पुणे विभागातील 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी

देशासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न सुरु (Corona Patient recover in Pune Division) आहेत.

पुणे विभागातील 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी
Follow us
| Updated on: May 10, 2020 | 7:35 PM

पुणे : देशासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न सुरु (Corona Patient recover in Pune Division) आहेत. रुग्णांची वाढ होत असल्यामुळे सरकारही चिंतेत आहे. याच दरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे विभागातील म्हणजेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर भागात आतापर्यंत एकूण 1 हजार 23 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. डॉक्टरांनी या सर्व रुग्णांना घरी सोडले (Corona Patient recover in Pune Division) आहे.

पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 3 हजार 242 तर अॅक्टिव्ह रुग्ण 2 हजार 51 आहेत. आतापर्यंत 168 रुग्णांचा मृत्यू झाला असून 104 रुग्ण गंभीर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील परिस्थिती

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 830 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. 938 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर अॅक्टिव्ह रुग्ण 1 हजार 741 आहेत. पुण्यात एकूण 151 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

सातारा जिल्ह्यातील परिस्थिती

सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 119 कोरोना रुग्ण आहेत. तर 20 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डॉक्टरांनी घरी सोडले आहे. साताऱ्यात 97 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 2 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती

सोलापूर जिल्ह्यात 238 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. 29 रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. तर 196 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. जिल्ह्यात 13 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील परिस्थिती

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 37 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी 27 रुग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 तर एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती

कोल्हापूर जिल्ह्यात 18 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात 9 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अॅक्टिव्ह रुग्ण 8 असून एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पुणे विभागात एकूण 32 हजार 498 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 30 हजार 809 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून 1 हजार 689 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

प्राप्त अहवालांपैकी 27 हजार 508 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 3 हजार 242 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यंत विभागामधील 90 लाख 80 हजार 526 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत 3 कोटी 92 लाख 20 हजार 147 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

संबंधित बातम्या :

इचलकरंजीमध्ये कोरोना नियंत्रणासाठी सम-विषमचा

जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 174 वर, अंमळनेर शहरात शंभरीपार रुग्ण

उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जण कोरोनाबाधित, रायगड पुन्हा रेड झोनमध्ये

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.