माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?

माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाली. तत्पूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवली व विजयी झाले होते. त्या निवडणुकीत पवार यांना 5 लाख 30 हजार 596 मते मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपाचे सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 […]

माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाली. तत्पूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवली व विजयी झाले होते. त्या निवडणुकीत पवार यांना 5 लाख 30 हजार 596 मते मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपाचे सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मते मिळाली होती.

2014 साली मोहिते-पाटील विरुद्ध खोत

2014 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपाने ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडून येथे विद्यमान कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. याच निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू स्व. प्रतापसिंह मोहित पाटील यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल केली व निवडणूक लढविली होती. 2014 ला देशात नरेंद्र मोदी यांची लाट असताना माढा मतदारसंघ राष्ट्रवादीने राखला होता. ही लढत खोत व मोहिते पाटील यांच्यात अत्यंत चुरशीने झाली.

मोदी लाटेतही 2014 साली मोहिते-पाटलांचा विजय

विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते यांना 4 लाख 89 हजार 989 तर सदाभाऊ खोत यांना 4 लाख 64 हजार 645 मते मिळाली होती. स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी 25 हजाराहून अधिक मतं घेतली होती. खोत यांचा 25 हजार मतांनी या मतदारसंघात पराभव झाला होता.

काँग्रेसच्या विचारांचा साखरपट्टा

माढा मतदारसंघ हा परंपरागत काँग्रेसी विचारसरणीचा असून यास साखरपट्टा म्हणून ओळखले जातो. यात साखर कारखाने ही जास्त आहेत आणि दुष्काळी पट्टा ही मोठा आहे. हा मतदारसंघ सोलापूर व सातारा जिल्ह्यात विभागला गेला आहे. एकूण सहा विधानसभा मतदारसंघ यात येत असून चार सोलापूर तर दोन सातारा जिल्ह्यातील आहेत. येथील मतदारसंख्या ही 2014 च्या निवडणुकीत 15 लाख 58 हजार इतकी होती यात आता वाढ होवून ती 16 लाखाच्या पुढे गेली आहे. यात 52 टक्के पुरुष तर 48 टक्के महिला मतदार आहे.

माढा मतदारसंघात समाविष्ट विधानसभा

  • सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ – करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस.
  • सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ – फलटण आणि  माण.

विधानसभा मतदारसंघांवर दोन्ही काँग्रेसचं वर्चस्व

या मतदारसंघावर दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व आहे. करमाळ्याला शिवसेनेचे नारायण पाटील हे आमदार आहे तर माढा, माळशिरस व फलटणमध्ये  राष्ट्रवादीचे उमेवार विजयी झाले होते. माढ्याचे प्रतिनिधीत्व आमदार बबनराव शिंदे करत आहेत तर माळशिरसला हनुमंत डोळस व फलटणला दीपक चव्हाण विधानसभा सदस्य आहेत. सांगोल्यात दोन्ही काँग्रेसचा मित्रपक्ष असणारे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख आहेत. सातारा जिल्ह्यातील माण मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. येथून जयकुमार गोरे हे विजयी झाले होते.

माढा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा व विद्यमान आमदार :

  • करमाळा (सोलापूर) – नारायण पाटील (शिवसेना)
  • माढा (सोलापूर) – बबनराव शिंदे (राष्ट्रवादी)
  • माळशिरस (सोलापूर) – हनुमंत डोळस (राष्ट्रवादी)
  • सांगोला (सोलापूर) – गणपतराव देशमुख (शेकाप)
  • माण (सातारा) – जयकुमार गोरे (काँग्रेस)
  • फलटण (सातारा) – दीपक चव्हाण (शेकाप)

माढ्यातून कुठल्या पक्षाकडून कोण इच्छुक?

माढा लोकसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून अनेकजण इच्छुक असून यात विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील, माजी कृषी सचिव प्रभाकर देशमुख, विद्यमान विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष दीपक साळुंखे यांचा समावेश आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान सहकारमंत्री सुभाष  देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील मुख्य समस्या काय आहेत?

2009 ला येथून शरद पवार यांनी निवडणूक लढविली व जनतेने त्यांन मोठ्या मताधिक्क्याने विजयी केले होते. मात्र त्या मानाने या मतदारसंघाचा विकास झाला नाही. माण, सांगोला हे परंपरागत दुष्काळी तालुके या मतदारसंघात आहे व येथे पाणीटंचाई खूप आहे. सिंचनाची कामे होत असली तरी त्याचा वेग कमी आहे. येथे साखर कारखानदारी असली तरी ती सध्या आर्थिक अडचणीत असल्याने उसाला दर नाही. अन्य कृषीमालाचे दर कमी आहेत. सुशिक्षित बरोजगारी खूप आहे त्यामानाने कृषी अधारित अन्य व्यवसाय व उद्योग येथे आले नाहीत. सहकारी संस्था अडचणीत असल्याने आता नोकर्‍यांची संख्या रोडावली आहे. विजयसिंह मोहिते पाटील हे खासदार झाल्यानंतर त्यांनी भाजपाच्या नेत्यांशी असणार्‍या संबंधाच्या जोरावर पंढरपूर लोणंद रेल्वेचे काम सुरू करून घेतले याच बरोबर मतदारसंघातील प्रमुख मार्ग आज राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित होत आहेत.

