दानवेंना पाडण्यासाठी सेनेचे मंत्री काँग्रेसचा ‘हात’ धरणार?
जालना : भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासोबत दोन ‘हात’ करण्यासाठी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांना काँग्रेसचा ‘हात’ मदतीला धावणार का, अशी चर्चा सध्या जालाना जिल्ह्यात रंगू लागली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर विरुद्ध रावसाहेब दानवे ही लढत लक्षणीय होणार असल्याचे स्पष्ट आहे. रावसाहेब दानवे चार वेळा लोकसभेवर निवडून गेले असले, तरीही आज जालनावासीयांच्या मनात त्यांच्याविषयी […]
जालना : भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासोबत दोन ‘हात’ करण्यासाठी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांना काँग्रेसचा ‘हात’ मदतीला धावणार का, अशी चर्चा सध्या जालाना जिल्ह्यात रंगू लागली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर विरुद्ध रावसाहेब दानवे ही लढत लक्षणीय होणार असल्याचे स्पष्ट आहे.
रावसाहेब दानवे चार वेळा लोकसभेवर निवडून गेले असले, तरीही आज जालनावासीयांच्या मनात त्यांच्याविषयी नाराजी आहे. 2014 सालीच दानवेंविषयी प्रचंड नाराजी होती. मात्र मोदीलाटेत दानवेंना लॉटरी लागली. एवढंच नाही तर दानवेंना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थानही मिळाले. पण तिथे प्रभावशाली काम न करता आल्याने या जुन्या कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्ष बनवून महाराष्ट्रात पाठवलं. पण दानवे महाराष्ट्र सोडा तर आपल्या जिल्ह्यातही प्रदेशाध्यक्ष पदाचा प्रभाव पाडू शकले नाहीत. त्यामुळे जालना मतदारसंघात त्यांच्या विषयी प्रचंड नाराजी असल्याचे सर्व्हेमधून समोर आलंय, अशी माहिती त्यांच्या पक्षाचे खासदार संजय काकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
पराभव दिसल्यावर माणूस चवताळतो, दानवेंची अवस्था तशीच झालीय : खोतकर
नेमकी हीच नाराजी कॅश करण्यासाठी दानवेंचे पारंपरिक विरोध असलेले शिवसेनेचे अर्जुन खोतकर दोन हात करायला तयार झालेत. यासाठी त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसचा हात हातात धरण्याची जोरदार तयारी सुरु केलीय. जर महाराष्ट्र्र सेना-भाजपा एकत्र मैत्रीपूर्ण लढत झाली, तर ही जागा भाजपाला सुटेल म्हणून खोतकरानी काँग्रेसचा हात हातात धरण्याच्या हालचाली सुरु केल्याची गरमागरम चर्चा जालन्यात रंगली. याला खुद्द दानवेंनी यापूर्वी जालना येथील एका जाहीर कार्यक्रमात पुष्टी दिलेली आहे.
रावसाहेब दानवेंची गावरान भाषेत अब्दुल सत्तार आणि खोतकरांवर टीका
जोपर्यंत दानवेंचा पराभव होत नाही, तोपर्यंत आम्ही अर्जुन खोतकर यांना जाहीर मदत करु, अशी भीष्म प्रतिज्ञा अब्दुल सत्तार यांनी अर्जुन खोतकरांच्या उपस्थित झालेल्या एका कार्यक्रमात घेतली होती.
रावसाहेब दानवेंना जालना लोकसभेवर शिवसेनेमुळे विजय मिळविता आला. आमच्या सहकाऱ्याने दानवे विजय होत गेले, असे खुद्द राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं होतं. तसेच, जालना लोकसभेची निवडणूक लढविण्यावर अर्जुन खोतकर ठाम असल्याच दिसतंय. त्यामुळे आगामी लढत रंगतदार असेल, हे निश्चित.
जालना लोकसभा : 20 वर्षांपासून खासदार, पण दानवेंविरोधात नाराजी कायम
दुष्काळ असो वा बाजारात शेतमालाचे दर पडण्याची समस्या असो, मुद्दा हमीभावाचा असो वा कर्जमाफीचा असो, दानवेंनी शेतकऱ्याना ‘रडतात साले ‘ म्हणून हिणवल होतं. ही गोष्ट जालन्याचे मतदार विसरलेले नाहीत. शिवसेना आणि काँग्रेस अदृश्यपणे एकत्र येत जालन्यात भाजपाच नाक कापण्याच्या तयारीत आहे. फक्त जालनाकराच्या असंतोषाला वाट मोकळी करुन देण्यासाठी राज्यमंत्री खोतकर सेनेच्या पाठिंब्याने आणि पक्ष प्रमुखाच्या अदृश्य आदेशाने काँग्रेसच्या हाताने दानवे सोबत दोन हात करतील, अशी चर्चा सध्या मराठवाड्यात रंगली आहे.