हिवाळ्यात वजन घटविण्यासाठी आहारात या भाज्यांचा करा समावेश
हिवाळ्याच्या दिवसात बाजारात अनेक प्रकारच्या पालेभाजा उपलब्ध होऊ शकतात. त्या भाज्यांमधील काही भाज्या या तुमचे वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतात.
मुंबईः हिरवी पाने असलेल्या मेथीच्या भाजीची (Fenugreek)कच्ची पाने खाण्यासाठी अनेक जणांना आवडत असते. बटाटा (Potatoes) किंवा गाजराबरोबर मेथी खाण्यात खवय्ये उत्सुक असतात. मेथीची भाजी अनेक पोषक तत्वांनी भरलेली असते. या भाजीत प्रथिने कमी असतात आणि त्यामध्ये अँटीऑक्सिडेंटचे गुण असतात. मेथीच्या पानांमध्ये एस्कॉर्बिक अॅसिड असते, ज्यामुळे शरीरातील रक्त शुद्ध ठेवण्यासाठी मदत होते. मेथीच्या भाजी नेहमी तुमच्या आहारात असेल तर मधुमेहाचा धोका कमी असतो. शरीराचे वाढलेले वजन आणि सूज कमी करण्यास मेथीची भाजी शरीरासाठी लाभदायक असते.
मोहरीची पाने
हिवाळ्याच्या दिवसात अनेक जण मोहरीच्या पानांची भाजी खाणे पसंद करतात. यामध्ये क जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असेत तर कॅलरीचे प्रमाण अगदीच कमी असते. ही भाजीसुद्धा वजन कमी करण्यास मदत करते.
मुळ्याची पाने
मुळ्याच्या पानांची भाजीही आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये कॅलरी कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी या भाजाला अधिक पसंद करतात. तसेच या भाजीत मेटाबॉलिज्म म्हणजेच चयापचायची क्रिया करण्यास मदत करते.
पालक
खवय्यांना पालक आणि दाल खाण्याचा योग आला तर त्याचा ते मनमुराद आनंद घेतात, आणि त्यावर तावही मारतात. पालक भाजी आरोग्यासाठी अनेक फायदे देते. मग ते पालक सूप असेल किंवा पालक पनीर असेल ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलेच असते.
राजगिरा भाजी
शरीरातील मधुमेहाचे प्रमाण कमी करण्यासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर भाजी असते राजगिऱ्याची भाजी. राजगिरा भाजी वजन घटविण्यात खूप मदत करते
संबंधित बातम्या