AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola: जेव्हा मोठ्या बहिणीला छोटेपणीच आई व्हावं लागतं! का? आईला परीक्षा देता यावी म्हणून…

Akola: अकोला शहरातल्या एस.ऐ.कॉलेजवर एमपीएससीचं केंद्र एका महिलेला आलं होतं. दोन मुलींनी घरी एकटं कसं ठेवणार, म्हणून एक महिला आपल्या दोन मुलींना घेऊन परीक्षा केंद्रावर पोहोचली.

Akola: जेव्हा मोठ्या बहिणीला छोटेपणीच आई व्हावं लागतं! का? आईला परीक्षा देता यावी म्हणून...
परीक्षा केंद्राबाहेर आईची वाट पाहणाऱ्या मुलीImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 8:17 PM
Share

अकोला : स्वामी विवेकानंदांनी (Swami Vivekanand Quotes) म्हटलं होतं, की संघर्ष जेवढा कठीण असेल, तितका विजयही सुंदर होईल! हीच गोष्ट आज अकोल्यातील (Akola) एका परीक्षा केंद्राबाहेर अनेकांना अनुभवायला मिळाली. एक मुलगा आपल्या चिमुकल्या बहिणीसोबत एका परीक्षा केंद्राबाहेर (Exam Canter) दिसली. दोन तास 10 वर्षांची ही मुलगी आपल्या बहिणीला सांभाळत होती. या दोघींचीही आई परीक्षा देण्यासाठी आत परीक्षा केंद्रात गेलेली. त्यामुळे दोन्हीही मुली परीक्षा केंद्राबाहेर आईची वाट पाहत बाहेर थांबल्या होत्या. 10 वर्षांच्या मुलीनं यावेळी आपल्या चिमुकल्या बहिणीला सांभण्यासाठी तारेवरची कसरत केली. आपली छोटी बहिणी रडायला नको, म्हणून तिला खेळवत होती. आईची आठवण नको यायला, म्हणून तिला घेऊन इकडून तिकडे फिरवत होती. छोट्या मुलीनं लहानपणी दाखवलेलं हे मोठेपण पाहून आईच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. परीक्षा देऊन बाहेर आल्यानंतर आईही भारावून गेली होती.

अनोखं दृश्यं

एमपीएससी अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे संयुक्त पूर्व परीक्षा आज घेण्यात आली. अकोल्यातील 29 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला 7 हजार 622 विद्यार्थी बसले होते. 29 केंद्रांवर सुरु असलेल्या या परीक्षेवेळी एका केंद्रावर मात्र अनोखं दृश्यं पाहायला मिळालं.

अकोला शहरातल्या एस.ऐ.कॉलेजवर एमपीएससीचं केंद्र एका महिलेला आलं होतं. दोन मुलींनी घरी एकटं कसं ठेवणार, म्हणून एक महिला आपल्या दोन मुलींना घेऊन परीक्षा केंद्रावर पोहोचली. परीक्षा दोन तासांची होती. एक परीक्षा आत केंद्रातही द्यायची होती. आणि दुसरी परीक्षा केंद्राबाहेर असलेल्या 10 महिन्यांच्या चिमुरडीला आपल्या बहिणीसोबत ठेवण्याची होती. पण जड अंतकरणानं आईनं परीक्षा देण्यासाठी केंद्रात प्रवेश केला. 10 महिन्यांच्या मुलीसह मोठी बाहेर केंद्राबाहेरच आईची वाट बघत थांबली.

आई आतमध्ये परीक्षेला गेल्यानंतर 10 महिन्याच्या चिमुकलीला तिच्या बहिणीनं आईसारखंच सांभाळलं. दोन तास तिचा सांभाळ केला. तिला पाणी पाजलं. छोटी बहीण रडायला नको म्हणून तिला खेळवलं. अर्थात छोट्या बहिणीला सांभाळण्यासाठी मोठ्या बहिणीनं लहानपणीच आईसारखी माया देत तिची काळजी घेतली. परीक्षा संपल्यानंतर जेव्हा आई आपल्या मुलींजवळ आली, तेव्हा आईचे डोळे आपल्या मुलींना पाहून पाणावले होते.

अनेकवेळा या महिलेनं एमपीएसीची परीक्षा दिली होती. पण मार्क कमी मिळाले, म्हणून थोडक्यात संधी हुकली होती. दरम्यान, परीक्षा संपल्यानंतर दोन तासापासून उपाशी असलेल्या मुलीला नंतर मोठ्या बहिणीनं पाणीही पाजलं होतं.

मोठा आदर्श!

मूल झाल्यानंतर अनेक महिलांना आपल्या करीअरकडे दुर्लक्ष करावं लागतं. मुलांना सांभाळूनही अनेक बायका हा करीअरच्या दृष्टीनं प्रयत्न करताना दिसतात. पण अशा पद्धतीनं करीअरसाठी संघर्ष करणं, ही सोपी गोष्ट नाही. अकोल्यासारख्या शहरात या महिलेनं परीक्षेसाठी आपल्या मुलींना घेऊन जात आदर्श तर समोर ठेवला आहेत. पण या मोठ्या बहिणीनं छोट्या बहिणीचा सांभाळ करत त्याहीपेक्षा मोठा आदर्श घालून दिला आहे. लहान मुलं आपल्या अनेक कृतींमधून अनेक थोर गोष्टी शिकवून जात असतात. त्यांचे अर्थ उलगडणं हे शब्दांच्या कधीकधी आवाक्याबाहेरचं असतं. अकोल्यातील परीक्षा केंद्राबाहेर दिसलेलं हे सुंदर चित्र, त्यापैकी एक आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे, या महिलेचा संघर्ष मोठा आहेत, अपेक्षा करुयात या परीक्षेत त्यांना यशही तितकंच सुंदर मिळावं.

संबंधित बातम्या :

गर्लफ्रेन्डसाठी 74 वर्षांचा बॉयफ्रेन्ड रिक्षा चालवतो! इंग्लिश प्रोफेसर असलेला हा माणूस असं का करतोय नेमकं?

एक नंबर भावा! तुझ्या कृतीनं माणुसकी जिवंत आहे, हे सिद्ध केलं! पाणी देणाऱ्याची कृती काळजाचं पाणी पाणी करणारी

रस्त्यावरुन धावत सुटला, लिफ्टसाठीही नको म्हणाला! त्याच्या नकार देण्याचं कारणं फार अर्थपूर्ण आहे, नीट समजून घ्या

Video | गाय मरणाला टेकली होती, शेतकरी तिला खांद्यावर उचलून घेऊन आला, आता वासराचं धुमधडाक्यात बारसं!

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.