कल्याण लोकसभा : शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंसमोर यावेळी मनसेचं आव्हान

कल्याण : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यभरातल्या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. कल्याण लोकसभा हा कळवा ते अंबरनाथपर्यंत आहे. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. सहापैकी दोन मुंब्रा-कळवा आणि उल्हासनगर  मतदारसंघ राष्ट्रवादीकडे, तर दोन मतदारसंघ कल्याण ग्रामीण आणि अंबरनाथ शिवसेनेकडे आहे. डोंबिवली भाजपकडे आहे, कल्याण पूर्व भाजप समर्थक […]

कल्याण लोकसभा : शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंसमोर यावेळी मनसेचं आव्हान
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

कल्याण : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यभरातल्या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. कल्याण लोकसभा हा कळवा ते अंबरनाथपर्यंत आहे. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. सहापैकी दोन मुंब्रा-कळवा आणि उल्हासनगर  मतदारसंघ राष्ट्रवादीकडे, तर दोन मतदारसंघ कल्याण ग्रामीण आणि अंबरनाथ शिवसेनेकडे आहे. डोंबिवली भाजपकडे आहे, कल्याण पूर्व भाजप समर्थक अपक्षाकडे आहे.

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कुणाचा प्रभाव?

कल्याण लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे. या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रभावी नेत्यांपैकी एक आहेत. पण ते त्यांचा मतदारसंघ सोडून बाहेर फारसे सक्रिय दिसत नाहीत. उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार ज्योती कलानी आहेत. मात्र त्यांची सून उल्हासनगर महापालिकेत भाजपची महापौर आहे. येणाऱ्या लोकसभेत ज्योती कलानी राष्ट्रवादीला साथ देतील की नाही हे निवडणुकीतच स्पष्ट होईल.

2014 मध्ये राष्ट्रवादीकडून माजी खासदार आनंद परांजपे उमेदवार होते. ते दोनवेळा शिवसेनेकडून निवडून आले होते. सध्या आनंद परांजपे हे ठाण्यात राष्ट्रवादीकडून सक्रिय आहेत. एकंदरीत शिवसेनेसमोर राष्ट्रवादी कमी पडत असल्याचं चित्र दिसत आहे. कल्याण लोकसभेत मनसेचीही ताकत आहे. कारण, या भागात राजू पाटील सक्रीय आहेत. कल्याण लोकसभेत शिवसेनेला भाजप टक्कर देताना दिसून येत आहे. डोंबिवलीचे भाजचे आमदार, राज्य मंत्री रविंद्र चव्हाण यांनी भाजपला मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. ही ताकद कल्याण डोंबिवली महापालिका आणि उल्हासनगर महापालिका निवडणुकीत दिसून आली आहे.

2014 च्या निवडणुकीत काय झालं?

2014 च्या कल्याण लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे तर मनसेकडून राजू पाटील अशी तिरंगी लढत होती. या तिरंगी लढतीअगोदर विजयाविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. 16 मे 2014 रोजी झालेल्या मतमोजणीत शिवेसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी तब्बल 2 लाख मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीला चीतपट केलं, तर मनसेचा धुव्वा उडवला. राष्ट्रवादी आणि मनसेला पहिल्या दोन फेऱ्या वगळता एकाही फेरीत पाच आकडी संख्या गाठता आली नाही.

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कल्याण लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने हॅट्ट्रिक करत राष्ट्रवादी आणि मनसेचा धुव्वा उडवला होता. तब्बल दोन लाख मतांची विक्रमी आघाडी घेत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी आनंद परांजपे यांना चीतपट केलं. या निमित्ताने कल्याणच्या मतदारांनी शिवसेनेला कौल दिल्याने कल्याणची शिवसेना आणि शिवसेनेचे कल्याण हे समीकरण प्रत्यक्षात उतरले. या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आणि कल्याण लोकसभेत शिवसेनेने विजयाचा झेंडा रोवला.

शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना 4 लाख 40 हजार 892, राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना 1 लाख 90 हजार 143, मनसेचे प्रमोद पाटील यांना 1 लाख 22 हजार 349 मते पडली. शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी 2 लाख 50 हजार 749 मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

येत्या लोकसभा निवडणुकीत मात्र ही लढत चुरशीची होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. यावेळी शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता एकनाथ शिंदे फॅक्टर आणि रवींद्र चव्हाण फॅक्टर कशा रितीने निवडणूक लढते हे पाहणे गरजेचे आहे. भाजपची लाटही आता हळूहळू ओसरू लागली आहे. त्यामुळे भाजपबद्दलची नाराजी समोर येऊ लागली आहे. अनेकवेळा अशा प्रकारच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या जातात मात्र नंतर एकत्र येऊन युती केली जाते. त्यामुळे काही दिवसात हे चित्र स्पष्ट होईल. भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढली तर भाजप कुठला चेहरा देतो त्यावर सगळं समीकरण अवलंबून आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण राहणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. मात्र काँग्रेसने ही या जागेची मागणी केलीय. ही जागा नक्की कोणाला मिळेल हे बघणे महत्त्वाचे आहे.

संबंधित बातम्या :

अहमदनगर लोकसभा : भाजपातूनच विरोध, यावेळी खा. दिलीप गांधींचं काय होणार?

शिरुर लोकसभा : यावेळीही शिवाजी आढळराव पाटलांना तोडीस तोड प्रतिस्पर्धी नाही?

वाशिम-यवतमाळ लोकसभा : पाचव्यांदा निवडून येण्यासाठी भावना गवळींचा मार्ग खडतर

हातकणंगले लोकसभा : 2014 ला एनडीए, 2019 ला राजू शेट्टींच्या खांद्यावर यूपीएचा झेंडा?

पालघर लोकसभा : पुन्हा एकदा वनगांच्या मुलाविरोधात भाजपचा उमेदवार? 

परभणी लोकसभा : अंतर्गत नाराजीने शिवसेनेला बालेकिल्ल्यातच भगदाड

कोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच!

रायगड लोकसभा : तटकरेंच्या घराणेशाहीला कंटाळलेले नेतेच राष्ट्रवादीला दगा देणार?

हिंगोली लोकसभा : मोदी लाटेतही निवडून येणाऱ्या राजीव सातवांचा मार्ग खडतर

नागपूर लोकसभा: संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी, गडकरींसमोरील आव्हानं काय?

उस्मानाबाद लोकसभा : राष्ट्रवादी जिव्हारी लागलेल्या पराभवाचा बदला घेणार?

माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.