Sunglass Trend | चेहऱ्यानुसार वापरा गॉगल्स, कोणत्या चेहऱ्यासाठी कोणता ट्रेंड?
तुम्ही तुमच्या चेहऱ्याप्रमाणे खुलून दिसणारा आणि छान लूक देणारा गॉगल्स सहजतेने खरेदी करु शकता. (Wear Goggles According to Your Shape)
मुंबई : उन्हापासून डोळ्यांचे सरंक्षण व्हावे यासाठी शोध लागलेल्या गॉगल्सचे रुपांतर आता फॅशन अॅक्सेसरीमध्ये झाले आहे. सनग्लासेस, ग्लेअर्स किंवा गॉगल्स हे आता सर्रास वापरले जातात. सध्या प्रत्येक गरजेनुसार वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे गॉगल्स बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्याप्रमाणे खुलून दिसणारा आणि छान लूक देणारा गॉगल्स सहजतेने खरेदी करु शकता. (Wear Goggles According to Your Shape)
गोल आकाराचा चेहरा असलेल्यांसाठी
गोल आकाऱ्याच्या चेहरा असलेल्या लोकांना डीप फ्रेम असलेले गॉगल्स खुलून दिसतात. यामुळे त्यांचा चेहरा थोडा लहान दिसतो. यासोबतच आयताकृती (rectangular) शेप असणारे फ्रेमही त्यांना फार छान दिसतात.
अंडाकृती चेहरा असलेल्यांसाठी
अंडाकृती चेहरा असलेली लोक गॉगल्सच्याबाबत फार लकी असतात. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही फ्रेम खुलून दिसते. लहान किंवा मोठे दोन्ही प्रकारचे गॉगल्स त्यांच्या चेहऱ्यावर चांगले दिसतात.
ऑबलाँग चेहऱ्यासाठी
ऑबलाँग आकाराचा चेहरा अंडाकृती आकाराहून थोडा मोठा असतो. या आकाराचा चेहरा असलेल्या माणसांच्या गालावर रेष असते. तसेच यांचे नाक थोडे लांब असते. त्यामुळे या पद्धतीच्या चेहरा असलेल्या माणसांना डीप फ्रेमचे गॉगल्स छान दिसतात. त्यामुळे त्यांचा चेहरा आकाराने लहान दिसतो.
त्रिकोणाकार चेहऱ्यासाठी
त्रिकोणी आकाराचा चेहरा असलेल्या लोकांचा कपाळ हे थोडं लहान असतं. तर त्यांचे गाल हे थोडे मोठे असतात. या लोकांसाठी गॉगल्स शोधणं फार कठीण असतं. त्यामुळे त्रिकोणाकार चेहऱ्यासाठी हेवी टिंट किंवा कॅट आय प्रकाराचे फ्रेम असलेले गॉगल्स छान दिसतात.
तसेच ज्यांचा चेहरा वरच्या बाजूने लांब आणि हनुवटीच्या बाजूने बारीक असेल, तर त्यांना हलक्या आणि रिमलेस पद्धतीच्या फ्रेम खुलून दिसतात.
डायमंड आकाराच्या चेहऱ्यासाठी
डायमंड आकाराचा चेहरा असलेली लोकं फार कमी असतात. या चेहऱ्याच्या लोकांसाठी ब्रो लाईन गॉगल्स छान दिसतात.
चौकोनी चेहऱ्यासाठी
चौकोनी चेहरा असलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याची जॉ लाईन आणि कपाळ मोठं असतं. त्यामुळे या लोकांनी गॉगल्स घेताना तुमचा चेहरा लांब दिसेल, अशा पद्धतीने फ्रेम सिलेक्ट करायला हव्यात. (Wear Goggles According to Your Shape)
संबंधित बातम्या :
Wedding Style | लग्नात काय घालायचं प्रश्न पडलाय, ‘हे’ आहेत काही हटके पर्याय
Winter Fashion | यंदाचा हिवाळा हटके आणि स्टाईलिश, टोपीपासून बूटसचे ट्रेडींग पर्याय