जगातील असे दहा देश जिथे भारतीयांना व्हिसा लागत नाही, बिनधास्त फिरा!

व्हिसाशिवाय प्रवास करायचा आहे का? तर आता भारतीयांसाठी व्हिसामुक्त देशांची संपूर्ण यादी समोर आली आहे. थायलंड, भूतान, नेपाळ, मॉरिशस आणि इतर अनेक देशांमध्ये पर्यटकांना व्हिसामुक्त प्रवेश दिला जात आहे.

जगातील असे दहा देश जिथे भारतीयांना व्हिसा लागत नाही, बिनधास्त फिरा!
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 7:30 PM

काही दिवसांवर ख्रिसमस हा सण आलेला आहे. तर त्याच्या काही दिवसांनी लगेच नववर्षाचे स्वागत होणार आहे. अशा तऱ्हेने जर तुम्हाला भारतीय पर्यटक म्हणून जगभर फिरायचं असेल तर तुमच्यासाठी ते आणखीनच सोपं झालं आहे. कारण अनेक जण नववर्ष साजरा करण्यासाठी बाहेरगावी जात असतात. पण अनेकांना त्यात व्हिसा मिळत नसल्याने जात येत नाही. यासाठी आता तुम्हाला चिंता करायची गरज नाही कारण आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत जिथे भारतीय पर्यटकांचा प्रवेश व्हिसा फ्री आहे. येथे तुम्ही व्हिसाची कोणतीही भीती आणि टेन्शन न घेता फिरू शकता. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी

थायलंड

व्हिसा फ्री असलेल्या देशांमध्ये थायलंड हे पहिल्या क्रमांकावर नाव आहे. हा देश आपल्या सुंदर समुद्रकिनारे, अप्रतिम संस्कृती आणि स्वादिष्ट जेवणासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय व्हिसाशिवाय येथे तुम्ही ६० दिवस राहू शकतात, जे स्थानिक इमिग्रेशन ऑफिसमधून ३० दिवसांपर्यंत वाढवले जाऊ शकते.

भूतान

हिमालयाच्या पर्वतांच्या कुशीत वसलेल्या भूतानला स्वर्ग म्हणतात. भूतान हा अतिशय सुंदर देश आहे. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही भूतानला जाऊ शकता. भारतीय पर्यटक म्हणून तुम्ही येथे व्हिसाशिवाय १४ दिवस राहू शकतात. आणि निसर्गाचा मनोसोक्त आनंद घेऊ शकतात.

नेपाळ

माऊंट एव्हरेस्ट आणि कांचनजंघा सारख्या पर्वतांचे घर असलेले नेपाळ हे एक अंडररेटेड डेस्टिनेशन आहे. हा देश चारही बाजूंनी हिमालयाने वेढलेला आहे. येथे तुम्हाला प्राचीन इतिहासाशी संबंधित अनेक मंदिरे पाहायला मिळतील. नेपाळला जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज लागत नाही.

मॉरिशियस

मॉरिशस हे त्यांच्या रीफ, समुद्र किनारे आणि तलावांसाठी प्रसिद्ध आहे. भारतीय पर्यटक म्हणून तुम्ह येथे व्हिसाशिवाय या बेटावर ९० दिवसांपर्यंत सुट्टीचा आनंद घेऊ शकता. तिथे गेल्यावर तुम्हाला भाषेचा देखील प्रॉब्लेम येणार नाही कारण मॉरिशसचे लोकही हिंदी भाषेत बोलतात.

मलेशिया

मलेशियाचे सुंदर समुद्रकिनारे आणि व्यस्त शहरं याला खास बनवतात. तुम्ही जर भारतीय पर्यटक म्हणून येथे गेलात तर व्हिसाशिवाय ३० दिवसांपर्यंत मनोसोक्त प्रवास करू शकतात. मलेशिया हा इस्लामी देश असूनही तो भारतीयांच्या टॉप डेस्टिनेशनपैकी एक मानला जातो.

केनिया

केनिया हे “हजार टेकड्यांचा देश” म्हणून ओळखला जातो. हे वन्यजीव आणि 50 पेक्षा जास्त राष्ट्रीय उद्यानांसाठी प्रसिद्ध आहे. भारतीय पर्यटक म्हणून येथे व्हिसाशिवाय तुम्ही ९० दिवसांपर्यंत येथे राहू शकतात.

इराण

इराण हा देश त्यांच्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासासाठी ओळखला जातो. व्हिसाशिवाय १५ दिवस भारतीय येथे फिरू शकतात. मात्र इस्लामी देश असल्याने विशेषत: महिलांना या ठिकाणचे नियम पाळणे आवश्यक आहे.

अँगोला

आफ्रिकेतील हा देश आपल्या वैविध्यपूर्ण नैसर्गिक देखाव्यांसाठी ओळखला जातो. व्हिसाशिवाय भारतीय येथे ३० दिवसांपर्यंत राहू शकतात. येथे तुम्ही वन्यजीव अभयारण्याचा आनंद घेऊ शकता.

बार्बाडोस

कॅरेबियन मधील हा बेट देश आपल्या सण आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. व्हिसाशिवाय भारतीय लोकं येथे ९० दिवसांपर्यंत सुट्टी मस्त आनंदात घालवू शकतात. तुम्हाला काही वेगळी संस्कृती आणि परंपरा पाहायची असेल तर तुम्ही बार्बाडोसला जाऊ शकता.

डोमिनिका

डोमिनिका हा देश गरम पाण्याचे झरे आणि हिरव्यागार जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. व्हिसाशिवाय भारतीय पर्यटक येथे १८० दिवसांपर्यंत राहू शकतात.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.