Warm Water Benefits | केवळ वजन नियंत्रणच नव्हे तर, गरम पाण्यामुळे शरीराला होतील अनेक फायदे!

हिवाळ्यात गरम पाण्याचे सेवन केल्याने बर्‍याच समस्यांवर मात करता येते. कोमट पाणी पिण्यामुळे शरीराला आतून ऊब मिळते आणि शरीर गरम राहते.

Warm Water Benefits | केवळ वजन नियंत्रणच नव्हे तर, गरम पाण्यामुळे शरीराला होतील अनेक फायदे!
गरम पाणी पिण्याचे फायदे
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 6:54 PM

मुंबई : सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू आहे. हळूहळू थंडीही वाढत आहे. हिवाळ्यात, लोकांना थंड पाण्याला स्पर्श करणे देखील आवडत नाही. परंतु, असे बरेच लोक आहेत ज्यांना या दिवसांत देखील थंड पाणी पिणे आवडते. परंतु, हिवाळ्यात गरम पाण्याचे सेवन केल्याने बर्‍याच समस्यांवर मात करता येते. कोमट पाणी पिण्यामुळे शरीराला आतून ऊब मिळते आणि शरीर गरम राहते. तथापि, हिवाळ्याच्या काळात बऱ्याचदा कमी पाणी प्यायले जाते. याच थेट परिणाम आपल्या चेहर्‍यावर आणि शरीरावर दिसून येतो (Warm water benefits for health).

हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्याने सर्दी होण्याची शक्यता असते. हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्यास आपले शरीर निरोगी होईल असे आपल्याला वाटत असेल, तर पूर्णपणे चुकीचे आहे. हिवाळा असो किंवा उन्हाळा, शरीराला  भरपूर पाण्याची आवश्यकता असते. आपण दररोज सुमारे 2.5 लीटर ते 3 लिटर पाणी प्यायले पाहिजे. कोमट पाणी पिण्यामुळे तुमची पचन क्रिया देखील मजबूत राहते. बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासूनही मुक्ती मिळते. तसेच, डिहायड्रेशन देखील टाळता. कोमट पाणी पिण्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्तीही बळकट होते.

गरम पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे

– जर आपल्याला सर्दी किंवा खोकला असेल, तर आपण नक्कीच गरम पाण्याचे सेवन केले पाहिजे. हे आपल्या शरीरात औषधासारखे कार्य करेल आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळेल.

– गरम पाणी लठ्ठ लोकांसाठी एक वरदान आहे. गरम पाणी आपल्या शरीरातील अधिकची चरबी कमी करते. जर आपल्यालाही लठ्ठपणाची समस्या असेल, तर दररोज गरम पाण्याचे सेवन करा जेणेकरुन आपले वजनही नियंत्रणात राहील आणि शरीर निरोगी होईल.

– दररोज सकाळी कोमट पाण्यात काही थेंब लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

– धकाधकीच्या जीवनात बरेच लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येसह झगडत आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही गरम पाण्याचे सेवन केले, तर तुमची पचनशक्ती मजबूत होईल आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवणार नाही (Warm water benefits for health).

– गरम पाणी पिण्याचा एक फायदा म्हणजे आपल्या शरीरात साठलेले हानिकारक घटक आपोआप बाहेर पडतात.

-गरम पाणी पिणे मासिक पाळीसाठीदेखील फायदेशीर आहे. जर, या दिवसांत आपल्याला पोट दुखण्याची तक्रार असेल तर, गरम पाण्याचे सेवन आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. उबदार पाणी आपल्या पोटातील स्नायूंचा शेक देते आणि आपल्याला आराम मिळतो.

– केस गळतीची समस्या गरम पाण्याच्या सेवनाने देखील थांबते आणि आपले केस पूर्वीपेक्षा जास्त दाट आणि मजबूत बनतात.

– गरम पाण्याच्या सेवनाने तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, मुरुम आणि त्वचेशी संबंधित इतर समस्याही दूर होतात.

– गरम पाणी आपल्या शरीराच्या वेदना किंवा थकवा कमी करून तणावातून मुक्त करते.

– आपले दात स्वच्छ करण्यासाठी देखील आपण गरम पाण्याचा वापर करू शकता.

(Warm water benefits for health)

Non Stop LIVE Update
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.