AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 मे रोजीच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन का साजरे केले जातात ? या दिवसांचं महत्व काय ?

आज 1 मे .. आजच्या दिवशीच महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा केला जातो. विशेष म्हणजे आज गुजरात दिवसही आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन का साजरा केला जातो, या दिवसांचं महत्व काय ? हे जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर बातमी..

1 मे रोजीच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन का साजरे केले जातात ? या दिवसांचं महत्व काय ?
| Updated on: May 01, 2024 | 11:16 AM
Share

आज 1 मे .. आजच्या दिवशीच महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा केला जातो. विशेष म्हणजे आज गुजरात दिवसही आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते. वेळी या मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषकांची संख्या अधिक होती. दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती. त्यामुळे भाषावार प्रांतरचनेमुळे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन वेगळ्या राज्याची घोषणा करण्यात आली. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यामुळे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. तर दुसरीकडे भारतात लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तानच्या (Labor Kisan Party of Hindustan) वर्तीनं 1 मे 1923 रोजी मे दिनाचा उत्सव चेन्नईत आयोजित करण्यात आला होता. कामदार दिनाचं प्रतिक असलेला लाल झेंडाही भारतात तेव्हाच पहिल्यांदा वापरण्यात आला होता. मात्र, 1989 मध्ये या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामदार दिन म्हणून मान्यता मिळाली.

महाराष्ट्र दिनाचा इतिहास

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन केलं. गुजराती भाषिकांनीही वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली. जाळपोळ, मोर्चे आणि आंदोलने सुरू होती. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 105 जणांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली. फ्लोरा फाऊंटन येथे संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 आंदोलक हुतात्मा झाले. त्यानंतर केंद्र सरकारने 1 मे 1960 रोजी मुंबई प्रांताला बॉम्बे पुनर्गठन अधिनियम 1960 नुसार महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली. दोन राज्यांच्या निर्मितीनंतर मुंबई आपल्याच मिळावी म्हणून मराठी आणि गुजराती भाषकांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावरही आंदोलन सुरू झाले.

काय होता निकष ?

मुंबईत सर्वाधिक मराठी भाषिक राहत आहेत. भाषावार प्रांतरचनेच्या निकषामुळे ज्या भागात मराठी बोलणारे अधिक तो भाग त्या राज्याला दिला पाहिजे हे ठरलं आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, असा आग्रह मराठी भाषकांनी धरला. तर मुंबईची जडणघडण आमच्यामुळेच झाल्याचा दावा करत मुंबई गुजरातला देण्याची मागणी गुजराती भाषकांनी केली होती. पण मराठी भाषकांच्या प्रखर विरोधामुळे आणि आक्रमक आंदोलनामुळे अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली.

कामगार दिनाचा इतिहास

मार्क्सवादी आंतरराष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेसने एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी 1989 मध्ये ठराव मंजूर केला. ज्यामध्ये त्यांनी कामगारांना दिवसातील 8 तासांपेक्षा जास्त काम न करण्याची मागणी केली. त्यानंतर, हा वार्षिक कार्यक्रम झाला आणि 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली. पूर्वी कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात होते. दिवसातील 15 तास त्यांना राबवले जात होते. याविरुद्ध 1886 मध्ये कामगार एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या हक्काविरोधात आवाज उठवण्यास सुरवात केली. याचा निषेध म्हणून, त्यांनी दररोज 8 तासाची ड्युटी आणि पगाराची रजेची मागणी केली.

भारतात कधी साजरा झाला पहिला कामगार दिन ?

भारतात चेन्नईमध्ये 1923 मध्ये पहिला कामगार दिन साजरा करण्यात आला. लेबर फार्मर्स पार्टी ऑफ इंडियाने हा दिवस साजरा केला. या दिवशी कम्युनिस्ट नेते मल्यापुरम सिंगारावेलु चेतियार यांनीही सरकारला सांगितले की, कामगारांच्या प्रयत्नांचे आणि कार्याचे प्रतिक म्हणून हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करावा. हा दिवस कामगार दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखला जातो.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.