कोरोना वाढला तर प्रत्येक सेकंदाला गर्भातच होईल बाळाचा मृत्यू, WHO चा गंभीर इशारा
दरवर्षी सुमारे दोन दशलक्ष बाळांचा गर्भातच मृत्यू होईल. गर्भधारणेच्या 28 आठवड्यांनंतर किंवा बाळंतपणानंतर मृत मुलाच्या जन्मास 'स्टिलबर्थ' असं म्हणतात.
लंडन : जागतिक आरोग्य संघटना (WHO), संयुक्त राष्ट्र बाल निधी (Unicef) आणि त्यांच्या सहयोगी संघटनांनी कोरोनाच्या धोक्यासंदर्भात महत्त्वाचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गर्भवती महिला आणि नवजात बाळाला मोठा धोका आहे. WHO ने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, कोरोना महामारी वाढली तर प्रत्येक 16 सेकंदाला एक मृत बाळ जन्माला येईल आणि प्रत्येक वर्षी 20 लाखांपेक्षा जास्त ‘स्टिलबर्थ’ (20 किंवा 28 व्या आठवड्यात गर्भाचा मृत्यू) च्या घटना समोर येतील. तर यामध्ये प्रगतशील देश हे आघाडीवर असतील. (who says coronavirus increased one stillbirth in every 16 seconds in country)
WHO ने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे की, दरवर्षी सुमारे दोन दशलक्ष बाळांचा गर्भातच मृत्यू होईल. गर्भधारणेच्या 28 आठवड्यांनंतर किंवा बाळंतपणानंतर मृत मुलाच्या जन्मास ‘स्टिलबर्थ’ असं म्हणतात. म्हणजे येणाऱ्या काळात कोरोनाचा शिरकाव थांबवता आला नाही तर याने पुढच्या पिढीसाठी मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे.
संयुक्त राष्ट्र बाल निधीचे कार्यकारी निदेशक हॅनरिटा फोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक 16 सेकंदाला अनेक माता स्टिलबर्थचा बळी ठरतील. पण याला रोखण्यासाठी योग्य काळजी घेणं, प्रसुतीआधीची काळती आणि सुरक्षा ठेवणं महत्त्वाचं असणार आहे. यासाठी शरीराला व्यायामाची आणि स्वच्छ व पौष्टिक अन्नपदार्थांची गरज आहे.
(who says coronavirus increased one stillbirth in every 16 seconds in country)
According to ? estimates, almost 2 million babies are stillborn every year – or 1 #stillbirth every 16 seconds. #COVID19 related health service disruptions could worsen the situation, potentially adding 200,000 more stillbirths over a 12-month period: ?https://t.co/vgD9SJSzCK pic.twitter.com/4fFAlbrIjj
— World Health Organization (WHO) (@WHO) October 8, 2020
कोरोनाच्या महामारीमुळे कठीण परिस्थिती ओढवेल WHO ने रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 या जीवघेण्या संसर्गामुळे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. संक्रमणाच्या कारणांमुळे 50 टक्के आरोग्य सेवांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळतं. याचा परिणाम असा की पुढच्या वर्षी 117 विकसित देशांमध्ये 2,00,000 मृत्यू आणि स्टिलबर्थ होण्याची शक्यता आहे. स्टिलबर्थची 40 टक्क्यांहून अधिक प्रकरण प्रसुतीदरम्यान, समोर येतील.
इतर बातम्या –
स्वस्तात मिळणार गृह कर्ज, RBI ने घेतलेल्या निर्णयामुळे घर घेणाऱ्यांसाठी Good News
(who says coronavirus increased one stillbirth in every 16 seconds in country)