कुठल्या मुद्द्यांचा फटका बसू शकतो? कुणाला संधी देणार?

माढ्यात मराठा आरक्षणाचा परिणाम होणार मात्र हा मतदारसंघ खुला असल्याने दोन्ही उमेदवार मराठा आहेत त्यामुळे व्यक्ती पाहून ही मतदान होणार, विद्यमान खासदारांची कामगिरी म्हणावी तशी चांगली नाही. कारण सत्ता नव्हती त्यामुळे ते प्रभावीपणे काम करू शकले नाहीत, तसेच त्यांच्या अनेक सहकारी संस्था अडचणीत आहेत. तसेच माढयातून आमदार बबन शिंदे व संजय शिंदे यांच्याशी त्याचे पटत नाही याचा ही फटका त्यांना बसू शकतो.

तसेच मान, खटाव या सातारा जिल्ह्यातील गावातील लोकांचे अनेक प्रश्न राहिले आहेत ते सोडवण्यास विद्यमान खासदार कमी पडले आहेत मात्र ही उमेदवारी प्रभाकर देशमुख याना मिळाली तर ते स्वतः या भागातील आहेत त्यामुळे नाराजी दूर होईल व शिंदे बंधू ही मदत करतील. मोहिते पाटील यांचे काम चांगले असले तरी या मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये खूप गट तट आहेत. 2014 ला शरद पवार यांनी आदेश दिल्यानंतर  येथील गटबाजी थांबली व मोहिते पाटील थोडक्या मतांनी विजयी झाले होते. यंदा आता पवार कोणाला येथून संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हे माण खटाव भागातील असून त्यांचा दुष्काळावर अभ्यास आहे. राजकारणातील कोरी पाटी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शरद पवार यांनी त्यांना कामाला लागण्याची  सूचना केली असल्याचे ते सांगतात. यापूर्वी पवार यांनी कराड येथील माजी जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांना पक्षात आणले व खासदार केले होते. त्याच धर्तीवर प्रभाकर देशमुख यांना संधी मिळते का हे पाहणे महत्वाचे आहे. भाजपाकडून सुभाष देशमुख यांची तयारी असून 2009 मध्ये त्यांनी शरद पवार यांना टक्कर दिली होती. या मतदारसंघाचा त्यांना अभ्यास आहे. आता जिल्हा परिषद, नगरपरिषद निवडणुकांत येथे भाजपाची ताकद वाढली आहे. या जोरावर देशमुख येथून लढण्याची तयारी करीत आहेत. या लोकसभा मतदारसंघात मात्र भाजपाचा एक ही आमदार नाही.

माढा मतदारसंघ हा परंपरागत राष्ट्रवादी व काँग्रेसशी निगडीत असल्याने 2019 ला ही येथे याच पक्षांचा बोलबाला राहील असे वाटते. मोदी लाटेत राष्ट्रवादीने हा मतदारसंघ राखला होता. या भागात भाजपाचे सहयोगी व रयत क्रांतीचे संस्थापक सदाभाऊ खोत यांची ताकद होती त्यांनी मागील निवडणुकीत 4 लाख 64 हजार मते घेतली होती पण ते राज्यात मंत्रिपदी नियुक्त झाले व त्यांचे या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले आहे.

माढा मतदारसंघातील ठळक मुद्दे :

  • माढा हा बारामती मतदारसंघाच्या शेजारचा मतदारसंघ असल्याने थेट शरद पवार यांचा हस्तक्षेप असतो
  • माढा लोकसभेत माण व सांगोला दोन तालुके अत्यंत दुष्काळी व माढा, करमाळा, माळशिरस हे बागायती तालुके आहेत. फलटण मध्ये काही भाग दुष्काळी तर काही भाग हा बागायती आहे.
  • या मतदारसंघात उजनी व नीरा साखळी धरणांच्या पाणी वाटपाचा प्रश्‍न नेहमी ऐरणीवर येतो.
  • नीरा खोर्‍यातील अतिरिक्त पाणी उजनीत आणून ते पुढे मराठवाड्याला नेण्याची योजना राबविली जात आहे. ज्यासाठी नीरा- भीमा स्थिरीरकण व कृष्णा मराठवाडा स्थिरीकरणाचे काम सुरू आहे, यावरून सोलापूर जिल्ह्यात नाराजी आहे. हा मुद्दा निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे.
  • कृषीचे कोसळलेले दर, उसाला न मिळणारा भाव , कृषी उद्योगाची कमतरता, येथे सत्ताधारी भाजपाचे आमदार व खासदार नसल्याने सरकारचे होणारे दुर्लक्ष यामुळे येथील मतदार नाराज आहेत.
  • मराठा आरक्षण व शेतकरी संपाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. जरी भाजपा सरकारने आरक्षणचा विषय सोडविला असला, तरी मतदार हा पारंपारिकपणे शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहण्याची जास्त शक्यता आहे.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.