‘त्या’ बायका पुरुषांना का आवडतात? वयाचा काय संबंध? कारणं आश्चर्यकारक

Relationship tips : स्वत:पेक्षा मोठ्या वयाचे जोडीदार निवडणाऱ्यांमध्ये प्रियांका चोप्रा-निक जोनास यांच्यासह अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची नावेही सामील आहेत. मुलांना स्वतःपेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या मुली किंवा महिला का आवडतात ?

'त्या' बायका पुरुषांना का आवडतात? वयाचा काय संबंध? कारणं आश्चर्यकारक
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 10:03 AM

नवी दिल्ली : प्रेमाला (love has no boundries) कोणतीही सीमा, मर्यादा नसते. प्रेमात आणि रिलेशनशिपमध्ये असणारे लोकं, समोरच्याचे रूप, वय, विचार आणि समाज याकडे लक्ष देत नाहीत. मात्र बहुतेक प्रकरणांमध्ये समाज प्रेमात पडलेल्या या जोडप्यांच्या विरोधात असतो, परंतु प्रेम ही एकमेव गोष्ट आहे जी त्यांच्या क्षुल्लक विचारसरणीला विरोध करण्यासाठी कार्य करते. आजही असे अनेक लोक आहेत, जे प्रेमात पडताना वय (age factor) वगैरे काही बघत नाहीत. त्यात सामान्य लोकांपासून अगदी मोठे स्टार्स, सेलिब्रिटी यांचाही समावेश आहे. प्रियांका चोप्रा-निक जोनास (Priyanka Chopra-Nick Jonas) यांच्यासह, कतरिना कैफ- विकी कौशल (Katrina Kaif- Vicky Kaushal) ( अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा ( (Malaika Arora- Arjun Kapoor)  यांची नावेही स्वत:हून मोठे जोडीदार निवडणाऱ्या जोडप्यांमध्ये सामील आहेत.

असं मानले जाते की तरुण मुलांना स्वत:पेक्षा मोठ्या महिला आवडतात. यामागे अनेक कारणे असू शकतात. त्याबद्दल आज जाणून घेऊया.

मॅच्युअर किंवा समजूतदार असणं

भारतात, बहुतेक रिलेशनशिप्समध्ये पुरुष महिलांपेक्षा मोठे असतात. पण आताच्या काळात मुलं किंवा तरूण, हे आपल्यापेक्षा मोठ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये राहणं पसंत करतात. बदलत्या काळानुसार महिलांचाही विकास झपाट्याने होत आहे. आपला जोडीदार परिपक्व असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, कारण असे लोक चांगल्या प्रकारे सपोर्ट करण्यास सक्षम असतात. तसंच त्यांना गोष्टी लवकर समजतात. त्यामुळे मुलांना त्यांच्यापेक्षा मोठ्या वयाच्या महिवा आवडू शकतात.

जीवनाचा जास्त अनुभव असणे हेही एक वैशिष्ट्य

अनुभवाचा अभाव हे बहुतेक नाती तुटण्याचे प्रमुख कारण मानले जाते. लोक प्रेम किंवा लग्नाच्या नात्यात अडकतात आणि जीवनातील बदल स्वीकारण्यास वेळ लागतो. कधी कधी अनुभवाअभावी नातं संपवण्याची चूक मुलं किंवा मुली करतात. असे दिसून आले आहे की मुली नातेसंबंध हाताळण्यात चांगली भूमिका निभावतात आणि अनुभव असणे, हे त्यात सकारात्मक घटक म्हणून काम करतात.

पैशांची चणचण

आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. घर चालवण्याची गुणवत्ता असलेल्या महिलांमध्ये नोकरी किंवा व्यवसायातही चांगली कामगिरी करण्याची क्षमता असते. आज इतकी महागाई आहे की नवरा बायको दोघांनाही कमावण्याचा सल्ला दिला जातो. अनुभवाने करिअरमध्ये प्रगती करणाऱ्या बहुतेक स्त्रिया पैशाच्या कमतरतेसारख्या समस्येला तोंड देण्यासाठी अधिक उपयुक्त ठरतात. अशा स्थितीत मुले त्यांच्याकडे लवकर आकर्षित होतात.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.