Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Safe Holi : होळीचं रंग बेरंग होऊ नये, यासाठी रंग खेळताना नेमकी कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या!

  Safe Holi : होळी हा सण मजा - मस्ती करण्याचा आणि आनंद द्विगुणित करण्याचा सण आहे. या सणाला रंगाचा सण मानला जातो. हा होळी खेळताना आपल्याला काही गोष्टींची काळजी देखील घेणं गरजेचं आहे.

Safe Holi : होळीचं रंग बेरंग होऊ नये, यासाठी रंग खेळताना नेमकी कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या!
होळी Image Credit source: Pixabay.Com
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 10:17 PM

होळीचा सण( Holi 2022) काही दिवसांवरच आलेला आहे. यावर्षी होळीचा सण 18 मार्चला साजरा केला जाणार आहे. या सणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. हा वर्षातील असा एक क्षण आहे या सणामध्ये प्रत्येक जण मजा मस्ती आणि आनंद पसरवण्याचा प्रयत्न करत असतो. बहुतेक वेळा रंग उधळताना आपल्याला अनेक गोष्टींबद्दल ठाव ठिकाणा नसतो. आपण आपल्या मस्ती मध्येच रंग उधळत असतो. बहुतेक वेळा एकमेकांना रंग लावण्याच्या नादात नको त्या घटना देखील आजूबाजूला घडत असतात. आपल्यापैकी अनेक जण जबरदस्ती रंग ( different colors) लावतात आणि रंगाचा बेरंग देखील होतांना आपल्याला पाहायला मिळतो, कारण की प्रत्येकाचा स्वभाव एकसारखा नसतो. काही जणांना रंग लावलेले आवडते तर काहींना रंग अजिबात आवडत नाही म्हणूनच अशा वेळी समोरच्या व्यक्तीला रंग लावताना आपल्याला काही काळजी देखील घेणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनुसार व आवश्यकतेनुसार होळीचा सण साजरा करत असतो. होळी सण साजरा करते वेळी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे( holi care) आवश्यक आहे. काही विशेष नियम असतात जे आपल्याला पाळणे अनिवार्य आहे,चला तर मग जाणून घेऊया होळीचा सण खेळताना आपल्याला नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात त्याबद्दल…

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची काळजी घ्या

होळीचा सण तुमच्या आवडीचा सण असू शकतो परंतु गरजेचे नाही की प्रत्येकासाठी हा सण आवडीचा असेलच. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात, ज्यांना हा सण अजिबात आवडत नाही. जर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींना रंग आणि पाणी आवडत नसेल तर त्यांच्यावर चुकून सुद्धा रंग किंवा पाणी फेकू नका. त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीला रंग लावताना आधी विचारा आणि मगच त्या व्यक्तीला रंग लावा अन्यथा रंगाचा बेरंग देखील होऊ शकतो.

पाण्याने भरलेले फुगे

पाण्याच्या फुग्याने होळी खेळण्याची मजाच वेगळी असते परंतु पाण्याच्या फुग्याद्वारे होळी खेळणे धोकादायक देखील ठरू शकते. जर तुम्ही पाण्याने भरलेला फुगा जोराने फेकत असाल तर यामुळे तुम्हाला मार देखील लागू शकतो. हे पाण्याचे फुगे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याला, कानाला किंवा नाजूक अवयवाना देखील लागू शकतो यामुळे ॲलर्जी किंवा अन्य समस्या उद्भवू शकतात.लहान मुलांच्या हाती दिले जाणारे पाण्याचे फुगे खूपच धोकादायक असतात कारण की लहान मुले अनेकदा चुकीच्या पद्धतीने पाण्याचे फुगे हाताळत असतात ज्यामुळे भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात.

‘बूरा ना मानो होली है’ असे म्हणून एखाद्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका .

अनेकदा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना एक घाणेरडी सवय असते ती म्हणजे ‘बूरा ना मानो होली है’ या वाक्याचा उच्चार करून एखाद्या व्यक्तीला त्रास देणे किंवा एखाद्या व्यक्तीला मुद्दाम रंग लावणे. अनेकदा लोक एकमेकांना किंवा महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतात ज्यामुळे कधीकधी नको ती परिस्थिती निर्माण होते. होळी हा सण प्रेम आणि आनंद पसरवण्याचा सण आहे परंतु जेव्हा अशा काही गोष्टी घडतात तेव्हा या आनंदामध्ये विघ्न निर्माण होतात म्हणूनच या सणाला आनंदाचा सण म्हणूनच प्रत्येकाने साजरा करायला हवा. या सणामध्ये कोणत्या प्रकारचे विघ्न येणार नाही, याची काळजी प्रत्येकाने व्यक्तिगत पातळीवर घ्यायला पाहिजे.

चालत्या – फिरत्या गाड्यांवर किंवा प्राण्यांवर रंग टाकणे

आपल्या मित्र-मैत्रिणी व परिवार – कुटुंबासोबतच होळीचा सण साजरा करायला हवा. जर तुम्ही चालत्या -फिरत्या वाहनांवर रंग किंवा पाण्याचे फुगे फेकत असाल तर यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते त्याचबरोबर प्राण्यांवर रंग आणि पाण्याचे फुगे फेकणे हे चुकीचे आहे यामुळे त्यांना मुकामार,इजा देखील पोहचू शकते म्हणूनच होळी खेळताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की, आपल्या मुळे इतरांना इजा पोहोचणार नाही याची विशेष काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. जर तुम्ही सुद्धा यंदाची होळी साजरी करणार असाल तर आजच्या लेखामध्ये सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे अवश्य पाळा.

'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.