अहमदनगर लोकसभा : भाजपातूनच विरोध, यावेळी खा. दिलीप गांधींचं काय होणार?

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेत. टीव्ही 9 मराठी राज्यभरातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. अहमदनगर दक्षिण मतदारसंघ हा नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. भाजपचे दिलीप गांधी हे गेल्या दोन टर्मपासून खासदार आहेत. गेल्या वेळी ते मोदी लाटेवर स्वार झाले. मात्र यंदा त्यांच्या नौकेला अनेक आडथळ्यांना सामोरं जावं लावणार आहे. यंदा नगरची जागा राखण्याचं मोठं […]

अहमदनगर लोकसभा : भाजपातूनच विरोध, यावेळी खा. दिलीप गांधींचं काय होणार?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेत. टीव्ही 9 मराठी राज्यभरातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. अहमदनगर दक्षिण मतदारसंघ हा नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. भाजपचे दिलीप गांधी हे गेल्या दोन टर्मपासून खासदार आहेत. गेल्या वेळी ते मोदी लाटेवर स्वार झाले. मात्र यंदा त्यांच्या नौकेला अनेक आडथळ्यांना सामोरं जावं लावणार आहे. यंदा नगरची जागा राखण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असेल. अभद्र युत्या आणि स्थानिक समीकरणं यांचाही परिणाम निवडणुकीत जाणवण्याची शक्यता आहे.

अहमदनगर दक्षिण मतदारसंघ हा खरं तर आघाडीचा बालेकिल्ला. सहकार साखर कारखानदारी, दूध व्यवसाय, शिक्षण संस्था आणि सहकाराचं घट्ट जाळं या मतदारसंघावर आहे. मात्र खासदार दिलीप गांधी यांनी गटबाजीचा फायदा घेत भाजपाचं खातं खोललं. गेल्या दोन टर्मपासासून ते खासदार आहेत. आघाडीत राष्ट्रवादीकडून ही जागा 2014 ला लढवण्यात आली. पण मोदी लाटेत गांधींच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा सुपडासाफ झाला.

अहमदनगर दक्षिण मतदारसंघ अत्यंत संवेदनशील मतदारसंघ आहे. या मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. एक खासदार आणि तीन आमदारांसह भाजपचं प्राबल्य आहे. राष्ट्रवादी तीन आमदारांसह दुसर्‍या स्थानावर, तर शिवसेना आणि काँग्रेस एका आमदारासह तिसर्‍या स्थानी आहे.

मतदारसंघानुसार पक्षीय बलाबल

राहुरी – शिवाजी कर्डीले, भाजप

शेवगाव-पाथर्डी – मोनिका राजळे, भाजप

कर्जत – जामखेड – राम शिंदे, भाजप

नगर शहर – संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस

पारनेर – विजय औटी, शिवसेना

श्रीगोंदा – राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस

अहमदनगर दक्षिण मतदारसंघात भाजपचं वर्चस्व आहे. मात्र खासदार दिलीप गांधींच्या विरोधात मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत नाराजी आहे. गांधी आणि वाद हे समीकरण नेहमीचं आहे. सहाही मतदारसंघात गांधींना पक्षांतर्गत विरोध आहे. तर शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या घोटाळ्यांच्या पुस्तिकेत दिलीप गांधींचा समावेश आहे. गांधी अध्यक्ष असलेल्या अर्बन बँकेत घोटाळ्याचा आरोप गांधींवर असून न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

खासदार दिलीप गांधी आणि वाद

नगर शहर –

शहरात गांधींच्या विरोधात शिवसेना आक्रमक तर आहेच, मात्र भाजपातील आगरकर गट गांधींच्या विरोधात आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केल्याचा गांधींवर आरोप आहे.

शेवगाव – पाथर्डी –

शेवगाव – पाथर्डी मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यात गटबाजी आहे. राजळे विरोधकांना खतपाणी घालत असल्याचा गांधींवर आरोप आहे.

कर्जत – जामखेड –

कर्जत – जामखेड या मंत्री राम शिंदेंच्या मतदारसंघातही शिंदे आणि गांधी यांचं फारसं सख्य नाही.

श्रीगोंदा –

श्रीगोंदा मतदारसंघात भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते हे प्रबळ नेते आहेत. तिथेही मूळ भाजपा आणि पाचपुते यांच्यात गांधींचा कलह आहे.

राहुरी –

राहुरी मतदारसंघात भाजप आमदार शिवाजी कर्डिले आणि गांधींचा फारसा सलोखा नाही. कर्डिले यांना मानणारा हा मतदारसंघ आहे.

पारनेर –

पारनेर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार विजय औटी यांना मानणारे कार्यकर्ते आहे. इथे भाजपाला फारसा जनाधार नाही.

विखे पाटलांच्या मुलाकडूनही तयारी सुरु

सर्व मतदारसंघात गांधींच्या विरोधात गटबाजी दिसून येते. त्यातच पंतप्रधानांच्या संकल्पनेतील आदर्श गावावरही प्रश्नचिन्ह आहे. खासदारांनी दत्तक घेतलेलं कांबी गाव आजून विकासाच्या प्रतिक्षेत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडीची चर्चा आहे. नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडे आहे. मात्र या जागेवर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे काँग्रेसकडून आग्रही आहेत. जागा काँग्रेसला सोडली नाहीतरी लढण्याचा निर्णय सुजय विखेंनी घेतलाय. वेळप्रसंगी काँग्रेस सोडण्याचं नुकताच त्यांना ईशारा दिलाय.  सुजय विखेंची भाजपाकडूनही चाचपणी सुरु असल्याच्या चर्चा आहेत. काहीही असले तरी सुजय यांनी प्रत्येक तालुक्यात झेडपी गटात वैद्यकीय शिबीरं घेतली आहेत. त्यामुळे सुजय विखेंनी जनसंपर्क वाढवला असून तयारी सुरु केली आहे.

यंदा शिवसेनेने एकला चलो चा नारा दिलाय. त्यातच देशभरातील काही समर्थक नाराज आहेत. अशा परिस्थितीत भाजपला नगर दक्षिणची जागा महत्वाची आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत ही जागा राखणं भाजपला अशक्य आहे. त्यामुळे एक तर भाजपला भाकरी फिरवावी लागेल अन्यथा भाकरी करपल्याशिवाय राहणार नाही.

संबंधित बातमी :

शिरुर लोकसभा : यावेळीही शिवाजी आढळराव पाटलांना तोडीस तोड प्रतिस्पर्धी नाही?

वाशिम-यवतमाळ लोकसभा : पाचव्यांदा निवडून येण्यासाठी भावना गवळींचा मार्ग खडतर

हातकणंगले लोकसभा : 2014 ला एनडीए, 2019 ला राजू शेट्टींच्या खांद्यावर यूपीएचा झेंडा?

पालघर लोकसभा : पुन्हा एकदा वनगांच्या मुलाविरोधात भाजपचा उमेदवार? 

परभणी लोकसभा : अंतर्गत नाराजीने शिवसेनेला बालेकिल्ल्यातच भगदाड

कोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच!

रायगड लोकसभा : तटकरेंच्या घराणेशाहीला कंटाळलेले नेतेच राष्ट्रवादीला दगा देणार?

हिंगोली लोकसभा : मोदी लाटेतही निवडून येणाऱ्या राजीव सातवांचा मार्ग खडतर

नागपूर लोकसभा: संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी, गडकरींसमोरील आव्हानं काय?

उस्मानाबाद लोकसभा : राष्ट्रवादी जिव्हारी लागलेल्या पराभवाचा बदला घेणार?

माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.