सहात केली जाणार आहे. चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केल्यास जीवनातील सर्व समस्या आपोआप दूर होतात आणि घरात सुख-समृद्धीबरोबरच यश मिळतं असं मानलं जातं. (vinayaka chaturthi 18 december know how to worship lord ganesh)

खरंतर, पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात. 18 डिसेंबर म्हणजेच आज चतुर्थी अनेक प्रकारे विशेष आहे. कारण यावेळी मार्गशीर्ष महिनाही सुरू झाला आहे. गणपतीला विनायक म्हणून नाव दिल्यामुळे या दिवसाला विनायक चतुर्थीसुद्धा म्हटलं जातं. याच खास दिवशी जाणून घेऊयात विनायक चतुर्थीचा शुभ काळ, त्याचे महत्त्व आणि पूजेविषयी….

विनायक चतुर्थी मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथी 17 डिसेंबरपासून 03 वाजून 17 पासून सुरू झाली आहे. ही तिथी आज दुपारी फक्त 02 वाजून 22 मिनिटांपर्यंतच असणार आहे. त्यामुळे कोणतंही काम करताना या तिथी शुभ मानल्या जातात.

विनायक चतुर्थीचे महत्त्व

या दिवशी उपास करून भगवान गणेश त्याच्या भक्तांना ज्ञान, विद्या आणि संयम ठेवण्याचा आशीर्वाद देतात असं बोललं जातं. इतकंच नाही तर या दिवशी गणेशाची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात प्रगती होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात.

काय करावं या दिवशी ?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी ब्रह्म मुहूर्तामध्ये स्नान करा. या दिवशी लाल रंगाचे कपडे घाला. दुपारी पूजेच्या वेळी तुमच्या क्षमतेनुसार सोन्याची, पितळ, चांदी, तांबे किंवा मातीच्या गणेशाच्या मूर्तीची पूजा करा, त्यानंतर आरती करा. ‘ओम गं गणपतयै नम:’ असा जप करा. गणपतीला खूप प्रिय असलेल्या गणेशमूर्तीवर 21 दुर्वा अर्पण करा.

तसंच, गणेशाला प्रिय अशा मोदकांचाही प्रसाद तुम्ही चढवू शकता. पूजा करताना आपण श्री गणेश स्त्रोत, अथर्वशीर्ष, संकटनाशक गणेश स्त्रोत वाचावेत. संध्याकाळी गणेश चतुर्थी कथा, गणेश स्तुती, श्री गणेश सहस्रनामावली, गणेश चालीसा आणि गणेश पुराण वाचा. त्यानंतर गणेशाची आरती करावी. (vinayaka chaturthi 18 december know how to worship lord ganesh)

इतर बातम्या –

Winter Care | अचानक वाढलाय थंडीचा पारा, अशा प्रकारे घरातील वृद्धांची तब्येत सांभाळा!

Tissue Paper चा व्यवसाय सुरु करा; सरकारकडून अनुदान; कमवाल लाखो रुपये

(vinayaka chaturthi 18 december know how to worship lord ganesh)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.