
दह्यामधील प्रोबायोटिक्स शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. दही स्तनाचा कर्करोग रोखण्यातही मदत करते. यामुळे महिलांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये दह्याचा समावेश करावा.

लिंबापासून शरीराला पुरेसे व्हिटॅमिन सी मिळते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीर निरोगी ठेवते. यामुळे महिलांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये लिंबाचा समावेश करावा.

माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते. आणि हे ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स आपल्याला हृदयाच्या विविध समस्या, संधिवात, नैराश्य, स्ट्रोक यापासून वाचवतात.

महिलांनी आठवड्यातून तीन ते पाच वेळा टोमॅटो खाणे आवश्यक आहे. तुम्ही टोमॅटो उकडलेले किंवा टोमॅटो सॉस कोणत्याही प्रकारे खाऊ शकता. टोमॅटोमधील अँटीऑक्सिडंट शरीराला विविध समस्यांपासून वाचवतात. स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

दररोज एक ग्लास दूध पिणे खूप चांगले आहे. दूध हे व्हिटॅमिन डीचा खूप चांगला स्रोत आहे. यामध्ये कॅल्शियम असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.